शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

मोटरसायकलचा आवाज अन् मालकाच्या इशाऱ्यावर धावल्या म्हैशी, शर्यती पाहण्यासाठी कोल्हापूरकरांची मोठी गर्दी 

By संदीप आडनाईक | Updated: November 16, 2023 17:25 IST

कोल्हापूर : हलगीचा कडकडाटात आणि सायलेंन्सर काढलेल्या मोटरसायकलीचा आवाजामागे धावणाऱ्या, शिंगे रंगविलेल्या, मोराचा पिसारा लावून नटवलेल्या आणि दागिन्यांनी मढवलेल्या ...

कोल्हापूर : हलगीचा कडकडाटात आणि सायलेंन्सर काढलेल्या मोटरसायकलीचा आवाजामागे धावणाऱ्या, शिंगे रंगविलेल्या, मोराचा पिसारा लावून नटवलेल्या आणि दागिन्यांनी मढवलेल्या म्हैशी आणि त्यापाठोपाठ म्हैशींच्या उत्साही मालकांची गर्दी असे चित्र दिवाळी पाडव्यादिवशी कोल्हापूरात होते. दरम्यान या शर्यंतीवेळी आमदार सतेज पाटील यांनी स्वत: दुचाकी चालवून प्रोत्साहन दिले.बैलपोळा सोडला, तर शेतात काबाडकष्ट करणाऱ्या जनावरांवर प्रेम व्यक्त करण्यासाठी दुसरा असा दिवस नसतो; पण जनावरांवर प्रेम कसे करावे, याचा अनुभव घ्यायचा असेल तर तो कोल्हापुरात दिवाळीतच मिळतो. कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यामधील विविध गावांमध्ये म्हैशींच्या शर्यती घेतल्या जातात. यंदाही कोल्हापूरातील सागरमाळ येथे रेड्याची टक्करीजवळ म्हैशी आणि रेड्यांचा रिंगण सोहळा पार पडला. कसबा बावडा, शनिवार पेठेतील गवळी गल्ली, पंचगंगा नदी घाट, पाचगाव या ठिकाणीही पार पडलेल्या शर्यती पाहण्यासाठी शहरवासीयांनीही मोठी गर्दी केली होती. मालकांच्या इशाऱ्यावर गौरी, पतंग, बुलेट, बावरी अशी नावे असलेल्या या म्हैशींनी केलेल्या कसरतीने पाहणाऱ्याच्या डोळ्याचे पारणे फेडले.सागरमाळ येथे सतेज उर्फ बंटी पाटील साहेब प्रेमी आणि सागरमाळ रेड्याची टक्कर आयोजित रेड्यांचा आणि म्हैशींचा रिंगण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी आमदार जयश्री चंद्रकांत जाधव, आमदार सतेज उर्फ बंटी पाटील, आमदार ऋतुराज पाटील, गोकुळचे संचालक बाबासाहेब चौगुले, शशिकांत पाटील, प्रकाश पाटील, बयाजी शेळके, आर. के. मोरे, माजी नगरसेवक सर्जेराव साळोखे, काकासाहेब पाटील, समीर कुलकर्णी, सुरेश ढोणुक्षे, उमेश पोवार, संदीप पाटील, राजू साबळे, स्वप्नील राजपूत, स्मिता मांढरे सावंत, अभिजीत जाधव आदी उपस्थित होते.या स्पर्धेत मंगळवार पेठ येथील नारायण चिले, नेर्ली तामगाव येथील संदीप कारंडे, जुना बुधवार पेठ येथील संदीप पाटील यांचे रेडे, वाशी येथील महादेव वाकरेकर, राजारामपुरी येथील गोगा पसारे, मिरज येथील अक्षय गवळी यांच्या म्हैशी आणि मोरेवाडी येथील अनिल मोरे, शिवाजी पेठेतील अभि मोहिते आणि उचगावातील रेडकू यांना बक्षीस देण्यात आले.बावड्यातही उत्साहकसबा बावडा येथील मार्केट परिसरात सकाळपासूनच गर्दी होती. पंचगंगा नदीवर आंघोळ घातल्यानंतर या म्हैशींच्या अंगावर सुंदर नक्षीकाम आणि विविध सामाजिक संदेश लिहिण्यात आले. गळ्यात व पायात घुंगरांची माळ, शिंगांवर मोरपीसे, रंगीत रिबीनीने या म्हैशींना सजविलेले. सायलेंसर काढलेल्या मोठ्या आवाजाच्या मोटरसायकलच्या मागे म्हैशी सुंदर मी होणार या स्पर्धेत धावत होत्या.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर