शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे आंतरराज्य सीमेवर दहन  

By महेश गलांडे | Updated: November 1, 2020 17:40 IST

सीमाभागातील मराठी भाषिकांनी आज काळा दिन पाळला आहे. त्यांना आज मूक फेरी काढण्यास शासनाने परवानगी नाकारली आहे. अशा शासनाचा आम्ही धिक्कार करत आहोत

कोगनोळी : बेळगाव हा कर्नाटक राज्याचा अविभाज्य भाग आहे. सूर्य चंद्र असेपर्यंत तो आमचाच राहील, असे वक्तव्य करणारे कर्नाटक राज्याचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांचा कर्नाटक महाराष्ट्र आंतरराज्य सीमा असणाऱ्या कोगनोळी येथील दूधगंगा नदीजवळ प्रतिकात्मक पुतळा जाळून कोल्हापूर जिल्हा शिवसेनेच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला.

सीमाभागातील मराठी भाषिकांनी आज काळा दिन पाळला आहे. त्यांना आज मूक फेरी काढण्यास शासनाने परवानगी नाकारली आहे. अशा शासनाचा आम्ही धिक्कार करत आहोत. सूर्य चंद्र असेपर्यंत बेळगाव सीमाभाग आमचाच अविभाज्य भाग आहे, असे म्हणणारे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी सूर्य कधी उगवतो ते तरी पाहिला आहे का? त्यांची काम करण्याची पद्धत आम्हाला माहित आहे. त्यांना आमचे आव्हान आहे, आम्ही तुमच्या सीमेवरती येऊन आंदोलन करीत आहोत हिंमत असेल तर रोखून दाखवा. सीमाभागातील मराठी भाषिकांवर अन्याय करणाऱ्या कर्नाटक शासन आणि उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांचा जाहीर निषेध करीत आहोत, असे मत या वेळी जिल्हाप्रमुख विजय देवणे व संजय पवार यांनी व्यक्त केले.     यावेळी महाराष्ट्र पोलिसांच्या वतीने कागल पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय नाळे, पोलीस उपनिरीक्षक निखिल करचे यांच्यासह इतर पोलीस कर्मचारी तर निपाणीचे सर्कल पोलीस निरीक्षक संतोष सत्यनाईक, ग्रामीण पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक बी एस तळवार, पी एम गस्ती, अमर चंदनशिव यांच्यासह इतर पोलिस कर्मचारी आदींनी चोख बंदोबस्त ठेवला होता. यावेळी संभाजी भोकरे, प्रकाश पाटील, बाजीराव पाटील, दिलीप माने, प्रभाकर खांडेकर, आदिनाथ शिंदे, स्मिता सावंत, विद्या गिरी, सागर कुराडे, प्रा सुनिल शिंत्रे यांच्यासह इतर शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पोलिसांनी शिवसैनिकांना कर्नाटक हद्दीत जाण्यापासून रोखले व महामार्गाची किमान एक लेन सुरू ठेवा, असे सांगितल्याने पोलीस आणि शिवसैनिकांमध्ये थोडावेळ वादावादी झाली. 

टॅग्स :Karnatakकर्नाटकChief Ministerमुख्यमंत्रीShiv SenaशिवसेनाYeddyurappaयेडियुरप्पा