शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

दारू पिऊन मारणाऱ्या भावाचा इचलकरंजीत डोक्यात दगड घालून खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2018 12:25 IST

इचलकरंजी येथील लंगोटे मळ्यात थोरल्या भावाने धाकट्या भावाचा डोक्यात दगड घालून खून केला. दारू पिऊन मारत असल्याच्या कारणावरून खून केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.  मध्यरात्री घडली घटना पहाटे उघडकीस आली.

ठळक मुद्देइचलकरंजीत डोक्यात दगड घालून भावाचा खूनमारेकरी भावाला पोलिसांनी घेतले ताब्यात दारू पिऊन मारत आल्याच्या कारणावरून खून

कोल्हापूर : इचलकरंजी येथील लंगोटे मळ्यात थोरल्या भावाने धाकट्या भावाचा डोक्यात दगड घालून खून केला. दारू पिऊन मारत असल्याच्या कारणावरून खून केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.  मध्यरात्री घडली घटना पहाटे उघडकीस आली.

नितीन सुभाष मगदूम (वय 32, रा लंगोटे मळा, चिंदके शाळेजवळ, इचलकरंजी) असे ठार झालेल्याचे नाव आहे. याबाबत शिवाजीनगर पोलिसात नोंद झाली असून, पोलिसांनी मारेकरी भाऊ सचिन सुभाष मगदूम (36, रेणुकानगर यड्राव, ता शिरोळ) याला ताब्यात घेतले आहे.याबाबत मिळालेली माहिती अशी, नितीन हा दारू पिऊन स्वतःच्या पत्नीला मारत होता. काल (18) रात्री पुन्हा नितीन व त्याची पत्नी सुमन यांच्यात जोरदार वाद झाला, त्यावेळी नितीनने घरातील भांडीकुंडी विस्कटून सुमन यांना मारहाण केली. त्यावेळी भाऊ सचिन हा तेथे आला त्याने नितीनला जाब विचारला. त्यामुळे दोघांच्यात जोरदार भांडण झाले.

मारेकरी सचिन सुभाष मगदूम

त्यानंतर सचिनने नितीन याला घरातून बाहेर नेले आणि लंगोटे मळा येथे अग्रवाल याच्या घरासमोर गेल्यानंतर त्याच्या डोक्यात दगड घालून ठार मारले. ही घटना मध्यरात्री दिड वाजता घडली. घटनेनंतर सचिन तेथून निघून गेला.

पहाटे फिरायला बाहेर पडलेल्या लोकांनी मृतदेह पाहून पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. प्राथमिक माहितीवरून तात्काळ हालचाली गतिमान करून मारेकरी सचिन याला ताब्यात घेतले.

टॅग्स :MurderखूनCrime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर