शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अभाविपचे यल्गार आंदोलन :परीक्षा शुल्काच्या माफीसाठी राज्य सरकारच्या पुतळ्याचे दहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2020 15:52 IST

कोरोनामुळे रद्द करण्यात आलेले परीक्षा शुल्क परत करण्यात यावे, यासह विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (अभाविप) कोल्हापूर शाखेने सोमवारी सकाळी यलगार आंदोलन केले. या परिषदेच्या कार्यकर्त्यांनी शिवाजी विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर निषेधार्थ महाविकास आघाडी सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले.

ठळक मुद्देअभाविपचे यल्गार आंदोलन : शिवाजी विद्यापीठ प्रशासनाचा निषेधपरीक्षा शुल्काच्या माफीसाठी राज्य सरकारच्या पुतळ्याचे दहन

कोल्हापूर : कोरोनामुळे रद्द करण्यात आलेले परीक्षा शुल्क परत करण्यात यावे, यासह विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (अभाविप) कोल्हापूर शाखेने सोमवारी सकाळी यलगार आंदोलन केले. या परिषदेच्या कार्यकर्त्यांनी शिवाजी विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर निषेधार्थ महाविकास आघाडी सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले.

या प्रवेशव्दारात अभाविपच्या कार्यकर्त्यांनी शिक्षण मंत्री तुम एक काम करो, खुर्ची छोडो तुम आराम करो, परीक्षा शुल्क आमच्या हक्काचे, अशा घोषणा देत राज्य शासन आणि विद्यापीठ प्रशासनाचा निषेध केला. त्यानंतर विविध मागण्यांचे निवेदन आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाने कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांना दिले.

या आंदोलनात अभाविपचे महानगरमंत्री ऋषिकेश माळी, सहमंत्री अर्थव स्वामी, करवीर तालुकाप्रमुख सोहम कुऱ्हाडे, जिल्हा कार्यालयमंत्री रेवती पाटील, ऋतुजा माळी, पूर्वा मोहिते, राहुल बुडके, समृध्दी उपाध्ये, आदी सहभागी झाले.अन्य मागण्या१) शिकवणी शुल्क माफ करावे.२) महाविद्यालय विद्यार्थ्यांना वार्षिक शुल्क भरण्यात चार टप्पे द्यावेत.३) बढती दिलेल्या विद्यार्थ्यांना पुर्नमूल्यांकनाची सुुविधा द्यावी.४)जिल्हानिहाय विद्यार्थी तक्रार निवारण केंद्राची स्थापन करावी. 

कोरोनामुळे आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. त्यामुळे शिवाजी विद्यापीठाने शैक्षणिक शुल्क कमी करावे. परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घ्यावा, अशी मागणी अभाविपकडून वारंवार करूनही सरकार आणि विद्यापीठ प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने आम्ही यल्गार आंदोलन केले. या मागण्यांबाबत लवकर निर्णय घ्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आम्ही विद्यापीठ प्रशासनाला दिला आहे.-ऋषिकेश माळी

 

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रShivaji Universityशिवाजी विद्यापीठkolhapurकोल्हापूर