शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

बॉयलर पेटले, साखर कारखान्यांची लगबग वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2018 11:34 IST

बॉयलर पेटल्याने साखर कारखाना प्रशासनाची लगबग वाढली आहे. आगामी हंगाम सुरू करण्यासाठी यंत्रणा सज्ज झाली असली, तरी ऊसदराचा तिढा कसा व कधी सुटतो, यावरच हंगामाचे गणित अवलंबून राहणार आहे. यंदाच्या हंगामात उसाचे क्षेत्र जरी वाढले असले, तरी एकसारखा झालेला पाऊस व त्यानंतर त्याने दिलेल्या हुलकावणीने उत्पादनात घट येईल, असा साखर कारखानदारांचा अंदाज आहे.

ठळक मुद्देबॉयलर पेटले, साखर कारखान्यांची लगबग वाढलीहंगामासाठी यंत्रणा सज्ज : नजरा ऊसदर आंदोलनाकडे

कोल्हापूर : बॉयलर पेटल्याने साखर कारखाना प्रशासनाची लगबग वाढली आहे. आगामी हंगाम सुरू करण्यासाठी यंत्रणा सज्ज झाली असली, तरी ऊसदराचा तिढा कसा व कधी सुटतो, यावरच हंगामाचे गणित अवलंबून राहणार आहे. यंदाच्या हंगामात उसाचे क्षेत्र जरी वाढले असले, तरी एकसारखा झालेला पाऊस व त्यानंतर त्याने दिलेल्या हुलकावणीने उत्पादनात घट येईल, असा साखर कारखानदारांचा अंदाज आहे.राज्य सरकारने यंदाचा गळीत हंगाम सुरू करण्यास २० आॅक्टोबरपासून परवानगी दिली आहे. दरवर्षीप्रमाणे कारखाना प्रशासनाने गाळप हंगामाची तयारी केली असून, दसऱ्याच्या मुहूर्तावर कारखान्यांचे बॉयलर पेटले आहेत. आता प्रत्यक्ष हंगाम सुरू होण्याची प्रतीक्षा असून, यंत्रणा सज्ज झाली आहे.

सरकारने जरी २० आॅक्टोबरपासून गाळप सुरू करण्यास मान्यता दिली असली, तरी ऊसदराचा तिढा सुटत नाही तोपर्यंत हंगामाला गती येणार नाही. आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी संघटना ऊसदराचा मुद्दा ताणणार हे निश्चित आहे.

एकरकमी एफआरपी हीच पहिली उचल, अशी कारखानदारांची मानसिकता दिसते; पण गेल्या वर्षीप्रमाणे एफआरपी अधिक ३00 -४00 रुपये मिळतात का? यासाठी संघटनांचे प्रयत्न सुरू आहेत. कारखाना प्रशासन जरी सज्ज झाले असले, तरी सगळ्यांच्या नजरा ऊसदर आंदोलनाकडे लागल्या आहेत. दराचा तिढा सुटल्याशिवाय हंगामाला वेग येणार नाही, हे निश्चित आहे.जिल्ह्यात या हंगामात १ कोटी ३८ लाख टन ऊस गाळपाचा अंदाज आहे. उसाचे क्षेत्र वाढले, तरी उसाच्या उत्पादनात फारशी वाढ होणार नाही, असा अंदाज साखर कारखान्यांच्या बैठकीत व्यक्त केला आहे. गेल्या हंगामात १ कोटी ३३ लाख टन उसाचे गाळप झाले होते. यंदा सलग पडलेला पाऊस आणि त्यानंतर त्याने दिलेल्या हुलकावणीने ऊसवाढीवर परिणाम झाला आहे. 

 

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेkolhapurकोल्हापूर