शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

पन्हाळ्याच्या तटबंदीत सापडला ब्रिटिश कालीन तोफगोळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2022 18:06 IST

ही माहिती सर्वत्र पसरताच तोफगोळा पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली. अंधारबाव परीसरातील तटबंदीत सापडलेला हा लोखंडी तोफगोळा बाहेर काढून पुरातत्व विभागाकडे देण्यात आला.

पन्हाळा : पन्हाळ्यावर शिवदुर्ग प्रतिष्ठानच्यावतीने तटबंदीची स्वच्छता करत असताना लोखंडी फुटका तोफगोळा भिंतीत सापडला. या तोफगोळ्याचे वजन २.७६६ कि.ग्रॅ. भरले. ही माहिती सर्वत्र पसरताच तोफगोळा पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली. अंधारबाव परीसरातील तटबंदीत सापडलेला हा लोखंडी तोफगोळा बाहेर काढून पुरातत्व विभागाकडे देण्यात आला.प्रत्येक सोमवारी कासारवाडी व टोप येथील तरुण रोहन चेचरे, सौरभ मुळीक, संग्राम लुगडे, सौरभ पोवार,प्रथमेश लुगडे, प्रतीक शिंदे, ओंकार जाधव, दिपक मुळीक, प्रताप वरिंगे, ऋषिकेश कुशिरे, गौरव शिंदे, सागर कोळेकर, विकी भोसले, बारक्या सुतार, पन्हाळा तटबंदी व परीसर पुरातत्व विभागाच्या परवानगीने स्वच्छ करत असतात. आज, अंधारबाव परीसरातील तटबंदीची स्वच्छता करताना त्यांना लोखंडी तोफगोळा दिसला.याबाबत पुरातत्व संशोधक सचिन भगवान पाटील यांनी सांगितले की, पन्हाळा किल्ल्याच्या तीन दरवाजा परिसरात इमारती पाडण्यासाठी १८४४ साली तोफखान्याचा मारा झाला. आजही तीन दरवाजाच्या बाहेरील बाजूच्या दरवाजाच्या कमानीवर तोफगोळ्यांचा मारा झाल्याच्या काही खुणा स्पष्ट दिसतात.काही अभ्यासकांच्या मते दरवाजावरील तोफेच्या माऱ्याची खूण ही पन्हाळा किल्ल्यावर सिद्दी जौहरने घातलेल्या वेढ्यातील इंग्रज अधिकारी हेली रेव्हिंग्टनने राजापुरातून आणलेल्या तोफांची आहे, पण सन १६६० मध्ये इंग्रज सैन्याकडील तोफखाना इतका अद्ययावत नव्हता. सन १८४४ साली इंग्रजांनी वापरलेल्या तोफा या अद्ययावत व लांब पल्ल्यावर मारा करणाऱ्या व लोखंडी तोफगोळे त्यांच्याकडे होते. त्यामुळे तीन दरवाजावरील जी तोफेच्या माऱ्याची खूण आहे, ती सन १८४४ च्या युद्धातील ब्रिटिश सैन्याच्या किल्ल्यावरील कार्यवाह्या व त्यांची काही रेखाचित्रे भारताचा इतिहास व १९व्या शतकातील  युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका येथील ब्राऊन मिलिटरी कलेक्शन या मथळ्याखाली ब्राऊन युनिव्हरसिटी येथील संशोधनातून हे सिद्ध होत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर