शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur News: चुकीचा अर्थ लावून आरळे गाव खालसा, जमिनी परत द्या

By इंदुमती सूर्यवंशी | Updated: July 4, 2023 14:19 IST

जिल्हा प्रशासनाकडे तक्रार : जहागिरी अबॉलेशन ॲक्ट जिल्ह्याला लागू नाही

इंदुमती गणेश कोल्हापूर : जहागिरी अबॉलेशन ॲक्ट १९५३-५४ चा चुकीचा वापर करून तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी आरळे (ता. पन्हाळा) गाव खालसा करून आमच्या हक्काच्या जमिनी सरकार जमा झाल्या आहेत, त्यावर आता अतिक्रमण झाले आहे. आम्हाला आमच्या ३०० एकर जमिनी परत मिळाव्यात, यासाठी गायकवाड घराण्यातील वंशजांकडून जिल्हा प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. या प्रकरणामुळे कोल्हापूर जिल्ह्याला हा ॲक्ट लागू नसल्याची माहिती समोर आली असून असे असेल तर खालसा झालेल्या गावांमधील हक्कदारांना जमिनी परत द्याव्या लागणार आहेत.शासनाने १९५३-५४ साली जहागिरी अबॉलेशन ॲक्टनुसार राज्यातील इनाम गावे खालसा करून जमिनी सरकार हक्कात घेतल्या. त्यात आरळे गावाचाही समावेश आहे. मात्र, जिल्ह्याला हा ॲक्ट लागू नसल्याचे लक्षात आल्यानंतर बबनराव गायकवाड व दीपक गायकवाड यांनी २०११ पासून जिल्हा प्रशासनाकडे याबाबत पाठपुरावा सुरू केला. या चुकीच्या खालस्यामुळे ३०० एकर जमीन सरकार हक्कात जाऊन तिथे अतिक्रमण झाले आहे. हक्कदार कुटुंबांवर अन्याय होऊन ते हलाखीच्या परिस्थितीत जगत आहेत. त्यामुळे त्यांनी आम्हाला जमिनी परत मिळाव्यात, अशी मागणी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.

गायकवाड घराण्याचा इतिहास...गायकवाड घराण्यातील कृष्णाजी गायकवाड हे प्रतापगडाच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराज व अफझलखान भेटीच्या प्रसंगी महाराजांसोबत होते. राजाराम महाराजांचे पुत्र छत्रपती संभाजीराजे यांनी १७४३ साली विश्वासू यशवंतराव गायकवाड यांना पन्हाळा, पावनगड येथील जमिनी सनदा करून दिल्या. आरळे येथील गायकवाड घराण्याच्या १६ वीरांचे लढाईत कामी आल्याबद्दल त्यांचे तेथे परडे पाहायला मिळतात व सती गेलेल्या स्त्रियांच्या शिळा उपलब्ध आहेत.वस्तुस्थितीदर्शक अहवाल मागितलाहे प्रकरण जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आल्यानंतर चुकीच्या पद्धतीने जमिनी खालसा झाल्याचे प्रशासनाच्या लक्षात आले. तत्कालीन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी याप्रकरणाचा चौकशी अहवाल देण्याचा आदेश केला होता. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनीदेखील वस्तुस्थितीदर्शक अहवाल मागितला आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर