शहरं
Join us  
Trending Stories
1
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
2
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
3
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
4
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
5
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
6
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
7
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
8
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
9
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
10
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
11
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
12
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
13
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
14
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
15
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...
16
दररोज अंगाला साबण लावत असाल तर आताच बदला सवय; कधी, किती वेळा करायचा वापर?
17
इस्राइलच्या हल्ल्यात स्टार फुटबॉलपटूचा मृत्यू, या देशाचा ‘पेले’ अशी होती ओळख 
18
एका घरात दोनच 'लाडक्या बहिणी', इतरांचा होणार पत्ता कट; सरकारच्या नियमानं महिला धास्तावल्या
19
सॅमसंग गॅलेक्सी एस २४ अल्ट्रा ५० हजारांनी स्वस्त, कॅमेरा क्वालिटीत कुठलंही कॉम्प्रमाइज नाही!
20
मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीचा लग्नानंतर ६ महिन्यातच मृत्यू; प्रकरणात आला नवा ट्विस्ट

बोरवडेच्या त्रिवेणी रांगणा ग्रुपने शोधली रांगण्यावरील २ हजार फूट दरीत ढकललेली दुसरी तोफ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 19:40 IST

इसवी सन १८४४ च्या सुमारास गडक-यांचे बंड दडपताना इंग्रजांनी गडावरील सहा तोफा दरीत ढकलल्या होत्या.

रमेश वारके

बोरवडेः १५ एप्रिलला पावणे दोनशे वर्षानंतर बोरवडे (ता.कागल) येथील त्रिवेणी रांगणा ग्रुपने दोन हजार फुट दरीतून तोफ बाहेर काढल्यानंतर याच ग्रुपने चारच दिवसात दरीत शोध मोहिम राबविली.यामध्ये त्यांना यश आले असून दरीतील दुसरी तोफ बाहेर काढली आहे. रांगणा किल्ल्यावर ही तोफ आणली असून रांगण्याच्या कुशित ही तोफ आज विसावली. त्रिवेणी रांगणा ग्रुपच्या या धाडसी मोहिमेबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.

याबाबत माहिती अशी इसवी सन १८४४ च्या सुमारास गडक-यांचे बंड दडपताना इंग्रजांनी गडावरील सहा तोफा दरीत ढकलल्या होत्या.आता अनेक वर्षानंतर या तोफा त्रिवेणी रांगणा ग्रुपचे मार्गदर्शक महादेव फराकटे यांच्या मार्गदर्शनाखाली  शोधण्याचे प्रयत्न होताना दिसत आहेत. कोकणातील नारुळ गावच्या दिशेला साधारणपणे १७०० फुट दरीत शोध मोहिमेच्या  दरम्यान ही तोफ त्यांना आढळली.साडे आठ फुट लांब असणारी,अंदाजे दोन टन वजनाची,पाठीमागील तोंडेचा साडे चार फुट घेरा आणि पुढील तोंडाचा सव्वा दोन फुट घेरा असणारी ही तोफ बाहेर काढण्यासाठी त्रिवेणी रांगण्याचे कार्यकर्ते गेली तीन दिवस झटत होते.  

या शोध मोहिमेत सुनिल वारके , प्रविण पाटील,बाजीराव खापरे,शरद फराकटे , अमर सातपूते , चंद्रकांत वारके , प्रकाश साठे ,जीवन फराकटे , मेजर सुनिल फराकटे , नेताजी साठे,रघुनाथ वारके , निखिल परीट, अरुण मगदूम , नेताजी सुर्यवंशी ,तानाजी साठे,बजरंग मांडवकर , अवधूत शिंगे , प्रथमेश पाटील, प्रज्योत चव्हाण ,भाऊ साठे,राहूल मगदूम हे शिवप्रेमी मावळे सहभागी आहेत. 

"किल्ल्यावरील सहाही तोफा शोधून त्या रांगण्याच्या कुशित वसविणे हेच आमचे ध्येय आहे.गडावरील अवशेष दरीत पडले असून त्यांंचा ढिगारा उपसताना शेजारीच साधारणपणे १७०० फुट दरीत ही तोफ दिसली.वर्षानुवर्षे पावसाच्या पाण्याच्या प्रवाहा बरोबर या तोफा सरकत असून प्रत्येक वर्षी या तोफा आपल्या जागा बदलत आहेत.या तोफा बाहेर काढणे धोकादायक काम आहे" - महादेव फराकटे