शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

आजरा आगारातून तब्बल २६ दिवसानंतर बस सेवा सुरू, प्रवाशांमधून समाधान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2021 15:08 IST

आजरा आगाराच्या स्थापनेपासून सतत नफ्यात असणारा आजरा डेपो संपामुळे तोट्यात आहे. आगारातून आज तब्बल २६ दिवसानंतर चार बसेस सुरू झाल्या.

आजरा : एसटी महामंडळाचे शासनामध्ये विलिनीकरण करावे यामागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. या संपामुळे एसटीची वाहतूक कोलमटली होती. मात्र, सरकारने कर्मचाऱ्यांच्या मागण्यावर तोडगा काढत चांगली पगारवाढ दिली. तरीही काही कर्मचारी आपल्या मागण्यावर ठाम आहेत. तर कामावर हजर व्हा नाहीतर कारवाईला सामोरे जा अशी सरकारने भूमिका घेतली आहे. यामुळे काही कर्मचारी भितीने कामावर हजर झाले आहेत. परिणामी काही ठिकाणी एसटीची वाहतूक सुरु झाली आहे.कोल्हापूर आगारातूनही काही प्रमाणात एसटीच्या फेऱ्या सुरु झाल्या आहेत. यात आता आजरा आगारातूनही आज तब्बल २६ दिवसानंतर चार बसेस सुरू झाल्या. गडहिंग्लज, देवकांडगाव मार्गासह गवसे, नेसरी, लाटगाव या मार्गावर बाजारगाडी म्हणून बसेस धावल्या आहेत. नागरिकांची होणारी गैरसोय व विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी संप असतानाही चालक-वाहक यांनी एस.टी.सुरू करण्याबाबत सहकार्याची भूमिका घेतली आहे अशी माहिती आगार व्यवस्थापक पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.आजरा आगाराच्या स्थापनेपासून सतत नफ्यात असणारा आजरा डेपो संपामुळे तोट्यात आहे. आगार व्यवस्थापक पृथ्वीराज चव्हाण गेले अनेक दिवस चालक वाहक यांना कामावर हजर होणे बाबत विनंती करीत आहेत. अखेर आज थोड्या प्रमाणात त्याला यश आले आहे. आजरा आगारातून चार बसेस सुरू झाले असून आणखीनही बसेस सुरू करण्याबाबत कर्मचाऱ्यांबरोबर चर्चा सुरू आहे. कर्मचाऱ्यांच्या निलंबनापेक्षा थोड्या प्रमाणात वाहतूक सुरू करण्यात आजरा आगारला यश आले आहे त्यामुळे प्रवासी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे. तर, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारी म्हणून बस स्थानकावर  पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरST Strikeएसटी संप