शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

महापुराचा फायदा घेत सात ठिकाणी घरफोडी, पाच लाखांचा ऐवज लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2019 15:17 IST

पंचगंगा नदीला आलेल्या महापुरामुळे जौदाळ-वडणगे (ता. करवीर) येथील नातेवाईकांकडे राहण्यासाठी गेलेल्या पूरग्रस्तांची सात घरे चोरट्यांनी फोडून पाच लाखांचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी करवीर पोलीसांनी गावातील दोघांना अटक केली. संशयित आकाश चव्हाण व धोंडीराम पाटील (रा. वडणगे) अशी त्यांची नावे आहेत.

ठळक मुद्दे जौदाळ वडणगे येथे  चोरट्यांनी साधला डावपाच लाखांचा ऐवज लंपास : गावातील दोघांना अटक

कोल्हापूर : पंचगंगा नदीला आलेल्या महापुरामुळे जौदाळ-वडणगे (ता. करवीर) येथील नातेवाईकांकडे राहण्यासाठी गेलेल्या पूरग्रस्तांची सात घरे चोरट्यांनी फोडून पाच लाखांचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी करवीर पोलीसांनी गावातील दोघांना अटक केली. संशयित आकाश चव्हाण व धोंडीराम पाटील (रा. वडणगे) अशी त्यांची नावे आहेत.पंचगंगा नदीला आलेल्या महापूरामुळे चिखली, आंबेवाडी, वडणगे ही गावे पाण्याखाली गेली होती. घरामध्ये पाणी शिरल्याने लोक घरे, जनावरे सोडून दूसरीकडे स्थलांतरीत झाली होती. वडणगे पैकी जौदाळ येथेही महापुराचे पाणी घुसल्याने येथील रहिवाशी विनोद संपत जौदाळ, बाळासो शिवाजी जौदाळ, माणिक महादेव जौंदाळ, विश्वास महादेव जौंदाळ, बाळासो बापूसो शेलार, जानिक महादेव जौंदाळ, दिलीप राजाराम जौंदाळ यांचेसह अन्य लोक वडणगे येथील नातेवाईकांच्याकडे राहण्यासाठी गेले होते.

याच संधीचा फायदा घेत चोरट्यांनी टायरट्यूबवरुन जाऊन बंद घरे फोडून तिजोरीतील सोन्या, चांदीचे दागिने लंपास केले. पाणी ओसरलेनंतर पूरग्रस्त आपले घरी आलेनंतर चोरीचा प्रकार घडल्याचे लक्षात आले. एका वसाहतीमधील सात घरांमध्ये घरफोडीचा प्रकार घडल्याने करवीर पोलीस भांबावून गेले. नागरिकांतही भिती पसरली.

पोलीसांनी अत्यंत शिताफीने गावातील दोघा चोरट्यांना शोधून काढले. संशयित आकाश चव्हाण व धोंडीराम पाटील अशी त्यांची नावे आहेत. त्यांचेकडे चौकशी केली असता चोरीची कबुली देत ऐवज पोलीसांकडे जमा केला.संशयित चव्हाण हा मजूरीचे कामे करतो. धोंडीराम हा गावच्या मध्यवस्तीमध्ये राहतो. या दोघांनी मिळून चोरी केली असलेचा विश्वास ग्रामस्थांना बसलेला नाही. दोघे सराईत नसून त्यांना अशी बुध्दी कशी सुचली याचे आर्श्चर्य  व्यक्त केले जात आहे. त्यांच्या घरातील लोकांनाही धक्का बसला आहे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर