महाराष्ट्राचा अवमान केल्याबद्दल मुख्यमंत्री येदियुरप्पा यांच्या पुतळ्याचे दहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:26 AM2021-01-20T04:26:04+5:302021-01-20T04:26:04+5:30

कोल्हापूर : महाराष्ट्र आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा अवमान केल्याबद्दल कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येदियुरप्पा यांच्या पुतळ्याचे मंगळवारी दहन ...

Burning of statue of Chief Minister Yeddyurappa for insulting Maharashtra | महाराष्ट्राचा अवमान केल्याबद्दल मुख्यमंत्री येदियुरप्पा यांच्या पुतळ्याचे दहन

महाराष्ट्राचा अवमान केल्याबद्दल मुख्यमंत्री येदियुरप्पा यांच्या पुतळ्याचे दहन

Next

कोल्हापूर : महाराष्ट्र आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा अवमान केल्याबद्दल कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येदियुरप्पा यांच्या पुतळ्याचे मंगळवारी दहन करून कोल्हापुरातील शिवसैनिकांनी निषेध व्यक्त केला. महाराष्ट्र आणि मुख्यमंत्री ठाकरे यांची बदनामी, अवमान करणे थांबवा, अन्यथा कर्नाटकच्या मंत्र्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही, असा इशारा शिवसैनिकांनी यावेळी दिला.

येथील मिरजकर तिकटी परिसरात मंगळवारी दुपारी शिवसैनिकांच्या वतीने कर्नाटकचे मुख्यमंत्री येदियुरप्पा यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. ‘मुर्दाबाद, मुर्दाबाद येदियुरप्पा मुर्दाबाद’, ‘कन्नड रक्षण वेदिका संघटनेचा धिक्कार असो’, अशा घोषणा देत निदर्शने करण्यात आली. मुख्यमंत्री येदियुरप्पा यांनी महाराष्ट्राबाबत वादग्रस्त विधान केले होते. कन्नड रक्ष‌ण वेदिका संघटनेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा अवमान केला होता. त्याचा आम्ही आज निषेध केला. यापुढे महाराष्ट्र आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची बदनामी अथवा अवमान केल्यास शिवसैनिक हे खपवून घेणार नाही. त्यासह कर्नाटकमधील एकाही मंत्र्याला महाराष्ट्रामध्ये फिरू देणार नाही, असे शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी सांगितले. यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख सुजित चव्हाण, शहरप्रमुख शिवाजी जाधव, अवधूत साळोखे, दत्ताजी टिपुगडे, चंद्रकांत भोसले, संभाजी भोसले, राजू जाधव, प्रवीण पालव, शशी बीडकर, मंजित माने आदींची उपस्थिती होती.

चौकट

बेळगाव महापालिकेवरील ध्वज आम्ही उतरवू

बेळगाव महापालिकेच्या इमारतीवर लावण्यात आलेला लाल-पिवळा रंगाचा ध्वज लवकर उतरविण्यात यावा, अन्यथा गुरुवारी (दि. २१) बेळगाव येथील मोर्चामध्ये कोल्हापुरातील शिवसैनिक सहभागी होऊन हा ध्वज उतरवतील, असा इशारा विजय देवणे यांनी दिला.

फोटो (१९०१२०२१-कोल-शिवसेना निर्दशने) : कोल्हापुरात मंगळवारी मिरजकर तिकटी येथे शिवसैनिकांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येदियुरप्पा यांच्या पुतळ्याचे दहन करून निषेध व्यक्त केला. (छाया : आदित्य वेल्हाळ)

Web Title: Burning of statue of Chief Minister Yeddyurappa for insulting Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.