शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

चेंबरसह सर्व संस्थांचा चिनी वस्तूंवर बहिष्कार, देशव्यापी अभियानाला कोल्हापुरातून सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2020 16:44 IST

चेंबर ऑफ कॉमर्स ॲण्ड इंड्रस्ट्रीजसह सर्व व्यावसायिकांच्या संघटनांनी मंगळवारी चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचा निर्धार केला.

ठळक मुद्देचेंबरसह सर्व संस्थांचा चिनी वस्तूंवर बहिष्कार, देशव्यापी अभियानाला कोल्हापुरातून सुरुवातचीनच्या वस्तू विक्री न करण्याचा व्यापारी, व्यावसायिकांचा निर्धार

कोल्हापूर : चेंबर ऑफ कॉमर्स ॲण्ड इंड्रस्ट्रीजसह सर्व व्यावसायिकांच्या संघटनांनी मंगळवारी चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचा निर्धार केला.

नवी दिल्ली येथील कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (कॅट) यांच्या भारतीय सामान  हमारा अभिमान व चिनी वस्तूंवर बहिष्कार या देशव्यापी अभियानाची सुरुवात कोल्हापुरातून करण्यात आली. आमदार चंद्रकांत जाधव, कॅटचे उपाध्यक्ष धैर्यशील पाटील व संघटन सचिव ललित गांधी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शिवाजी चौक येथून अभियान सुरू झाले. चीनच्या वस्तू खरेदी अथवा विक्री न करण्याचा निर्धार यावेळी केला. कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष संजय शेटे यांच्या अध्यक्षतेखाली ही मोहीम राबविण्यात आली.चेंबर ऑफ कॉमर्सचे मानद सचिव वैभव सावर्डेकर, राजू पाटील, संचालक राहुल नष्टे, तौफिक मुल्लाणी, प्रकाश केसरकर, धनाजी पाटील, महेश धर्माधिकारी, उदयसिंह निंबाळकर, विनोद डुणुंग, शिवानंद पिसे, आदी उपस्थित होते.कोल्हापुरातून चायनीज वस्तू हद्दपारदि कंझ्युमर्स प्रॉडक्टस् डिस्ट्रिब्युटर्स वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष प्रशांत शिंदे, किराणा भुसार व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीपभाई कापडिया यांनी ह्यकोणत्याही किराणा दुकानात येथून पुढे चायनीज माल दिसणार नाही, असे स्पष्ट केले. स्टोन ट्रेडर्स असोसिएशनचे अध्यक्ष धनंजय दुग्गे, आय. टी. असोसिएशन ऑफचे अध्यक्ष शांताराम सुर्वे, इलेक्ट्रिकल असोसिएशनचे अध्यक्ष अजित कोठारी, रेडिओ इलेक्ट्रॉनिक्स डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष अनिल धडाम, टॉयज बॅग्ज व कटलरी असोसिएशनचे अध्यक्ष जयंतभाई गोयानी, कापड व्यापारी संघाचे अध्यक्ष संपत पाटील, ग्रेन मर्चंट‌्स असोसिएशनचे अध्यक्ष अभयकुमार अथणे, प्लायवूड असोसिएशनचे अध्यक्ष, संजय पाटील यांनीही चीनच्या वस्तूंवर बहिष्कार असल्याचे सांगितले.कोल्हापुरी चपलांना प्राधान्यकोल्हापुरी चप्पलला जास्तीत जास्त मागणी कशी राहील यासाठी प्रयत्न करणार व चप्पल विक्रेत्यांकडून चायनीज चप्पल विकले जाणार नाही.असे जिल्हा फूटवेअर्स असोसिएशनचे अध्यक्ष शिवाजीराव पोवार यांनी स्पष्ट केले.शहरात फलक उभारणारचिनी मालाची पाच लाख कोटी होणारी वार्षिक आयात ३१ डिसेंबरपर्यंत एक लाख कोटींनी कमी करणे हे उद्दिष्ट आहे. कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या वतीने यासाठी ग्राहकवर्गात फलक लावून प्रबोधन करणार असल्याचे संजय शेटे यांनी सांगितले.मेनूकार्डवरून चायनीज गायबचेंबरचे माजी अध्यक्ष आनंद माने, हॉटेल मालक संघाचे अध्यक्ष उज्ज्वल नागेशकर यांनी हॉटेलमधील मेनूकार्डामध्ये चायनी पदार्थाचे नाव असणार नाही. तसेच चायनीज पदार्थ तयार केले अथवा विकले जाणार नाहीत, असा निर्धार केला. यावेळी हॉटेलमधील चिनी पदार्थांच्या मेनूकार्डची होळी करण्यात आली. 

टॅग्स :chinese dragonचिनी ड्रॅगनkolhapurकोल्हापूर