शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
2
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
3
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
4
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
5
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
6
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
7
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
8
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
9
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
10
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
11
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
12
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
13
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
14
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
15
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
16
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
17
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
18
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
19
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
20
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो

उमेदवारी निवड महाडिक गटास डोकेदुखी

By admin | Updated: August 8, 2015 00:38 IST

सर्वसाधारण महिला प्रवर्ग : सौभाग्यवती, मातांच्या उमेदवारीसाठी आघाडीच्या नेत्यांकडे मनधरणी

अमर पाटील- कळंबा -शहराच्या दक्षिणेकडील ३५ लहान-मोठ्या वसाहतीत विभागलेला, मध्यम व कष्टकरी वर्गाचे प्रमाण जास्त असणारा प्रभाग म्हणजे गतवेळचा ७१ आणि नव्याने झालेल्या प्रभाग रचनेतील प्रभाग क्र. ७६ साळोखेनगर. २०१० च्या पालिका निवडणुकीत इतर मागासवर्गीय पुरुष प्रवर्गासाठी आरक्षित असणारा प्रभाग आता सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी खुला झाला आहे. विधानसभा निवडणुकीत आमदार अमल महाडिक यांना या प्रभागातून प्रचंड मताधिक्य मिळाले. त्यामुळे महाडिक गटाच्या कार्यकर्त्यांत उत्साह आहे. त्यातच भाजप-ताराराणी आघाडीचा झालेला समेट यामुळे आपल्याच सौभाग्यवतींना व मातांना उमेदवारी मिळावी, म्हणून महाडिक गटाचे डझनभर कार्यकर्ते आज आघाडीच्या नेत्यांकडे मनधरणी करताहेत.पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर औषध फवारणी, वृक्षारोपण, स्वच्छता मोहीम, विकासकामांच्या पत्रकांचे वाटप, पोस्टरवॉर, आदींमुळे प्रभागाचे राजकारण वर्षभर चांगलेच ढवळून निघाले होते; पण सर्वसाधारण महिला प्रभाग झाल्याने पुरुष इच्छुकांची गोची झाली. कुटुंबातील महिला सदस्यांना उमेदवारीच्या रणांगणात उतरून प्रत्येकजण आता नशीब आजमावत आहेत.या प्रभागाच्या रचनेत प्रचंड उलथापालथ झाली आहे. प्रभागातील पूर्वीच्या शिवगंगा कॉलनी, वाल्मीकी वसाहत, अपराध कॉलनी, प्राध्यापक कॉलनी, कृष्णराव साळोखेनगर या जवळपास तीन हजार लोकसंख्येच्या वसाहती नव्याने निर्माण झालेल्या प्रभाग क्र. ७५ मधील आपटेनगर, तुळजाभवानी प्रभागात समाविष्ट झाल्या आहेत, तर जुन्या प्रभाग क्र. ६७ राजलक्ष्मीनगर प्रभागातील मनोरमानगर, रचनाकार हौसिंग सोसायटी, मोहिते कॉलनी या तीन हजार लोकसंख्येच्या वसाहती या प्रभागात नव्याने समाविष्ट करण्यात आल्या आहेत. त्यामुळे नवीन समाविष्ट मतदारांशी संपर्क साधून अपेक्षापूर्ती करताना उमेदवारांची मोठी दमछाक होणार हे निश्चित.प्रभागाचा विस्तार पूर्वेस देवकर पाणंद चौक ते कळंबा रोड, पश्चिमेस मोरे मानेनगरपैकी साळोखेनगर, उत्तरेस शिवाजीनगर, सरदार पार्क, दक्षिणेस शिवप्रभूनगर १०० फुटी रोड असा आहे.सध्या प्रभागाचे प्रतिनिधित्व राष्ट्रवादीचे महेश गायकवाड करीत आहेत, तर स्वीकृत नगरसेवक उदय जाधव हेसुद्धा याच प्रभागातील. या प्रभागात दोन नगरसेवक असून, निधीची मांदियाळी असतानाही विकासकामांचा बोजवारा उडाला. त्यामुळे विकासकामांच्याच मुद्द्यावर यंदाची निवडणूक निकाली होणार हे निश्चित.विद्यमान नगरसेवक महेश गायकवाड यांनी पत्नी माधुरी गायकवाड यांना रिंगणात उतरविण्याचे ठरविले आहे. स्वीकृत नगरसेवक व सतेज पाटील समर्थक उदय जाधव यांची भावजय अश्विनी जाधव काँग्रेसकडून इच्छुक आहेत. माजी नगरसेविका अलका पाटील यांच्या सूनबाई व गतवेळचे दुसऱ्या क्रमांकाचे असणारे अपक्ष उमेदवार धीरज पाटील यांच्या पत्नी प्रतीक्षा पाटील याही काँग्रेसच्या प्रबळ दावेदार आहेत.महाडिक समर्थक प्रशांत शेटे यांनी बचत गटाच्या माध्यमातून कार्यरत असणाऱ्या श्रीमती संजीवनी शेटे यांना रणांगणात उतरविले आहे. ते महाडिक गटातून निवडणुकीची तयारी करीत आहेत.या प्रभागातून सुमन सूर्यवंशी याही महाडिक गटातून तयारीत आहेत. विविध सामाजिक उपक्रमांतून अग्रेसर संजय साळोखे यांच्या पत्नी स्वरूपा साळोखे यांना रिंगणात उतरविले आहे. सर्वसामान्य कार्यकर्त्यास पहिल्यांदा संधी देताना इच्छुकांच्या भाऊगर्दीतून नाराजी दूर करणे आता नेत्यांना जड जाणार हे निश्चित.असा आहे प्रभाग...तात्यासोा मोहिते कॉलनी परिसर, रचनाकार हौसिंग सोसायटी, मोरेमानेनगर, साळोखेनगर, हडको कॉलनी, चव्हाण कॉलनी, कळंबा जेल वसाहत, जुना कळंबा नाका पिछाडीचा परिसर, मनोरमानगर.महाडिक गटातून उमेदवारी मागणाऱ्यांची संख्या जास्त असल्याने नेत्यांची डोकेदुखी वाढणार हे निश्चितया प्रभागातून मंडळांची संख्या प्रचंड असल्याने अपेक्षापूर्ती करण्यासाठी गठ्ठा मतदान मिळविताना उमेदवार मेटाकुटीला येणार हे निश्चित.