शहरं
Join us  
Trending Stories
1
जागरूक हो मतदारराजा; महाराष्ट्रासह १० राज्यांतील ९६ जागांसाठी आज होणार मतदान
2
बाळासाहेबांवर अन्याय करणाऱ्यांना सोबत कसे घेतले? राज ठाकरे, ठाण्यातील लोंढ्यांबाबत चिंता
3
पंतप्रधानांची निवड तुम्ही संगीत खुर्चीतून करणार का? उपमुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांना सवाल
4
लोकशाही न मानणाऱ्या नरेंद्र मोदींची पावले हुकूमशाहीकडे; शरद पवारांची टीका
5
मूल दुसऱ्याचे पण आपल्याला हवे, यांना सगळे रेडीमेड पाहिजे; उद्धव ठाकरेंची भाजपवर कडाडून टीका
6
ही लोकसभेची निवडणूक भाजप विरुद्ध जनता अशी झालेली आहे: प्रकाश आंबेडकर
7
“यापुढे विधानसभा, लोकसभेची निवडणूक लढविणार नाही, राजकीय संन्यास…”: एकनाथ खडसे
8
भाजपाने उद्योग, नोकऱ्या गुजरातला पळविल्या, उद्या मंत्रालयही पाठवले जाईल: आदित्य ठाकरे
9
सत्तेच्या लालसेपोटी उद्धव ठाकरे रामाला विरोध करणाऱ्यांबरोबर; पुष्करसिंह धामी यांची टीका
10
४ जूनला भाजपा जाऊन इंडिया आघाडीचे सरकार येईल: शशी थरूर, देशभरात हवा बदलल्याचा दावा
11
मुंबईत प्रचाराचा सुपरसंडे! मतदानाआधीचा शेवटचा रविवार; सभांमुळे वातावरण तापले
12
चौथ्या टप्प्यातही नात्यांची कसोटी; विखे, गावित, खडसे, मुंडे यांची प्रतिष्ठा पणाला
13
पोट भरण्याचे अन् विजेचे वांदे; महागाईविरोधात ‘पीओके’ पेटले
14
पाटण्यात 'मोदी वादळ', पंतप्रधानांच्या रोड शोला 3.5 किलोमीटरपर्यंत प्रचंड गर्दी
15
RCB ने प्ले ऑफच्या आशा कायम राखल्या, DC च्या अडचणी वाढल्या; विराट-अनुष्का खूश 
16
"...तर इस्रायल दुसऱ्याच दिवशी गाझावरील हल्ले थांबवेल"! पण हमासला बायडेन यांची एवढी एक गोष्ट ऐकावी लागेल
17
चिखलीत व्यावसायिक स्पर्धेतून गोळीबार, एक जण गंभीर जखमी 
18
पुण्यात रवींद्र धंगेकराचं पोलीस ठाण्यातच ठिय्या आंदोलन; वाचा नेमकं काय घडलं?
19
निवडणूक बंदोबस्तासाठी आलेल्या अमरावतीच्या होमगार्डचा मृत्यू
20
२२ वर्षीय फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, विराट कोहली पाहा किती खूश झाला; Video 

बेळगावमधील कॅमेऱ्यामुळे उत्तराखंड बोगद्यातील लाईव्ह दृश्ये, अडकलेल्या कामगारांची नेमकी स्थिती कळण्यास मदत

By समीर देशपांडे | Published: November 23, 2023 12:10 PM

बेळगावच्या पाणी योजनेसाठी आणला होता कॅमेरा

समीर देशपांडेकोल्हापूर : एकीकडे उत्तराखंड उत्तरकाशी येथील बोगद्यात अडकलेल्या ४१ कामगारांशी संपर्क करताना अडचणी येत असताना बेळगावहून पाठवलेल्या रोबोटिक कॅमेऱ्यामुळे या सर्वांची लाईव्ह दृश्ये आता उपलब्ध झाली आहेत. त्यामुळे त्या बोगद्यातील अडकलेल्या कामगारांची नेमकी स्थिती कळण्यास मदत झाली आहे. एल अॅन्ड टी कंपनीने बेळगावच्या पाणी योजनेच्या देखभालीसाठी हा कॅमेरा आणला होता.गेले नऊ दिवस हे कामगार बोगद्यात अडकले आहेत. त्यांना अन्न, पाणी दिले जात असले तरी त्यांची नेमकी स्थिती कशी आहे हे समजण्यात अनंत अडचणी येत होत्या. याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एल अॅन्ड टी कंपनीचे कार्यकारी संचालक एस. एम. सुब्रमण्यम यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी या कंपनीचा एक अतिशय छोटा रोबोटिक कॅमेरा बेळगाव येथे असल्याचे सांगण्यात आले. गडकरी यांच्या सूचनेनुसार बेळगावमधील हा कॅमेरा घेऊन या कंपनीचे दोन अभियंते दौदीप खान्रा आणि बाळकृष्ण किलारी हे सोमवारी संध्याकाळी उत्तराखंड येथे पाेहोचले.

तेथे पोहोचल्यानंतर त्यांनी तेथे कार्यरत असलेल्या जवानांच्या मदतीने लगेचच कामाला सुरुवात केली. रोबोटिक कॅमेरा बोगद्यामध्ये सोडण्यात आला आणि रात्री दोन वाजता आत अडकलेल्या ४१ कामगारांची लाईव्ह दृश्ये या कॅमेऱ्याच्या माध्यमातून उपलब्ध झाली. मंगळवारी सकाळपासूनच ही दृश्ये दूरचित्रवाहिन्यांवरून प्रक्षेपित करण्यात आली असून यातून कामगारांची स्थिती समजून येत आहे.

बेळगावच्या पाणी योजनेसाठी आणला होता कॅमेराबेळगाव शहराची पाणी योजना एल अॅन्ड टी कंपनीकडून तीन वर्षांपूर्वी पूर्ण करण्यात आली असून या योजनेची देखभालदेखील याच कंपनीकडे आहे. जलवाहिनीमधील अडथळे आणि गळती करण्यासाठी दोन महिन्यांपूर्वी हा रोबोटिक कॅमेरा आणण्यात आला होता. हाच कॅमेरा या कामासाठी तातडीने उत्तराखंडला पाठवण्यात आल्याचे या कंपनीचे बेळगावमधील व्यवस्थापक हार्दिक देसाई यांनी सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरbelgaonबेळगावbelgaum-pcबेळगाव