शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

राजकारण डोळ्यांपुढे ठेवून धनाजी यमकर यांचा कांगावा : मेघराज राजेभोसले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2020 18:36 IST

उपाध्यक्ष धनाजी यमकर मद्यधुंद अवस्थेत बेलगाम वागत निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून हे राजकारण केले आहे. त्यातून संचालकांची व महामंडळाची बदनामी झाली असून त्यांच्यावर कारवाई करू, अशी माहिती अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी यमकर यांनी दूरध्वनीवर शिवराळ भाषेत केलेले संभाषण ऐकविण्यात आले.

ठळक मुद्देराजकारण डोळ्यांपुढे ठेवून धनाजी यमकर यांचा कांगावा : मेघराज राजेभोसले संचालक मंडळाच्या बैठकीत कारवाई करणार

 कोल्हापूर : गरजू कलाकारांना मदत करण्यासाठी उपाध्यक्ष धनाजी यमकर यांनी कधीही पुढाकार घेतला नाही, उलट जी साखर संचालक चोरल्याचा ते कांगावा करत आहेत त्याचाच चहा ते कार्यालयात पितात, धनादेशाद्वारे पैशांचा अपहार करण्याचा प्रयत्न अंगलट आला म्हणून ते दुसऱ्यांवर आरोप करत आहेत.

मद्यधुंद अवस्थेत बेलगाम वागत त्यांनी निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून हे राजकारण केले आहे. त्यातून संचालकांची व महामंडळाची बदनामी झाली असून त्यांच्यावर कारवाई करू, अशी माहिती अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी यमकर यांनी दूरध्वनीवर शिवराळ भाषेत केलेले संभाषण ऐकविण्यात आले.चित्रपट महामंडळाचे उपाध्यक्ष धनाजी यमकर यांनी दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेत संचालकांवर साखर चोरल्याचा व धनादेश अपहार करण्याचा आरोप केला होता. त्यावर मेघराज भोसले यांनी खुलासा केला.ते म्हणाले, संदीप पाटील या व्यावसायिकाने एक किलो पॅकिंगची १०० किलो साखर नेऊन १५० किलो साखर महामंडळाला परत केली अजूनही ती कार्यालयात आहे. धनादेशाच्या प्रकरणात अजूनही त्यांनी मला पुरावे दिले नाहीत, पोलीस तपासातही काही निष्पन्न झाले नाही, चित्रपट महामंडळ कला महामंडलच्याअंतर्गत काम करत नाही, त्याची स्वायत्तता अबाधित आहे.रवी गावडे म्हणाले, गरजू कलाकारांसाठी आम्ही केलेल्या कामानंतर माझा भावी उपाध्यक्ष म्हणून उल्लेख झाल्याने त्यांनी राजकारण सुरू केले. साखर चोरून नेण्याइतकी आमची परिस्थिती वाईट झालेली नाही. उलट त्यांनी ज्युनिअर आर्टिस्ट, मॉब सप्लायचे काम लोकांकडून काढून घेतले आहे, आमची बदनामी केल्यानंतरही त्यांनी माझ्यासह अध्यक्षांना शिवीगाळ केली. यावेळी संजय ठुबे, शरद चव्हाण, अर्जुन नलवडे, भालचंद्र कुलकर्णी, सुरेखा शहा यांच्यासह चित्रपट व्यावसायिक उपस्थित होते.महिला कर्मचाऱ्याला अपमानास्पद वागणूकभोसले म्हणाले, कार्यालयातील गरोदर महिला कर्मचाऱ्याने जबरदस्तीने व्हिडिओ करण्यास नकार दिल्यानंतर यमकर यांनी त्यांना अपमानास्पद वागणूक देऊन कार्यालयाबाहेर काढले. त्यांना जाणीवपूर्वक त्रास दिला. याची तक्रारही विशाखा कमिटीत झाली आहे. यमकर यांना असे न वागण्याचा सल्लाही दिला होता. यावेळी या घटनेचे ऑडिओ व व्हिडिओ दाखविण्यात आला.

टॅग्स :cinemaसिनेमाkolhapurकोल्हापूर