शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
2
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
3
Lenskartच्या आयपीओची ग्रे मार्केटमध्ये धमाकेदार एन्ट्री; प्राईज बँड ते लिस्टिंगपर्यंत जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
4
वैभव खेडेकरांना मोठा धक्का; भाजपात गेलेले अनेक पदाधिकारी महिनाभरातच मनसेत परतले, गड राखणार?
5
तुमचा आजचा मासिक खर्च ३०,००० रुपये असेल, तर निवृत्तीनंतर ही जीवनशैली जगायला किती पैसे लागतील?
6
पोस्टाच्या 'या' स्कीममध्ये जमा करा ₹५०००; मॅच्युरिटीवर मिळेल १६ लाखांपेक्षा अधिक रक्कम, जाणून घ्या
7
‘अमेरिकेत जाण्यासाठी ३५ लाख रुपये खर्च केले, २५ तास बेड्या घालून परत धाडले’, तरुणाने मांडली व्यथा
8
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
9
धक्कादायक! २५ वर्षीय मराठी अभिनेत्याची आत्महत्या, सिनेमाचं रिलीज तोंडावर असताना संपवलं आयुष्य
10
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
11
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
12
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
13
चातुर्मास कधी संपणार? पाहा, विष्णुप्रबोधोत्सव, कार्तिकी एकादशीचे महत्त्व, महात्म्य, मान्यता
14
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
15
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
16
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट
17
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
18
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
19
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
20
टीव्हीवरचं लोकप्रिय कपल, लग्नाच्या १४ वर्षांनी जय भानुशाली-माही विजचा घटस्फोट?

वाघाच्या हल्ल्यात बैल ठार, वनक्षेत्रपालांनी वर्तवली शक्यता, किटवडेत भीतीचे वातावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2021 19:37 IST

या परिसरात वाघाचे वास्तव्य नाही. मात्र चंदगड किंवा आंबोली भागातून आलेल्या वाघाने बैलावर हल्ला केला असण्याची प्रथमदर्शनी शक्यता वनक्षेत्रपाल स्मिता डाके यांनी वर्तवली आहे.

आजरा : वाघाने केलेल्या हल्ल्यात किटवडे (ता. आजरा)  येथील दत्तात्रय झेलू चव्हाण या शेतकऱ्याचा बैल ठार झाला आहे. मंगळवारपासून बेपत्ता असलेला बैल आज कुजलेल्या व सडलेल्या अवस्थेत सापडला. घटनास्थळी वाघाच्या कोणत्याही पाउलखुणा मिळत नाहीत मात्र बैलाची शिकार वाघाने केली असण्याची प्रथमदर्शनी शक्यता असल्याचे वनक्षेत्रपाल स्मिता डाके यांनी वर्तवली आहे. वाघाच्या हल्ल्यामुळे किटवडे परिसरात सध्या भितीचे वातावरण पसरले आहे.किटवडे येथील दत्तात्रय झेंडू चव्हाण यांनी आपली जनावरे आपल्या मालकीच्या क्षेत्रात चारण्यासाठी सोडली होती. मात्र त्यामधील एक बैल गेल्या मंगळवारपासून बेपत्ता होता. त्याची शोधाशोध सुरू होती. आज दुपारी सदरचा बैल जंगल क्षेत्रातील कक्ष क्र. १८४ मध्ये कुजलेल्या व सडलेल्या अवस्थेत आढळून आला.याची माहिती मिळताच वनपाल सुरेश गुरव व वनरक्षक राहुल कांबळे यांनी घटनास्थळी भेट दिली. मृतावस्थेतील बैलाच्या माने जवळील व पाठीमागील भाग घटनास्थळी दिसत नाही. सदरचा बैल कुजलेल्या व सडलेल्या अवस्थेत आहे. या परिसरात वाघाचे वास्तव्य नाही. मात्र चंदगड किंवा आंबोली भागातून आलेल्या वाघाने बैलावर हल्ला केला असण्याची प्रथमदर्शनी शक्यता वर्तवण्यात आली आहे.संबंधित शेतकऱ्याला शासनाकडून नुकसान भरपाई मिळवून दिली जाईल असे वनक्षेत्रपाल स्मिता डाके यांनी सांगितले. या घटनेने मात्र किटवडे, धनगरवाडा, आंबाडे, घाटकरवाडी परिसरात भितीयुक्त वातावरण पसरले आहे.जिल्हा उपवनसंरक्षक घटनास्थळाला भेट देणारआजरा तालुक्यात हत्ती व गवारेड्यांचा धुमाकूळ सुरूच आहे. पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यातच वाघाच्या हल्ल्यात बैल ठार झाल्याने किटवडे येथील घटनास्थळाला जिल्हा उपवन संरक्षक आर. आर. काळे उद्या, मंगळवार (दि २१) भेट देणार असल्याची माहिती वन विभागाने दिली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरTigerवाघ