कोथळीत चोरट्यांचा धुमाकूळ -घरफोडीबरोबरच महिलेचे दागिने हिसडा मारून नेले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:51 IST2021-09-02T04:51:56+5:302021-09-02T04:51:56+5:30

कोथळी येथील अनिल पाटील यांच्या राहत्या घरात अज्ञात तीन चोरट्यांनी दरवाजा ढकलून प्रवेश केला. त्यांच्या आई बबीता पाटील यांच्या ...

Burglary in Kothali - Burglary, woman's jewelery looted | कोथळीत चोरट्यांचा धुमाकूळ -घरफोडीबरोबरच महिलेचे दागिने हिसडा मारून नेले

कोथळीत चोरट्यांचा धुमाकूळ -घरफोडीबरोबरच महिलेचे दागिने हिसडा मारून नेले

कोथळी येथील अनिल पाटील यांच्या राहत्या घरात अज्ञात तीन चोरट्यांनी दरवाजा ढकलून प्रवेश केला. त्यांच्या आई बबीता पाटील यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसडा मारून चोरटे पसार झाले. शिवाय, घरातील शैक्षणिक कागदपत्रे देखील चोरट्यांनी लांबविली. त्याचबरोबर हरिपूर रोडवरील मौला मुजावर यांच्या घराचा कडीकोयंडा कापून घरामध्ये ठेवलेल्या प्लॅस्टिक पिशवीतील तीन हजाराची रोकड लांबविली. मध्यरात्री घडलेल्या या चोरीच्या घटनेमुळे नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, पोलीस उपअधीक्षक रामेश्वर वैजणे, पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांनी पाहणी केली.

चौकट - चोरटे सीसीटीव्हीत कैद

चोरीच्या घटनेनंतर जयसिंगपूर पोलिसांनी तपासयंत्रणा गतिमान केली आहे. घटनास्थळी श्वान व ठसे तज्ञांना पाचारण करण्यात आले होते. गावातील एका सीसीटीव्हीमध्ये तीन संशयित कैद झाले आहेत. त्या दिशेने पोलिसांचा तपास सुरू आहे.

Web Title: Burglary in Kothali - Burglary, woman's jewelery looted