शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेना आक्रमक : घरफाळा भ्रष्टाचाराचा भांडाफोड ; फौजदारीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2020 01:15 IST

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय भोसले व विजय देवणे यांनी अधिकाºयांना धारेवर धरले. चौकशी करणार कधी, फौजदारी दाखल करणार कधी तेच आधी सांगा, अशी मागणी पवार यांनी केली. अधिका-यांची थातुरमातुर उत्तरे ऐकल्यावर शिवसैनिकांनी या तिन्ही अधिकाºयांना ‘तुम्हाला आम्ही मिळकती दाखवितो, तुमच्यासमोर भांडाफोड करतो,’ असे सांगत या तिघांना व्हीनस कॉर्नर येथील एका इमारतीत नेले.

ठळक मुद्देअधिकाऱ्यांना प्रत्यक्ष जागेवर नेऊन दाखविल्या मिळकती

कोल्हापूर : महानगरपालिका घरफाळा विभागातील भ्रष्टाचाराबाबत संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोप करीत आक्रमक शिवसैनिकांनी दोन मिळकतींचा घरफाळा चुकीचा आकारल्याचा भांडाफोड केला. उपायुक्त, सहायक आयुक्त व करसंग्राहक अशा तीन वरिष्ठ अधिकाºयांना शिवसैनिकांनी प्रत्यक्ष जागेवर नेऊन दोन मिळकतींचा घरफाळा आकारणीत कशा चुका केल्या आहेत, याची माहिती दिली.

ज्यांनी जाणीवपूर्वक मोठ्या करदात्यांचा घरफाळा कमी करून महानगरपालिकेचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान केले आहे, अशा सर्व अधिकाºयांवर आठ दिवसांत फौजदारी कारवाई केली नाही, तर शिवसेनेतर्फे न्यायालयात खासगी फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा यावेळी जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी दिला.महानगरपालिका घरफाळा विभागात भ्रष्टाचार झाला असून, काही अधिकाºयांनी वेगवेगळ्या प्रकारच्या नोंदी करून पालिकेचे मोठे आर्थिक नुकसान केले आहे, त्याची चौकशी करावी म्हणून दीड महिन्यापूर्वी आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांना भेटून निवेदन, तसेच काही कागदोपत्री पुरावे दिले होते; परंतु प्रशासनाने दीड महिन्यात चौकशी समिती नियुक्त करण्यापलीकडे काहीच केलेले नाही. या चौकशी समितीने अद्याप चौकशीही सुरू केलेली नाही. त्यामुळे संतप्त शिवसैनिकांनी सोमवारी आयुक्त कलशेट्टी यांना भेटण्याचा निर्णय घेतला होता.

आयुक्त नसल्याने प्रभारी उपायुक्त धनंजय आंधळे यांना शिवसैनिकांचे शिष्टमंडळ भेटले. तेव्हा सहायक आयुक्त संजय सरनाईक, करनिर्धारक संजय भोसले उपस्थित होते. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय भोसले व विजय देवणे यांनी अधिकाºयांना धारेवर धरले. चौकशी करणार कधी, फौजदारी दाखल करणार कधी तेच आधी सांगा, अशी मागणी पवार यांनी केली. अधिका-यांची थातुरमातुर उत्तरे ऐकल्यावर शिवसैनिकांनी या तिन्ही अधिकाºयांना ‘तुम्हाला आम्ही मिळकती दाखवितो, तुमच्यासमोर भांडाफोड करतो,’ असे सांगत या तिघांना व्हीनस कॉर्नर येथील एका इमारतीत नेले.

व्हीनस कॉर्नर चौकातील एका बॅँकेसमोर या अधिकाºयांना नेले. मिळकतीमध्ये बॅँकेचे कार्यालय असल्याने त्याचा वापर हा व्यावसायिक कारणासाठी होत असल्याचे स्पष्ट झाले. त्यांना भाड्याची विचारणा केली तेव्हा महिन्याला एक लाख ७५ हजार रुपये भाडे असल्याचे बॅँक व्यवस्थापकाने सांगितले; परंतु महापालिका दफ्तरी त्याची नोंद मालक वापर असून, घरफाळा कमी असल्याची बाब उघड झाली. आणखी एक हॉस्पिटलचाही घरफाळा चुकल्याची बाब निदर्शनास आली. करनिर्धारक भोसले यांनी घरफाळ्याची आकारणी करण्यात चूक झाल्याचे कबुल केले. यावेळी सुजित चव्हाण, शिवाजीराव जाधव, मेघा पेडणेकर, शुभांगी पोवार,  स्मिता सावंत, अवधूत साळोखे, शशिकांत बिडकर, राजू यादव यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  • गुन्हे दाखल करण्याचा आग्रह

शिवसैनिकांनी घरफाळा भ्रष्टाचारास जो कोणी जबाबदार त्यांच्यावर तत्काळ फौजदारी गुन्हा दाखल करा, असा आग्रह तिन्ही अधिकाऱ्यांकडे धरला होता. पोलीस अधीक्षकांकडे चला आम्ही तुमच्या सोबत येतो, असेही सुजित चव्हाण यांनी सांगितले; परंतु महापालिका प्रशासनास एक प्रक्रिया राबवावी लागणार आहे.सध्या चौकशी सुरू असून, ती झाल्याशिवाय गुन्हे दाखल करता येणार नाहीत, असे संजय भोसले यांनी सांगितले. आठ दिवसांत ही चौकशी संपवा; अन्यथा आम्ही फौजदारी दाखल करू, असा इशारा संजय पवार यांनी दिला.

 

  • आयुक्तांनी नैतिक जबाबदारी स्वीकारावी

घरफाळा विभागातील भ्रष्टाचाराची नैतिक जबाबदारी स्वीकारून आयुक्त कलशेट्टी यांनी बदली करून घेऊन येथून निघून जावे, अशी मागणी विजय देवणे यांनी केली. शहरात एकीकडे विकासकामांना पैसे नाहीत आणि दुसरीकडे अधिकारी पालिकेचे अशा पध्दतीने नुकसान करीत आहेत, असा आरोपही देवणे यांनी केला.

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMuncipal Corporationनगर पालिका