शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

राधानगरी अभयारण्यात बहरला फुलपाखरांचा महोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 20:14 IST

ForestDepartment, Radhanagri, Wildelife, Kolhapurnews नजर खिळवून ठेवणाऱ्या, नक्षीदार, नाजूक, अतिशय लहान प्रजातीपासून ते पॅरिस पिकॉकसारख्या दुर्मिळ आणि मनमोहक फुलपाखरांपर्यंतच्या सुमारे ८९ विविध फुलपाखरांच्या जगात शनिवारी रसिक गारुड झाल्याप्रमाणे थबकले होते.

ठळक मुद्दे राधानगरी अभयारण्यात बहरला फुलपाखरांचा महोत्सवदिवसभरात ८९ प्रजातींचे दर्शन : वेगवेगळ्या दुर्मिळ फुलपाखरांनी रिझवले मन

राधानगरी/कोल्हापूर : नजर खिळवून ठेवणाऱ्या, नक्षीदार, नाजूक, अतिशय लहान प्रजातीपासून ते पॅरिस पिकॉकसारख्या दुर्मिळ आणि मनमोहक फुलपाखरांपर्यंतच्या सुमारे ८९ विविध फुलपाखरांच्या जगात शनिवारी रसिक गारुड झाल्याप्रमाणे थबकले होते.जैवविविधतेने समृद्ध असलेल्या राधानगरी अभयारण्य परिसरात बायसन नेचर क्लब आणि वन्यजीव विभागामार्फत दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी फुलपाखरू महोत्सवास प्रारंभ झाला. राज्यातील पहिला फुलपाखरांचा महोत्सव याच ठिकाणी २०१५ मध्ये घेण्यात आला होता. ग्रास यलो, स्ट्राईप टायगर, प्लेन टायगर, कॉमन क्रो, कॉमन फोट टिंग, ब्ल्यू टायगड, ग्रास ज्युअ‍ेल, ब्ल्यूज, रेड पिअरेर, चॉकलेट पेन्सी, कॉमन सेलर, जिजबेल, ऑरेंज स्ट्रीप, लेपर्ड, कॉमन मॉर्मन, डिनाईड एग फ्लाय, पॅरिस पिकॉक यासारख्या अतिशय दुर्मिळ आणि सुंदर फुलपाखरांचे दर्शन आज झाले. दिवसभरात महोत्सव पहायला आलेल्यांना सुमारे ८९ विविध प्रजाती येथे पहायला मिळाल्या.२४ फुलपाखरांचा जीवनक्रम पूर्णराधानगरी येथे वन्यजीव विभागाने ११ गुंठे परिसरात आकर्षक फुलपाखरू उद्यान उभे केले आहे. राज्य वन्यजीव मंडळाचे सदस्य डॉ. सुहास वायंगणकर यांनी फुलपाखरांना आकर्षित करणाऱ्या रोपांची जाणीवपूर्वक लागवड करुन हे उद्यान विकसित केले आहे. या उद्यानात २४ फुलपाखरांचा जीवनक्रम पूर्ण झाला आहे. याची माहीतीही वायंगणकर यांनी दिली आहे.

सकाळच्या सत्रात अभ्यासक,विद्यार्थी,पर्यटकांनी फुलपाखरू भ्रमंती केली. सुनील करकरे, डॉ. सुहास वायंगणकर या वन्यजीव अभ्यासकांकडून फुलपाखरू,पतगविषयी माहितीही देण्यात आली.

या कार्यक्रमास खासदार संजय मंडलिक, आमदार प्रकाश अबिटकर,पंचायत समितीचे माजी सभापती अभिजित तायशेटे, सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे संचालक, मुख्य वन्यजीव संरक्षक समाधान चव्हाण, विभागीय वनाधिकारी विशाल माळी, अमरजा निंबाळकर, सुरेश कुऱ्हाडे, राधानगरीच्या सरपंच कविता शेट्टी, मिथुन पारकर, वनक्षेत्रपाल नवनाथ कांबळे, नामदेव पाटील आदि उपस्थित होते. प्रारंभी स्वागत नेचर क्लबचे अध्यक्ष सम्राट केरकर यांनी केले तर दयानंद सावर्डेकर यांनी आभार मानले. 

टॅग्स :wildlifeवन्यजीवforest departmentवनविभागkolhapurकोल्हापूर