शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कॉल ड्रॉप, आवाजातील विस्कळीतपणा, ‘नो नेटवर्क’मुळे जनता झाली हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2020 17:46 IST

खासगी आॅपरेटर कंपन्यांच्या मोबाईल सेवेत विस्कळीतपणा आल्यामुळे मोबाईलधारकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. गेल्या काही दिवसांपासून इंटरनेटचा कमी वेग, अचानक फोन कट होणे, फोन न लागणे, नेटवर्कच्या बाहेर असणे, आदी समस्यांचा समावेश आहे. आवाज व्यवस्था अडखळीतही बीएसएनएलची सेवा अजूनही आपले अस्तित्व टिकून आहे.

ठळक मुद्देकॉल ड्रॉप, आवाजातील विस्कळीतपणा‘नो नेटवर्क’मुळे जनता झाली हैराण

कोल्हापूर : खासगी आॅपरेटर कंपन्यांच्या मोबाईल सेवेत विस्कळीतपणा आल्यामुळे मोबाईलधारकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. गेल्या काही दिवसांपासून इंटरनेटचा कमी वेग, अचानक फोन कट होणे, फोन न लागणे, नेटवर्कच्या बाहेर असणे, आदी समस्यांचा समावेश आहे. आवाज व्यवस्था अडखळीतही बीएसएनएलची सेवा अजूनही आपले अस्तित्व टिकून आहे.गेला आठवड्याभरात खासगी आॅपरेटर कंपन्यांच्या मोबाईल सेवांमध्ये विस्कळीतपणा आला आहे. त्याचा फटका मोबाईलधारकांना बसत आहे. विशेषत: कॉल न लागणे, नेटवर्कची गती कमी असणे, बोलणे मध्येच कट होणे, आवाजात विस्कळीतपणा, आदी समस्यांमुळे अनेकांची घालमेल होत आहे.

सेवेतील विस्कळीतपणामुळे अनेक कंपन्यांतील कर्मचाऱ्यांची कामेच होत नाहीत. विशेषत: वित्तीय संस्थांमधील कर्मचाऱ्यांना या मनस्तापाला अधिक सामोरे जावे लागत आहे. बोलणे कमी झाल्यानंतर अनेकांनी व्हॉटस्अ‍ॅपवर आपले कामकाज करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यातही गती नसल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली. याबाबत खासगी कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना विचारणा केल्यानंतर त्यांनी आपल्याला याबाबत बोलण्याचा अधिकार नाही. वरिष्ठ कार्यालयाशी संपर्क साधा, असे सांगितले. याबाबत नागरिकांतून उलटसुलट चर्चेला ऊत आला आहे.‘बीएसएनएल’ अजूनही ‘बेस्ट ’सोमवारी सायंकाळी ५-४५ मिनिटांनी बीएसएनएलची प्रमुख नेटवर्क डाटा लाईन इस्लामपूर (ता. वाळवा, सांगली) येथे बंद पडली. यावर नेमका कुठे दोष आहे, याची माहिती मिळाल्यानंतर कोल्हापुरातील तांत्रिक पथकाने तेथे जाऊन हा दोष दूर करीत ही सेवा पुन्हा रात्री ८ वाजता पूर्ववत केली. विशेष म्हणजे ३१ जानेवारी रोजी बीएसएनएलचा सुमारे ४०० हून अधिक कर्मचारी वर्गाने कंपनीच्या धोरणामुळे स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. तरीसुद्धा यातील तीनशेहून अधिक कर्मचारी स्वेच्छेने दोष दुरुस्तीसाठी विनामोबदला रोज कार्यालयात येतात. यातही यातील काही कर्मचाºयांनी सहभाग घेत ही दोष दुरुस्ती केली.

 

 

टॅग्स :Mobileमोबाइलkolhapurकोल्हापूर