शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

Vidhan Parishad Election : 'या' उमेदवारांने केल्या सूचकांच्या बोगस सह्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2021 19:59 IST

कोल्हापूर : कोल्हापूर विधानपरिषदेसाठी सोमवारी संजय भिकाजी मागाडे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, या अर्जावरील सूचकांनी ...

कोल्हापूर : कोल्हापूर विधानपरिषदेसाठी सोमवारी संजय भिकाजी मागाडे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, या अर्जावरील सूचकांनी आपल्या सह्या बोगस असल्याची तक्रार कुरुंदवाड व शिरोळच्या पाच नगरसेवकांनी मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. शहर पोलीस उपअधीक्षक व शाहूपुरी पोलीस ठाण्यातही संबंधितांनी तक्रार दाखल केली आहे.संजय मागाडे यांनी दाखल केलेल्या अर्जावर संजय कांबळे, करुणा कांबळे, कुमुदिनी कांबळे, सुरेखा पुजारी, स्नेहल कांबळे आदींच्या सूचक म्हणून सह्या होत्या. हे इतर उमेदवारांच्या लक्षात आल्यानंतर संबंधित नगरसेवकांच्या निदर्शनास आणून दिले. यातील स्नेहल उत्तम कांबळे यांनी या सह्या आमच्या नसून मागाडे यांनी बोगस सह्या मारून फसवणूक केल्याचे प्रतिज्ञापत्र जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सादर केले. त्यानंतर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली.

मागाडे यानी निवडणूक आयोगाची फसवणूक केली असून, त्यांच्यावर फौजदारी दाखल करावी अशी मागणी स्नेहल कांबळे यांनी केली आहे. त्याचबरोबर त्यांनी शहर पोलीस उपअधीक्षक व शाहूपुरी पोेलीस ठाण्यातही तक्रार दाखल केली आहे.तक्रारीतील पाच नगरसेवक आघाडीचेजिल्हाधिकाऱ्यांकडे मागाडे यांच्याविरोधात तक्रार दाखल करणारे पाच नगरसेवकांपैकी चार राष्ट्रवादी कॉंग्रेसचे, तर एक कॉंग्रेसचा आहे.तर, आज भाजपच्या महिला जिल्हाध्यक्षा शौमिका अमल महाडिक यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. भाजपचे अधिकृत उमेदवार अमल महाडिक यांच्या त्या पत्नी आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याकडे त्यांनी एक नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे. या निवडणुकासाठी आज अखेर 5 उमेदवारांची 7  नामनिर्देशन पत्र दाखल झाली आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरVidhan Parishad Electionविधान परिषद निवडणूक