शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या सकारात्मक भूमिकेचे मोदींकडून स्वागत; म्हणाले, "भारत आणि अमेरिकेमध्ये..."
2
Ganpati Visarjan: भर पावसात, जल्लोषात गणरायाला निरोप; मुंबईत ढोल-ताशांसह गुलालाची उधळण
3
आजचे राशीभविष्य - ७ सप्टेंबर २०२५, नवीन कामाची सुरूवात करण्यास अनुकूल दिवस
4
ट्रम्प यांची मोठी घोषणा...! 'या' देशांना दिली जाणार टॅरिफ सूट, नवा कार्यकारी आदेश जारी
5
Aryna Sabalenka : बेलारूसच्या सुंदरीनं घरात घुसून घेतला बदला! सलग दुसऱ्यांदा जिंकली US ओपन स्पर्धा
6
पाकिस्तानात क्रिकेट सामन्यादरम्यानच मैदानात बॉम्बस्फोट; एकाचा मृत्यू, अनेक जखमी
7
भारत-रशिया-चीन एकत्र बघून NATOचं टेन्शन वाढलं? युक्रेन युद्धासंदर्भात 'या' नेत्याचं मोठं विधान!
8
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पंतप्रधान मोदींची फ्रान्सच्या अध्यक्षांसोबत चर्चा; मॅक्रॉन म्हणाले...!
9
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार
10
...अन् हिटमॅन रोहित शर्मानं चाहत्यांना हात जोडून केली विनंती; नेमकं काय घडलं? व्हिडिओ व्हायरल
11
विसर्जनासाठी गेलेला 'गणेश' गिरणा पात्रात वाहून गेला, आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच तरुण मुलगा बुडाला... 
12
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
13
भाईंदरमध्ये गणेश मंडळाच्या कार्यकर्त्याचा शॉक लागून मृत्यू 
14
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
15
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
16
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
17
फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर!
18
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
19
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
20
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला

अल्पवयीन मुलीसह दलाल गायब!

By admin | Updated: June 29, 2015 00:21 IST

पोलिसांना झटका : चौकशीसाठी महिला अधिकाऱ्याची नियुक्ती

सांगली : येथील गोकुळनगरजवळील संजय गांधी झोपडपट्टीत पश्चिम बंगालमधील एका १२ वर्षाच्या मुलीसह सापडलेला ‘तो’ दलाल एका रात्रीत या मुलीसह गायब झाला आहे. पोलिसांनी त्याला रविवारी सकाळी चौकशीसाठी बोलाविले होते. मात्र पोलिसांना झटका देत खोलीला कुलूप घालून तो पसार झाल्याने खळबळ उडाली आहे. त्याच्याशी संपर्क साधण्यासाठी पोलिसांची धडपड सुरू आहे. शनिवारी रात्री झोपडपट्टीतील नागरिकांनी या दलालास पकडून त्याच्या ताब्यातून १२ वर्षाच्या मुलीची सुटका केली होती. दलालास चोप देऊन त्यास विश्रामबाग पोलिसांच्या ताब्यात दिले होते. त्यावेळी या भागातील नगरसेवक जगन्नाथ ठोकळे यांच्यासह नागरिक उपस्थित होते. पोलिसांसमोर दलालाने ही मुलगी त्याची पुतणी असल्याचे सांगितले होते. पोलिसांनी यासंदर्भातील पुरावे सादर करण्यास त्यास सांगितले होते. रविवारी सकाळी पुरावे देतो, असे सांगून त्याने तेथून स्वत:ची सुटका करवून घेतली होती. पोलिसांनी या मुलीस सुरक्षिततेसाठी स्वत:च्या ताब्यात न ठेवता पुन्हा दलालाच्याच ताब्यात दिले. दलालास सोडून देताना मोबाईलवर त्याचे साधे छायाचित्रही घेतले नाही. तो सकाळी येईल, या आशेवर पोलीस होते. मात्र तो खोलीला कुलूप ठोकून मुलीस घेऊन रात्रीत गायब झाला.विश्रामबाग पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने न घेतल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रविवारी त्यांची चांगलीच कानउघाडणी केली. तसेच या प्रकरणाची चौकशी करण्याचे काम महिला पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. पत्की यांनी दुपारी पोलीस ठाण्यास भेट देऊन या प्रकरणाची सर्व माहिती घेतली. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशीही त्यांनी संवाद साधून आणखी माहिती घेण्याचा प्रयत्न केला. झोपडपट्टीतील रहिवाशांकडेही चौकशी केली. तेथील काही नागरिकांनी, हा दलाल पश्चिम बंगालमधील मुलींची वेश्या व्यवसायासाठी तस्करी करीत होता, असे सांगितले, तर काहींनी तो चांगला माणूस आहे, अशी माहिती दिली. त्यानुसार या नागरिकांचे जबाब नोंदवून घेतले आहेत. पण हा दलाल सापडला नाही. त्याचा शोध सुरू असल्याचे सांगण्यात आले. दिवसभर चौकशीचे कामकाज सुरू होते, मात्र त्याचा सुगावा लागू शकला नाही. (प्रतिनिधी)तस्करीत दोघे सक्रिय मुलीसह पळून गेलेल्या दलालाचा आणखी एक साथीदार मुलींच्या तस्करीत सक्रिय असल्याची माहिती मिळाली. पण यासंदर्भात आम्हाला काहीच माहिती नाही, अशी भूमिका पोलिसांनी घेतली आहे. हे दोन्ही दलाल कोण? त्यांचा झोपडपट्टीत भाड्याने खोली घेऊन राहण्याचा काय उद्देश? याची चौकशी होण्याची गरज आहे.अक्षम्य हलगर्जीपणावेश्यावस्तीनजीक एका अल्पवयीन मुलीसह परप्रांतीय व्यक्ती आढळते आणि पोलीस अक्षरश: डोळे झाकून त्याच्यावर ‘विश्वास’ ठेवून संबंधित मुलीला त्याच्याकडेच सोपवून बाहेर पडतात, यासारखा मोठा हलगर्जीपणा नाही. हा हलगर्जीपणाच की ‘आणखी काही?’ याबाबतही गांभीर्याने चौकशी होण्याची गरज आहे.