शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

कोवाडमधील अभय पतसंस्थेची धाडसी घरफोडी उघडकीस, तिघे अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2020 16:54 IST

चंदगड तालुक्यातील कोवाडमधील अभय ग्रामीण सहकारी पतसंस्थेतील धाडसी घरफोडी स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने अवघ्या १५ दिवसांत उघडकीस आणली. यामध्ये पोलिसांनी चोरीला गेलेल्यांपैकी सुमारे २० लाखांचे ३९० ग्रॅम सोन्याचे दागिने चोरट्याकडून हस्तगत केले.

ठळक मुद्देकोवाडमधील अभय पतसंस्थेची धाडसी घरफोडी उघडकीस, तिघे अटक वीस लाखांचे ३९० ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त; स्थानिक गुन्हे अन्वेषणची कामगिरी

कोल्हापूर : चंदगड तालुक्यातील कोवाडमधील अभय ग्रामीण सहकारी पतसंस्थेतील धाडसी घरफोडी स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने अवघ्या १५ दिवसांत उघडकीस आणली. यामध्ये पोलिसांनी चोरीला गेलेल्यांपैकी सुमारे २० लाखांचे ३९० ग्रॅम सोन्याचे दागिने चोरट्याकडून हस्तगत केले.

या प्रकरणी पोलिसांनी महेश ऊर्फ पिंटू सुबराव कोले (वय ३७, रा. नेसरी रोड, कोवाड, ता. चंदगड), सुनील ऊर्फ जान्या रामा तलवार (२२ रा. रणजितनगर, कोवाड), संतोष ऊर्फ राजू ज्ञानेश्वर सुतार (२५ रा. सुतार गल्ली, चिंचणे, ता. चंदगड) यांना अटक केली.पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, कोवाड येथील अभय ग्रामीण सहकारी पतसंस्थेचे कुलूप अज्ञाताने तोडून, संस्थेतील लॉकर गॅस कटरने कापून तब्बल ७५० ग्रॅम सोन्याचे दागिने लांबविले होते. याबाबत दि. १२ सप्टेंबर रोजी चंदगड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली. संस्थेत सर्वसामान्य लोकांनी आपल्या आर्थिक अडचणींकरिता आपले सोन्याचे दागिने गहाण ठेवून कर्ज काढले होते. तेच दागिने चोरीला गेल्याने कर्जदार हवालदिल झाले होते.याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाचे प्रमुख पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यराज घुले यांनी पोलीस पथके तयार करून चंदगड भागात तपास केला.

पथकातील हे. कॉ. श्रीकांत मोहिते यांना मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी कोवाड येथून महेश कोले याला ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यावेळी त्याचे साथीदार सुनील तलवार व संतोष सुतार यांनी ही घरफोडी केल्याची कबुली दिली.

पोलिसांनी कोले या संशयिताच्या घरातून चोरीचे दागिने जप्त केले. त्यामध्ये सोन्याचे गंठण, सोन्याच्या चेन, अंगठ्या, नेकलेस, टॉप्स, कानवेल, मोहनमाळ, पुतळी अशा एकूण सुमारे ३९० ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांचा समावेश आहे. तिन्हीही आरोपींना मुद्देमालासह चंदगड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर