शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Accident: भरधाव कारने फूटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडले, चालक होता नशेत
2
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
3
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
4
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
5
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
6
"जीव घेतलात तरी मराठी बोलणार नाही", प्रसिद्ध अभिनेता बरळला, म्हणाला- "मी घाबरत नाही..."
7
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
8
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
9
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
10
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
11
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
12
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
13
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
14
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
15
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
16
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
17
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
18
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!
19
ड्युक्स चेंडूंची समस्या म्हणजे ‘मार पायाला आणि मलम डोक्याला!’, टिकतच नाहीय...
20
विमानतळावर येताच तपासणी; बॅगेत सापडले प्राणी-पक्षी

उदगावात विचित्र अपघातात दोघे गंभीर

By admin | Updated: March 4, 2017 00:32 IST

रिक्षा-मोटारसायकल यांची समोरा-समोर धडक; जखमीत महिला व बालकाचाही समावेश

जयसिंगपूर : सांगली-कोल्हापूर महामार्गावरील उदगाव (ता. शिरोळ) येथील कल्पवृक्ष गार्डनसमोर रिक्षा व मोटारसायकल यांच्यात झालेल्या विचित्र अपघातात मोटारसायकलस्वार गौस गुलाब सनदी (वय ४०, रा. कबनूर, ता. हातकणंगले) व रिक्षाचालक मोहसीन शहाजान नदाफ (वय २२, रा. उदगाव) हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत़ तर मोटारसायकलवरील एक महिला व दीड वर्षाचे बालकही जखमी झाले आहे. ही घटना शुक्रवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली आहे. याबाबतची नोंद जयसिंगपूर पोलिस ठाण्यात झाली आहे.पोलिस व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, सांगली-कोल्हापूर महामार्गावर कल्पवृक्ष गार्डनसमोर दुपारी साडेबाराच्या सुमारास मोहसीन नदाफ हा रिक्षा (क्ऱ एम एच ९ जे ३४६६) घेवून उदगावहून जयसिंगपूरकडे येत होता. यावेळी गौस हे मोटारसायकल (क्र. एम एच ०९ डी ई २३९१) ही कबनूरहून सांगलीच्या दिशेने जात होते. यावेळी रिक्षा व मोटारसायकलमध्ये समोरासमोर धडक झाली. यावेळी मोटारसायकल रिक्षाच्या दर्शनी काचेत मोटारसायकल अडकून राहिली होती. यामध्ये रिक्षाचालक नदाफ याला मोटारसायकलची धडक बसल्यामुळे समोरील काचेची तुकडे व लोखंडी बार लागल्यामुळे नदाफ हा गंभीर जखमी झाला. तसेच मोटारसायकलस्वार गौस सनदी यांच्या तोंडास गंभीर दुखापत झाली असून, दोन्ही पायाला मोठी दुखापत झाली आहे. तसेच मोटारसायकलवर असणाऱ्या त्यांच्या पत्नी आयेशा सनदी (वय ३६) व त्यांचा नातू रईस सूरज सनदी (वय २, रा. कबनूर) यांनाही किरकोळ दुखापत झाली आहे. अपघातानंतर सांगली-कोल्हापूर माहामार्गावरील सुमारे अर्धा तास वाहतूक ठप्प झाली होती. यावेळी जयसिंगपूर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन वाहतूक सुरळीत करून अपघाताचा पंचनामा केला. बाह्यवळण धोकादायक उदगाव येथील कल्पवृक्ष गार्डन ते खोत पेट्रोलपंपाच्या दरम्यान बाह्यवळण आहे. उदगावहून येत असलेल्या वाहनांचा अंदाज लागत नसल्याने वारंवार याठिकाणी अपघात होऊन अनेकांनी आपला जीव गमावला आहे. त्यामुळे बांधकाम विभागाने या मार्गावर दिशादर्शक फलक लावण्याची मागणी होत आहे.