शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
2
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
3
सलवार सूट घातला, त्यावर बुरखा चढवला अन् महिला डॉक्टरच्या घरात घुसून ७ वेळा चाकूने वार केला; नेमकं प्रकरण काय?
4
अरे ही कसली आई! १५ महिन्यांच्या लेकाला बस स्टँडवर सोडलं अन् इन्स्टा बॉयफ्रेंडसोबत पळाली
5
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
6
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
7
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश
8
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
9
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
10
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
11
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
12
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
13
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
14
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
15
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
16
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
17
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
18
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
19
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
20
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप

तरुणाच्या खूनप्रकरणी दोघे अटकेत

By admin | Updated: February 23, 2015 23:55 IST

मिरजेतील घटना : खुनाची कबुली; अनैतिक संबंधाच्या रागातून कृत्य

मिरज : मिरजेत अक्रम मुख्तार शेख (वय २६) या तरुणाचा गोळ्या झाडून व कोयत्याने वार करून खून केल्याप्रकरणी अमीर गौस पठाण (२४, रा. शंभरफुटी रस्ता, मिरज), मोअज्जम हुसेन शेख (२२, तानाजी चौक, मिरज) या दोघांना मिरज शहर पोलिसांनी अटक केली. अनैतिक संबंध व पैशाच्या देवघेवीच्या कारणातून अक्रम शेख याचा खून झाल्याचे निष्पन्न झाले आहे.मिरजेत मंगळवार पेठेतील कॅरम क्लबमध्ये अक्रमचा रविवारी दुपारी गोळ्या झाडून व कोयत्याने वार करून खून झाला होता. याबाबत पोलीस अधीक्षक दिलीप सावंत यांनी सांगितले की, आरोपींनी अनैतिक संबंधाच्या रागातून व मृत अक्रम याच्याशी असलेल्या ौमनस्यातून त्याचा खून केल्याची कबुली दिली आहे. आरोपी अमीर गौस पठाण याचा भाऊ सलीम पठाण याचा पायल या तरुणीसोबत प्रेमविवाह झाला होता. मृत अक्रम व आरोपी अमीर यांची मैत्री असल्याने अक्रमचे घरी येणे-जाणे होते. यातून अक्रम व पायल यांचे सूत जुळले. या दोघांचे अनैतिक संबंध असल्याचा संशय अमीर व त्याचा भाऊ सलीम यास आल्यानंतर सलीमने पायलसोबत घटस्फोट घेतला. यातून अक्रम व अमीर यांच्यात वैमनस्य निर्माण झाले होते. मंगळवार पेठेत अमीरच्या मोबाईल शॉपीसमोरून मृत अक्रम हा पायल हिच्यासोबत मोटारसायकलवरून फिरत असल्याने अमीरच्या मनात राग होता. आरोपी अमीर याचा दुसरा साथीदार मोअज्जम शेख याला कॅरम क्लबमध्ये अक्रमने पट्ट्याने मारहाण केली होती. सहा महिन्यांपूर्वी अक्रमने २५ हजार रुपये व्याजाने अमीरला देताना २१ हजार देऊन व ४ हजार रुपये व्याज कापून घेतले. यामुळे अक्रम व अमीर यांच्यात वाद झाला होता. अक्रम याने अमीर व त्याचा भाऊ सलीम यांचा गेम करणार आहे, असे काही मित्रांसमोर बोलून दाखविले होते. अक्रम आपल्याला जिवंत ठेवणार नाही, या भीतीने अमीरने त्यालाच संपविण्याचा कट रचला. यामध्ये अमीरचा साथीदार मोअज्जम शेख हा सामील झाला. अक्रम व मोहसीन बेग कॅरम क्लबमध्ये बसले असताना अमीर पठाण याने त्याच्याजवळ असलेल्या गावठी पिस्तुलातून झाडलेली एक गोळी अक्रमच्या बरगडीत लागल्याने अक्रम खाली कोसळला. त्यानंतर मोअज्जमने कोयत्याने तोंडावर, डोक्यावर, पोटावर सपासप वार केले. खुनाच्या घटनेनंतर पलायन केलेल्या अमीर व मोअज्जम यांना आष्टा येथून पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे पोलीस अधीक्षक सावंत यांनी सांगितले. खून करून दानोळी येथे वारणा नदीत टाकलेली कुकरी, कोयता व गावठी पिस्तूल पोलिसांनी हस्तगत केले. अमीर व मोअज्जम यांच्यासोबत असलेल्या अन्य दोन साथीदारांनाही ताब्यात घेण्यात आले असून, त्यांचा गुन्ह्यात सहभाग आहे काय, याची खात्री करण्यात येत आहे.मध्यस्थीनेच आरोपी हजर ?खुनातील आरोपी काहींच्या मध्यस्थीने सोमवारी पोलीस ठाण्यात हजर झाल्याची चर्चा सुरू होती; मात्र पोलिसांनी आरोपींना शोधून ताब्यात घेतल्याचा दावा केला. मिरजेत दोन गटांत वारंवार हाणामाऱ्यांचे प्रकार सुरू आहेत, अशा घटनानंतर स्थानिक नगरसेवक पोलिसांच्या कामात अडथळा आणून प्रकरण पोलीस ठाण्याबाहेर मिटविण्याचे प्रयत्न करतात. यामुळे मारामारी करणाऱ्या तरुणांच्या मनोधैर्यात वाढ होऊन गंभीर प्रकार घडत आहेत. यापुढे मारामारीच्या प्रकरणात मध्यस्थी करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशारा पोलीस अधीक्षकांनी दिला.