शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
2
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
3
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
4
बंगालमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यास काँग्रेस ममता दीदींना पाठिंबा देणार? मल्लिकार्जुन खर्गे स्पष्टच बोलले
5
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
6
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
7
“प्रहार स्वतंत्र सामाजिक संघटना म्हणून काम करेल”; बच्चू कडूंच्या प्रवेशानंतर शिंदेंनी केले स्पष्ट
8
'राजा शिवाजी'तील वाघनखं, चंद्रकोर, पेहेरावावरून सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा! पण रितेशने 'या' गोष्टींमध्ये बाजी मारली...
9
अरे बापरे! तुमच्या किचनमधील 'या' गोष्टी देतात थेट कॅन्सरला आमंत्रण; आजच फेकून द्या बाहेर
10
मोठा ट्विस्ट...! 'ॲक्सिस माय इंडिया'कडून पश्चिम बंगालचा एक्झिट पोल जाहीर करण्यास नकार, अंदाजच येईना...
11
सोन्याच्या दराबाबत वर्ल्ड बँकेची मोठी भविष्यवाणी! २०२६ मध्ये अमाप वाढणार, पण २०२७ मध्ये धडाधड...
12
"एकनाथ शिंदेंनी हुल दिली अन् उद्धव ठाकरे..."; विधान परिषदेवरुन ज्योती वाघमारेंनी उडवली खिल्ली
13
MI vs SRH: मुंबई इंडियन्सच्या लाजिरवाण्या पराभवानंतर नीता अंबानी, आकाश अंबानींचा चेहराच पडला
14
ज्या बॉलरचं नाव ऐकून भल्याभल्यांना फुटतो घाम, त्यालाच मारला 'नो लूक सिक्स'; सलील आरोराचा व्हिडीओ व्हायरल?
15
“सॉरी जिया... मम्माला मरावंच लागेल”, महिलेची आत्महत्या; स्मशानभूमीत आला धडकी भरवणारा Video कॉल
16
Bank Holidays in May: मे महिन्यात १३ दिवस बँका राहणार बंद; कोणत्या राज्यात केव्हा असेल सुट्टी?
17
बागेत प्रियकरासोबत रोमान्स करत होती २ मुलांची आई, गावकऱ्यांनी दोघांना पाहिलं अन् पुढे असं काही केलं...
18
Buddha Purnima 2026 Wishes: बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा बुद्ध जयंती!
19
महायुती-महाविकास आघाडीचे ठरले; पाहा, विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी संपूर्ण उमेदवारांची यादी
20
Vastu Shastra: प्रगतीचे मार्ग मोकळे करायचे आहेत? मग तुमच्या घरातील 'हे' वास्तू दोष त्वरित दूर करा!
Daily Top 2Weekly Top 5

निर्भयपणे मतदान करता येणार

By admin | Updated: July 19, 2015 00:39 IST

जे. एस. सहारिया: जिल्ह्यात ११५ संवेदनशील मतदान केंद्रे; मते विकत घेणाऱ्यांवरही प्रशासनाची करडी नजर

सातारा : राज्यातील १५ हजार ग्रामपंचायतींच्या २०१५ मध्ये निवडणुका होत आहेत. त्यातील ९ हजार ग्रामपंचायतींच्या निवडणूक २५ जुलै व ४ आॅगस्ट पर्यंत होणार आहेत. सातारा जिल्ह्यातील ७२६ ग्रामपंचायतींच्या निवडणुका याच कालावधीत होत आहेत. मतदारांना निर्भयपणे मतदान करता यावे, यासाठी निवडणूक आयोगाने खबरदारी घेतली आहे. जिल्ह्यातील २ हजार ४८० मतदान केंद्रांपैकी ११५ संवेदनशील मतदान केंद्रांवर कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी पत्रकार परिषदेत दिली. ग्रामपंचायत निवडणुकीसंदर्भात माहिती देताना राज्याचे निवडणूक आयुक्त सहारिया म्हणाले, ‘७२६ पैकी १५ गावांमध्ये ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुका होणार आहेत. जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी उमेदवारांनी नामनिर्देशपत्र भरण्यास सुरुवात केली आहे. २० जुलै हा उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यावेळी उमेदवारांना उमेदवारी अर्ज भरताना कोणती येणारे अडचण तेथेच सोडविली जाणार आहे. त्यासाठी निवडणूक अयोगाने वेगळी व्यवस्था केली आहे. आजअखेर जिल्ह्यतील ५० टक्क्यांपेक्षा जास्त उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज भरले आहेत. पुण्यातील भारती भोसले, उत्तमराव पाटील, पी. एम. कडुसकर, श्रीपती मोरे या चार अप्पर जिल्हाधिकाऱ्यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. या अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली ४६० निवडणूक अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. एकूण १४ हजार ४०४ एकूण कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. या सर्व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणही देण्यात आले आहे. मतमोजणी २७ जुलै व ४आॅगस्टला होणाऱ्या ग्रामपंचायतीची मतमोजणी ६ आॅगस्टला होईल. दरम्यान ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी आयुक्त सहारिया साताऱ्यात आले होते. येथील नियोजन भवनामध्ये झालेल्या बैठकीमध्ये जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, अप्पर जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, सर्व तहसीलदार तसेच विविध विभागांतील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. अमिष दाखवून मते विकत घेणाऱ्यांवरही प्रशासनाची करडी नजर असल्याचे यावेळी या बैठकीत सांगण्यात आले. (प्रतिनिधी)