शहरं
Join us  
Trending Stories
1
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
2
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
3
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
6
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
7
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
8
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
9
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
10
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
11
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
12
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
13
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
14
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
15
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
16
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
17
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
18
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
19
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
20
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     

बसर्गेतील बलात्कारप्रकरणी महागावच्या युवकास अटक

By admin | Updated: August 24, 2014 00:51 IST

‘लोकमत’चा दणका : तरुणाईच्या आंदोलनास यश

गडहिंग्लज : दीड महिन्यापूर्वी बसर्गे येथील महाविद्यालयीन तरुणीवर झालेल्या बलात्कारप्रकरणी संशयित आरोपी भारत शंकर पाटील (वय २६, रा महागाव-धनगरवाडा, ता. गडहिंग्लज) यास पोलिसांनी आज, शनिवारी अटक केली. या प्रकरणास वाचा फोडून ‘लोकमत’ने पोलीस प्रशासनास दिलेला दणका आणि सर्वपक्षीय पक्षसंघटनांनी केलेली नराधमाच्या अटकेची मागणी व दडपणाच्या प्रयत्नांनंतर पाच हजारांवर तरुणांनी काढलेल्या विराट मोर्चाची गंभीर दखल घेऊन अखेर पोलिसांना आरोपीला बेड्या ठोकाव्या लागल्या.पोलिसांतून मिळालेली माहिती अशी : १२ जुलै २०१४ रोजी सकाळी नऊ वाजता बसर्गे-नौकुड मार्गावरील येणेचवंडी फाट्यावर कॉलेजला जाण्यासाठी बसची वाट पाहत थांबलेल्या तरुणीला निळ्या रंगाच्या मोटारीतून आलेल्या युवकाने जबरदस्तीने मोटारीत घालून त्याच परिसरातील नाईक मळ्याकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूच्या सामाजिक वनीकरण विभागाच्या झुडपात नेऊन बलात्कार केला.अत्याचारानंतर तासाभराने शुद्धीवर आलेल्या त्या युवतीने घरी जाऊन घरच्या मंडळींना घडल्या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर तिने स्वत: हलकर्णी पोलीस ठाण्यात या प्रकरणी फिर्याद नोंदविल्यानंतर अज्ञात संशयिताविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि संशयिताचे वर्णन व गुन्ह्यात वापरलेल्या गाडीची माहिती दिली. संशयिताचे रेखाचित्र तयार केले.घटनास्थळी तिची ओढणी, दप्तर, छत्री व ओळखपत्र, आदी साहित्य सापडले; परंतु तिचा मोबाईल गायब होता. पोलीस तपासात तिचा मोबाईल संशयित आरोपीकडे सापडला. घटनेच्या आदल्या दिवशीही तो त्या बसथांब्यावर गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. रेखाचित्राशी मिळताजुळता चेहरा व त्याच्याकडे तिचा मोबाईल सापडल्यामुळे पोलिसांनी संशयित म्हणून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.दरम्यान, पीडित तरुणीचे अपहरण, बलात्कार, मारहाण व धमकी दिल्याप्रकरणी संशयित आरोपीविरुद्ध चार कलमांखाली गुन्हा नोंदविण्यात आला आहे. (प्रतिनिधी)३० मोटारी, ९७ संशयितांची झडतीपीडित युवतीने दिलेल्या माहितीवरून एमएच ०४ - ७० या नंबरमुळे ठाणे पासिंगच्या निळ्या रंगाच्या २५ ते ३० मोटारी आणि रेखाचित्रावरून तब्बल ९७ संशयितांची झडती पोलिसांनी घेतली. मात्र, गुन्ह्यातील मोटारीचे गूढ कायम आहे. खऱ्या आरोपीला वाचविण्यासाठी अजूनही राजकारण सुरू असल्याची चर्चा आहे.महिला आयोग मागणीवर ठामपीडित तरुणीची भेट घडवून देण्याची लेखी मागणी राज्य महिला लोक आयोगाने केली आहे. मात्र, पोलिसांनी ही भेट घडवून न आणल्यामुळे ते आपल्या मागणीवर ठाम आहेत. आयोगाच्या कार्याध्यक्षा अ‍ॅड. वर्षा देशपांडे व कॉ. उज्ज्वला दळवी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने यासंदर्भात आज, शनिवारी पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांची भेट घेऊन चर्चा केली.घटनाक्रम ४१२ जुलै २०१४ : सकाळी नऊच्या सुमारास निळ्या रंगाच्या गाडीतून आलेल्या अज्ञात तरुणाने पीडित तरुणीवर बलात्कार केला.४१९ जुलै २०१४ : बसर्गे प्रकरणासह सहा महिन्यांतील छडा न लागलेल्या ठळक गुन्ह्यांच्या आधारे पोलिसांच्या निष्क्रिय कार्यपद्धतीवर ‘लोकमत’चा प्रकाशझोत.४२१ जुलै २०१४ : ‘लोकमत’चा आॅन दी स्पॉट रिपोर्ट प्रसिद्ध.४२२ जुलै २०१४ : संशियत आरोपीचे रेखाचित्र तयार. ४२३ जुलै २०१४ : पोलीस निरीक्षक इंगवले यांनी तपास स्वत:कडे घेतला.४२५ जुलै २०१४ : आठ दिवसांत प्रकरणाचा छडा लावण्याची गडहिंग्लज येथील इफ्तार पार्टीत पोलीस अधीक्षक मनोज शर्मा यांची ग्वाही.४२६ जुलै २०१४ : तपासासाठी इचलकरंजीचे ‘एलसीबी’ पथक गडहिंग्लजमध्ये दाखल.४३१ जुलै २०१४ : आरोपीच्या अटकेच्या मागणीसाठी प्रांत कचेरीवर सर्वपक्षीय मोर्चा.अटकेची मागणी४२१ जुलै : जनता दल - जनसुराज्य आघाडी, शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, महिला कृती समिती, प्रांत व पोलीस उपअधीक्षकांना निवेदन.४२२ जुलै : राष्ट्रवादी व भाजपतर्फे निवेदन.४२४ जुलै : डॉ. घाळी महाविद्यालयातर्फे १५०० विद्यार्थ्यांच्या स्वाक्षरीसह निवेदन, ओंकार महाविद्यालयात निषेध, आप, भारिप, बहुजन महासंघ व बसर्गेच्या तरुणींचे निवेदन.४२६ जुलै : बसर्गे ग्रामस्थ व गिजवणेच्या तंटामुक्त समितीचे निवेदन.४२७ जुलै : राज्य महिला लोक आयोगाच्या कार्याध्यक्षा अ‍ॅड. वर्षा देशपांडे यांची बसर्गेला भेट.४२९ जुलै : आ. चंद्रकांत पाटील यांची उपअधीक्षकांशी चर्चा.४३१ जुलै : पीडित तरुणीची भेट घडविण्याची मागणी, शिवराज महाविद्यालयाचे प्रांतांना निवेदन.४४ आॅगस्ट : ‘बीसीए’ महिला महाविद्यालयातर्फे पोलिसांना निवेदन.