शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

उद्यानांच्या दुरवस्थेने गुदमरतोय शहराचा श्वास

By admin | Updated: September 22, 2015 00:31 IST

. उद्यानांची देखभाल-दुरुस्ती करण्यासाठी महापालिकेची स्वतंत्र यंत्रणा उभारणे, पूर्णवेळ अधीक्षक, मनुष्यबळाची आवश्यकता

शहरात महापालिकेच्या हद्दीत लहान-मोठी अशी सुमारे ५४ सार्वजनिक उद्याने आहेत. पर्यावरणाच्या आनुषंगाने वाढते प्रदूषण रोखण्यासाठी वृक्षसंवर्धनाची तितकीच गरज निर्माण झाली आहे. शहराची हद्दवाढ न झाल्याने सध्याच्या क्षेत्रातच वाढत्या सिमेंटच्या जंगलामुळे वातावरणाचा समतोल साधणे दिवसेंदिवस अवघड जात आहे. त्यामुळे आज शुद्ध हवा मिळणे मुश्कील होत आहे. त्यासाठी उद्यानांची संख्या, विविध वृक्षांची संख्या वाढविणे, तसेच वृक्षसंवर्धनाची गरज निर्माण झाली आहे. उद्यानांची देखभाल-दुरुस्ती करण्यासाठी महापालिकेची स्वतंत्र यंत्रणा उभारणे, पूर्णवेळ अधीक्षक, मनुष्यबळाची आवश्यकता आहे. तानाजी पोवार -- कोल्हापूरकोल्हापूर महानगरपालिकेची हुतात्मा पार्क, महावीर उद्यान, रंकाळा उद्यान, शाहू उद्यान, सिद्धाळा उद्यान, सम्राटनगर उद्यान, कसबा बावडा येथील आंबेडकर उद्यान, आदी एकूण सुमारे ५४ सार्वजनिक उद्याने आहेत. सर्वसाधारण ९० एकर क्षेत्रामध्ये या उद्यानांची व्याप्ती दिसून येत आहे. विशेष म्हणजे ही सर्व उद्याने भर मध्यवस्तीत असल्याने यांना विशेष महत्त्व आहे. ज्येष्ठ नागरिकांना विरंगुळा, लहान मुलांना खेळण्या-बागडण्यासाठी या उद्यानांना विशेष महत्त्व आहे. उद्यानाच्या दुरुस्ती-देखभालीवर प्रतिवर्षी सुमारे दोन कोटी रुपये खर्च केला जातो, तर कर्मचाऱ्यांच्या पगारावर सुमारे साडेपाच कोटी रुपये आस्थापना खर्च पडतो; पण उद्यान विकसित करण्यासाठी स्वतंत्र बजेटची सोय नसते, त्यासाठी महापालिकेच्या वार्षिक अर्थसंकल्पातच तोकडी तरतूद केलेली आहे. या उद्यानामध्ये ट्रॅफिक आयलँड बगीचे १५ व शहरी वने १३ आहेत. तसेच शहरातील प्रत्येक प्रभागात आरक्षित असणाऱ्या २५ खुल्या जागा त्या-त्या नगरसेवकांनी उद्यानासाठी विकसित केले आहेत. त्यासाठी महापालिकेच्या अर्थसंकल्पात उद्यानासाठी तरतूद केलेल्या रकमेव्यतिरिक्त प्रभागांसाठी मिळणाऱ्या निधीतून या उद्यानांवर खर्च केला जातो. हा प्रभागवार उद्यानांवर पडणारा खर्चही तोकडाच आहे. या उद्यान विभागासाठी खर्चासाठी प्रतिवर्षी स्वतंत्र रकमेची तरतूद करण्याची आवश्यकता आहे. उद्यान विभागामार्फत प्रतिवर्षी सुमारे ५० हजार नवीन झाडे संपूर्ण शहरात लावली जातात. १९७३ पासून १९९९-२००० पर्यंत एकूण सुमारे दहा लाख लावलेल्या झाडांचे संगोपन करण्यात आलेले आहे.शहरात सिमेंट काँक्रिटच्या वाढत्या इमारती, आय.आर.बी.