शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

जरगनगरातील पुलाला भगदाड, रस्ता खचला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2020 19:39 IST

जरगनगर ते जोतिर्लिंग कॉलनी रस्त्यावर असलेल्या पुलाला मंगळवारी सायंकाळी झालेल्या जोरदार पावसामुळे भगदाड पडले, तसेच पुलावरील अर्ध्याहून अधिक रस्ता उखडला. त्यामुळे हा रस्ता बुधवारपासून वाहतुकीस बंद ठेवण्यात आला.

ठळक मुद्देजरगनगरातील पुलाला भगदाड, रस्ता खचलारस्ता बुधवारपासून वाहतुकीस बंद

कोल्हापूर : जरगनगर ते जोतिर्लिंग कॉलनी रस्त्यावर असलेल्या पुलाला मंगळवारी सायंकाळी झालेल्या जोरदार पावसामुळे भगदाड पडले, तसेच पुलावरील अर्ध्याहून अधिक रस्ता उखडला. त्यामुळे हा रस्ता बुधवारपासून वाहतुकीस बंद ठेवण्यात आला.मंगळवारी सायंकाळी सात वाजल्यापासून शहरात ढगफुटीसदृष्य पाऊस झाला. त्यामुळे सर्वत्र पाण्याचे लोंढे लागले होते. देवकर पाणंद, रामानंदनगर, नाळे कॉलनी, म्हाडा कॉलनी, विद्याविहार, सानेगुरुजीतील महादेवनगर या परिसरात अनेक घरांतून पाणी शिरले.ज्योतिर्लिंग कॉलनी ते जरगनगर या रस्त्यावर पाच वर्षांपूर्वी बांधलेल्या पुलाला मंगळवारच्या पावसामुळे मोठे भगदाड पडले. पाच फूट उंचीचे आठ मोठे नळे या पुलाखाली घालण्यात आले आहेत. ओढ्याला मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने काही झाडे उन्मळून पडली. ती या ओढ्यातून वाहत पुढे आली ती पुलाखालील नळ्यात अडकली. त्यामुळे पाण्याने आपला प्रवाह बदलला. पुलावरील रस्ता उखडला गेला. अनेक ओढ्या लागतच्या अनेक घरांत पाणी शिरले.पुलाच्या बांधकामाचा पंचनामा मंगळवारच्या पावसाने केला. येथील नागरिकांनी दर्जाबाबत शंका उपस्थित केल्या होत्या. त्या मंगळवारच्या पावसाने खऱ्या ठरल्या. बुधवारी सकाळी शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांच्यासह नगरसेविका गीता गुरव, नगरसेवक सुनील पाटील, माजी नगरसेवक मधुकर रामाणे यांनी सदर पुलाची पाहणी केली. त्यावेळी तेथील नागरिकांनी पुलाच्या बांधकामाबाबत तीव्र आक्षेप घेतला. सध्या हा रस्ता बंद ठेवण्यात आला आहे.कोल्हापूर शहरात मंगळवारी सायंकाळी सातनंतर झालेल्या जोरदार पावसामुळे जरगनगर ज्योतिर्लिंग कॉलनी रस्त्यावरील पुलाला भगदाड पडले, तसेच बाजूचा रस्ताही उखडला.

टॅग्स :Rainपाऊसkolhapurकोल्हापूर