शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

ई वॉर्डमधील ८ प्रभागांना बायपासने पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2020 11:33 IST

Muncipal Corporation, water, kolhapur ताराबाई पार्कातील पाण्याच्या टाकीचे छत खराब झाल्यामुळे दूषित पाणीपुरवठा होत आहे. त्यावर तात्पुरता पर्याय म्हणून येथून टाकीत पाणी न सोडता ई वॉर्डमधील ८ प्रभागांना बायपासने पाणीपुरवठा करण्याचा निर्णय झाला तसेच तात्काळ टाकीचे काम पूर्ण करण्याचे आदेश आयु्क्त डॉ. कादंबरी बलकवडे यांनी दिले.

ठळक मुद्देई वॉर्डमधील ८ प्रभागांना बायपासने पाणीपुरवठाताराबाई पार्क येथील टाकीत दूषित पाणी असल्यामुळे पर्याय

कोल्हापूर : ताराबाई पार्कातील पाण्याच्या टाकीचे छत खराब झाल्यामुळे दूषित पाणीपुरवठा होत आहे. त्यावर तात्पुरता पर्याय म्हणून येथून टाकीत पाणी न सोडता ई वॉर्डमधील ८ प्रभागांना बायपासने पाणीपुरवठा करण्याचा निर्णय झाला तसेच तात्काळ टाकीचे काम पूर्ण करण्याचे आदेश आयु्क्त डॉ. कादंबरी बलकवडे यांनी दिले.धैर्यप्रसाद मंगल कार्यालय चौकातील पाण्याच्या टाकीचे छत खराब झाले आहे. त्यामुळे टाकीत पक्षी पडत असून दूषित पाणीपुरवठा होत असल्याचे नगरसेवक रत्नेश शिरोळकर यांनी सभागृहात निदर्शनास आणले तसेच गटनेते सत्यजित कदम यांनीही मंगळवार (दि. २७)पासून टाकीखाली आंदोलन केले जाईल, असा इशारा दिला. त्याची गंभीर दखल आयु्क्त डॉ. कादंबरी बलकवडे यांनी घेत सोमवारी सभा संपल्यानंतर त्वरित टाकीची पाहणी केली.

तत्काळ टाकीचे काम पूर्ण करण्याचे आदेश दिले. तत्पूर्वी बायपासने प्रभागांमध्ये पाणीपुरवठा करण्याचा निर्णय झाला. यावेळी टाकीच्या कामासाठी आणखीन दोन महिन्यांचा अवधी लागेल, असे पाणीपुरवठा विभागाने स्पष्ट केले. दरम्यान, खानविलकर पेट्रोल पंप, महावीर उद्यान, नागाळा पार्क, कनाननगर, ताराबाई पार्क, सर्किट हाऊस, कदमवाडी, विचारेमाळ, आदी ठिकाणी बायपासने पाणी दिले जाणार आहे. त्यामुळे कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :WaterपाणीMuncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर