शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

gram panchayat election: गावगाड्यासाठी हलगी कडाडली; प्रचाराचे नारळ फुटले, राजकीय हवा तापली

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2022 13:37 IST

१८ डिसेंबर रोजी मतदान होत असून जसजशी मतदानाची तारीख जवळ येईल, तसे वातावरण तापतच जाणार

कोल्हापूर : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी प्रचाराला सुरुवात झाली असून गावोगावी प्रचाराची हलगी कडाडली आहे. शुक्रवारी सकाळी मुहूर्तावर बहुतांशी गावात प्रचाराचे नारळ फुटले असून एकीकडे थंडी वाढत असतानाच दुसऱ्या बाजूला राजकीय हवा मात्र गरम होऊ लागली आहे.जिल्ह्यातील ४७४ ग्रामपंचायतीसाठी रणधुमाळी सुरु झाली होती. माघारीच्या प्रक्रियेत ४३ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहे. त्यामुळे सध्या ४३१ गावांत निवडणुकीचा ज्वर चढू लागला आहे. या गावात सरपंचपदासाठी १४५६ तर सदस्यपदासाठी ८ हजार ९९५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. बुधवारी माघार झाल्यानंतर पॅनल बांधणी करुन प्रचार यंत्रणा सक्रिय झाली, मात्र बहुतांशी गावात शुक्रवारी प्रचाराचे नारळ फुटले. ग्रामदैवतांना साकडे घालून सकाळी प्रचाराची हलगी कडाडली. गल्लोगल्ली मतदारांना नमस्कार करत प्रचार फेऱ्या काढण्यात आल्या. त्यानंतर प्रभाग निहाय व्यक्तिगत गाठीभेटी सुरु झाल्या आहेत. आणाभाका व इतर क्लुप्त्यांचा सर्रास वापर सुरु आहे. एकीकडे थंडीचा कडाका वाढत असतानाच दुसऱ्या बाजूला ग्रामपंचायत निवडणुकीचे वातावरण थंडीतही गरम होऊ लागले आहे. मतदान १८ डिसेंबर रोजी होत असून जसजशी मतदानाची तारीख जवळ येईल, तसे वातावरण तापतच जाणार आहे. साम, दाम, दंड या नीतीचा वापर सर्रास सुरु असल्याने काही गावांत आतापासूनच तणावाचे वातावरण आहे.शक्ती प्रदर्शनाने प्रचाराचा प्रारंभप्रचाराचा प्रारंभ करताना प्रत्येक गावात दोन्ही गटांकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले. प्रारंभ करतानाच एकमेकांची ताकद दाखवण्याचा प्रयत्न झाल्याने वातावरण तापू लागले आहे.

प्रचारासाठी जायचे कोणाकडे?घराशेजारचे उमेदवार एकमेकांच्या विरोधात उभे आहेत. भावकी भावकीत दोन-तीन उमेदवार असल्याने प्रचारासाठी जायचे कोणाकडे असा प्रश्न प्रत्येक गावात आहे. रोज उठून एकमेकांची तोंडे बघायची. जो तो आपण त्याच्यापेक्षा चांगला कसा हेच सांगण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे कोणत्याही राजकीय गटासोबत नसणाऱ्यांची गोची झाली आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरgram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक