कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांनी राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार महानगरपालिका निवडणुकीचा कार्यक्रम अधिकृतरित्या जाहीर केला. राज्य निवडणूक आयोगाने सोमवारी निवडणुकीची घोषणा केली. त्यानंतर प्रशासकांनी हा कार्यक्रम जाहीर केला.नामनिर्देशनपत्र वाटप तसेच ती भरुन देण्याचा कालावधी मंगळवार, २३ ते दि. ३० डिसेंबरपर्यंत आहे. त्यातही दि. २५ला नाताळ व २८ला रविवारी सुटी असल्याने नामनिर्देशनपत्रासाठी सहा दिवसांचा अवधी मिळणार आहे. छाननी ३१ डिसेंबरला होणार आहे. नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची मुदत २ जानेवारीपर्यंत आहे.चिन्हांचे वाटप ३ जानेवारीला झाल्यानंतर उमेदवारांना चिन्हांसह जाहीर प्रचार करण्यासाठी केवळ ११ दिवसांचा कालावधी मिळणार आहे. १३ जानेवारीला सायंकाळी पाच वाजता प्रचाराची मुदत संपणार आहे. १५ जानेवारीला सकाळी ७:३० वाजल्यापासून सायंकाळी ५:३०पर्यंत मतदान होणार आहे. मतमोजणी १६ला सकाळी १०:०० वाजल्यापासून होणार आहे.
Web Summary : Kolhapur Municipal Corporation election schedule announced. Candidates get six days for nomination filing, ending December 30th. Only eleven days are allotted for campaigning after symbol allocation on January 3rd. Polling on January 15th; counting, January 16th.
Web Summary : कोल्हापुर महानगरपालिका चुनाव कार्यक्रम घोषित। नामांकन दाखिल करने के लिए छह दिन, 30 दिसंबर तक। 3 जनवरी को चुनाव चिन्ह आवंटन के बाद प्रचार के लिए केवल 11 दिन। मतदान 15 जनवरी को; मतगणना 16 जनवरी को।