ने शहरात केलेले काँक्रिटचे रस्ते त्यामुळे वातावरणात उष्म्याची कमालीची वाढ होत आहे. त्यासाठी वृक्षलागवडीमध्ये वाढ होणेही गरजेचे आहे. उद्यान आणि वृक्षांच्या कमतरतेने शहराचा श्वास गुदमरत चालला आहे.ज्याप्रमाणे उद्यान विकसितची जबाबदारी उद्यान विभागावर असली तरी वृक्ष प्राधिकरणाचीही जबाबदारी याच विभागावर आहे. यासाठी नेमलेल्या कमिटीमार्फत शहरातील धोकादायक वृक्षांची, फांद्याची तोड करण्याचीही जबाबदारी याच विभागावर आहे. सिद्धाळा बागेमध्ये लहान मुलांसाठी स्वतंत्र तीन खोल्यामध्ये गोष्टींच्या पुस्तकांची लायब्ररी व खेळणी संग्र्रहालय होते; पण ही लायब्ररी गेल्या आठ वर्षांत बंद पडली आहे. तसेच महावीर उद्यान येथील मत्स्यालय कबुतरखान्याकडेही प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे हा विभागही बंद पडण्याच्या मार्गावर आहे. पूर्णवेळ अधीक्षकांची वानवाउद्यान विभागाला नेहमीच पूर्णवेळ अधीक्षकांची वानवा आहे. यापूर्वी उदय सावंत यांनी चार वर्षे पूर्णवेळ अधीक्षक म्हणून काम पाहिले; पण गेल्या वर्षभरात उद्यान विभागाला ग्रहण लागले आहे. सध्या हे पद कंत्राटी पद्धतीवर भरले आहे. विशेष म्हणजे, या विभागाला पूर्णवेळ अधीक्षक नसल्याने विभागाकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे नेहमीच दुर्लक्ष राहिले आहे.खर्चया उद्यानांमध्ये असणाऱ्या सुमारे २१२ कर्मचाऱ्यांवर २०१४-१५ मध्ये वेतनासाठी सुमारे ५ कोटी ६३ लाख रुपये खर्च करण्यात आला आहे, तर उद्यानावरील देखभाल दुरुस्तीसाठी सुमारे दीड कोटी रुपये खर्च केला आहे. उद्यानातील बेंच, लहान मुलांची खेळणी बदलण्यासाठी सुमारे ६१ लाख रुपये खर्च करण्यात आला आहे. या ६१ लाख रुपयांमध्ये प्रत्येक प्रभागासाठी सुमारे ७५ हजार रुपये देण्यात आले आहेत. या रकमेत खेळण्यांसह त्या-त्या प्रभागातील आरक्षित खुल्या जागा उद्यानासाठी विकसित करण्यासाठी, कंपौंड बांधणे, आदी कामे करण्यात आली आहेत.काय करावे लागेलशहरातील बहुतांश पुतळे एकत्रित एखाद्या उद्यानात बसवून ते ‘म्युझियम पार्क’ म्हणून विकसित करता येईल.औषधी वनस्पतींची स्वतंत्र लागवड करून आॅक्सिजन पार्कची निर्मिती आवश्यकशहरातील सर्वच उद्यानांमध्ये मॉर्निंग वॉकसाठी पदपथ होणे गरजेचेकर्मचारी संख्या वाढविणे गरजेचेपूर्णवेळ उद्यान अधीक्षकांची नेमणूक करणे अत्यंत आवश्यकमहापालिका प्रशासनानेही उद्यान जतन करण्याकडे गांभीर्याने पाहावे.त्या-त्या प्रभागांतील नगरसेवकाने परिसरातील उद्यानाकडे विकसित करण्यासाठी लक्ष देण्याची आवश्यकता आहे.वॉचमन की माळीकर्मचाऱ्यांची अपुरी संख्या विचारात घेता सुमारे ५४ सार्वजनिक उद्यानांतील सुरक्षा व्यवस्थेचा कार्यभार अवघ्या २८ वॉचमनवर आहे. हे वॉचमनचे काम प्रतिदिन तीन पाळीत चालते. अपुऱ्या वॉचमनच्या संख्येमुळे माळी काम करणाऱ्या अनेक कर्मचाऱ्यांनाही वॉचमनची ड्यूटी बजावावी लागत आहे.