शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

गडहिंग्लज कृषी उत्पन्न बाजार समितीवर प्रशासक मंडळ ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2020 15:39 IST

Agriculture Sector, Market, kolhapurnews गडहिंग्लज कृषी उत्पन्न बाजार समितीवर अशासकीय प्रशासक मंडळ नियुक्तीच्या जोरदार हालचाली सुरू आहेत. पालकमंत्री सतेज पाटील यांनी २१ सदस्यांची यादी मंजुरीसाठी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे  पाठवली आहे.

ठळक मुद्देगडहिंग्लज कृषी उत्पन्न बाजार समितीवर प्रशासक मंडळ ? पालकमंत्र्यांची शिफारस :२१ अशासकीय सदस्यांची यादी पणन मंत्र्यांना पाठवली

गडहिंग्लज : गडहिंग्लज कृषी उत्पन्न बाजार समितीवर अशासकीय प्रशासक मंडळ नियुक्तीच्या जोरदार हालचाली सुरू आहेत. पालकमंत्री सतेज पाटील यांनी २१ सदस्यांची यादी मंजुरीसाठी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे  पाठवली आहे.ऑगस्ट २०२० मध्ये तत्कालीन संचालक मंडळाची मुदत संपली. त्यामुळे बाजार समितीवर प्रशासक म्हणून येथील सहाय्यक निबंधकाची नेमणूक झाली. दरम्यान, विद्यमान संचालकांनाच मुदतवाढ मिळावी, यासाठी जोरदार प्रयत्न सुरू होते. परंतु, त्यांच्या आशेवर पाणी फिरल्याचे स्पष्ट झाले.गडहिंग्लज, आजरा,चंदगड व कागल असे बाजार समितीचे साडेतीन तालुके कार्यक्षेत्र आहे. गेल्या अनेक वर्षांपासून बाजार समितीवर सर्वपक्षीय आघाडी सत्तेवर आहे. परंतु,आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राज्यात सत्तेवर असलेल्या महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी, काँग्रेस व शिवसेना आणि मित्रपक्षांच्या प्रमुख कार्यकर्त्यांचीच वर्णी अशासकीय प्रशासक मंडळात लावण्यात आली आहे.

 कुणाची लागणार वर्णी?

अशासकीय प्रशासक मंडळात अभय देसाई, मुकुंद देसाई, जयकुमार मुन्नोळी, भीमराव राजाराम, जानबा चौगुले, धनाजी तोरस्कर, सोमगोंडा आरबोळे, रोहित मांडेकर, राजशेखर यरटी, विक्रम सुरेश चव्हाण - पाटील, संजय उत्तुरकर, दिग्विजय कुराडे, सुनील शिंत्रे, संभाजी पाटील, प्रभाकर खांडेकर, संभाजी भोकरे, दिलीप माने, लगमाना कांबळे, संपत देसाई, राजेंद्र गड्यानावर, विजय वांगणेकर यांचा समावेश आहे. यांनाही संधी मिळणार !राष्ट्रवादीचे ज्येष्ठ कार्यकर्ते उदय जोशी व माजी सभापती अमर चव्हाण यांना जिल्हा नियोजन मंडळावर तर शिवप्रसाद तेली यांना खनिजकर्म महामंडळाच्या सदस्यपदी संधी दिली जाणार असल्याचे खात्रीलायकरित्या समजते.भाजपाला रोखण्याची खेळी !गेल्या निवडणुकीत सत्ताधारी सर्वपक्षीय आघाडीत पारंपरिक गट म्हणून सहभागी असणारे माजी मंत्री भरमू पाटील, गोपाळराव पाटील,प्रकाश चव्हाण व अशोक चराटी हे दरम्यानच्या काळात भाजपावाशी झाले आहेत.त्यामुळेच ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व पालकमंत्री सतेज पाटील यांनी भाजपाला रोखण्यासाठीच ही खेळी केल्याची जिल्ह्यात चर्चा सुरू आहे.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रkolhapurकोल्हापूरMarket Yardमार्केट यार्ड