शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी नगरपरिषदेच्या पोटनिवडणुकीत तिरंगी लढत, ६ उमेदवारी अर्ज दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 17:22 IST

रत्नागिरी नगर परिषदेच्या प्रभाग ३ (ब) मधील पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या सोमवार या शेवटच्या दिवशी शिवसेनेतर्फे राजन शेट्ये आणि प्रसाद राजन शेट्ये यांनी आपले उमेदवारी अर्ज सहनिवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी अरविंद माळी यांच्याकडे दाखल केले. त्यामुळे शेवटच्या दिवसापर्यंत एकूण ६ उमेदवारी अर्ज दाखल झाले.

ठळक मुद्देरत्नागिरी नगरपरिषदेच्या पोटनिवडणुकीत तिरंगी लढत६ उमेदवारी अर्ज दाखल सेना-भाजपमध्ये झुंज!

रत्नागिरी : रत्नागिरी नगर परिषदेच्या प्रभाग ३ (ब) मधील पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या  शेवटच्या दिवशी शिवसेनेतर्फे राजन शेट्ये आणि प्रसाद राजन शेट्ये यांनी आपले उमेदवारी अर्ज सहनिवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी अरविंद माळी यांच्याकडे दाखल केले. त्यामुळे शेवटच्या दिवसापर्यंत एकूण ६ उमेदवारी अर्ज दाखल झाले. २६ मार्च हा उमेदवारी मागे घेण्याचा अंतिम दिवस आहे. सेना, भाजप व कॉँग्रेस आघाडी अशी तिरंगी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.भाजपतर्फे वसंत पाटील व कॉँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे सनीफ गवाणकर यांचे प्रत्येकी २ अर्ज व सेनेचे दोन अर्ज मिळून एकूण ६ अर्ज या पोटनिवडणुकीसाठी दाखल झाले आहे. २० मार्चला अर्जांची छाननी होणार असून, २६ मार्च ही माघारीची अंतिम तारीख आहे. २७ मार्चला चिन्हांचे वाटप होणार आहे. ६ एप्रिलला मतदान होणार असून, ७ एप्रिलला मतमोजणी व निकाल जाहीर होणार आहे.सोमवारी शिवसेनेतर्फे उमेदवारी अर्ज दाखल करताना राजन शेट्ये यांच्यासोबत जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक, तालुकाप्रमुख तथा नगरपरिषदेतील सेनेचे गटनेते बंड्या साळवी, नगराध्यक्ष राहुल पंडित, सेनेचे जिल्हा उपप्रमुख संजय साळवी, शहरप्रमुख बिपीन बंदरकर, पाणी समिती सभापती बावा नागवेकर, सेनेचे सर्व नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते. प्रभाग ३ ब ही शिवसेनेचीच जागा आहे. त्यामुळे या जागेवर शिवसेनेचाच विजय होईल, असा दावा सेनेने केला.सेना-भाजपमध्ये झुंज!रत्नागिरी नगर परिषदेच्या प्रभाग २ ब मध्ये शिवसेना उमेदवार राजन शेट्ये व भाजप उमेदवार वसंत पाटील यांच्यातच खरी झुंज होणार असल्याची चर्चा आहे.या प्रभागात सेना उमेदवार राजन शेट्ये यांनी आधी नगरसेवक असताना अनेक विकासकामे केली आहेत. मात्र भाजपनेही ही जागा प्रतिष्ठेची केली असून सेनेला धूळ चारण्यासाठी राजकीय हालचाली सुरू आहेत.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाRatnagiriरत्नागिरी