शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
2
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
3
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
4
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
5
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
6
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
7
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
8
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
9
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली
10
Anaya Sanjay Bangar, IND vs ENG: अनाया बांगरचे वडील संजय बांगरने इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाकडून केलेली धमाकेदार खेळी
11
Share Market Update : सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!
12
नोकरीला कंटाळलात? फक्त २०,००० रुपयांमध्ये सुरू करा 'हे' ४ छोटे व्यवसाय, दरमहा बंपर कमाईची संधी!
13
Raj Kushwaha : "सोनमने तिच्या पतीला खाल्लं आणि आता..." असं म्हणणाऱ्या राजच्या आजीचा झाला मृत्यू
14
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
15
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
16
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 
17
Nitish Rana: भारतीय क्रिकेटर नितीश राणाने दिली 'गूड न्यूज'; झाला जुळ्या मुलांचा बाबा; पाहा Photo
18
“मराठी भाषा, संस्कृती संपवायला हिंदी सक्ती, भाजपा-RSSचा अजेंडा हाणून पाडू”: हर्षवर्धन सपकाळ
19
भारत चीनला करणार 'बाय-बाय'; आता 'या' देशातून येणार रेअर अर्थ मॅग्नेट; कार कंपन्यांचं टेन्शन संपणार?

हॉटेल बंदच्या निषेधार्थ कामगारांचे रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 18:41 IST

CoronaVirus Kolhapur- लॉकडाऊनमधील हॉटेल बंदच्या निर्णयाच्या निषेधार्थ कोल्हापुरात बुधवारी हॉटेल कामगार संघटनेतर्फे रक्तदान शिबीर घेण्यात आले. त्यात सुमारे शंभर कामगारांनी रक्तदान केले. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून हॉटेल सुरू ठेवण्यास सरकारने परवानगी द्यावी, अन्यथा आंदोलनाची तीव्रता वाढविण्याचा इशारा या कामगारांनी यावेळी दिला.

ठळक मुद्देहॉटेल बंदच्या निषेधार्थ कामगारांचे रक्तदान शंभर जणांचा सहभाग : आंदोलनाची तीव्रता वाढविण्याचा इशारा

 कोल्हापूर : लॉकडाऊनमधील हॉटेल बंदच्या निर्णयाच्या निषेधार्थ कोल्हापुरात बुधवारी हॉटेल कामगार संघटनेतर्फे रक्तदान शिबीर घेण्यात आले. त्यात सुमारे शंभर कामगारांनी रक्तदान केले. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून हॉटेल सुरू ठेवण्यास सरकारने परवानगी द्यावी, अन्यथा आंदोलनाची तीव्रता वाढविण्याचा इशारा या कामगारांनी यावेळी दिला.बिंदू चौक येथील हॉटेल कामगार संघटनेच्या कार्यालयात रक्तदान शिबीर घेण्यात आले. त्यामध्ये संघटनेचे राज्य संघटक गिरीश फोंडे, धीरज कठारे, सुशांत पोवार, राहुल गोते, नितेश केसरकर, अनिल कांबळे , आनंदा कांबळे, शरद पाटील विजय परीट, संतोष वंदुरे, योगेश गुंडलकर ,विष्णू शेळके, अजित लटके ,पुरुषोत्तम कुलकर्णी, नितेश खेतल, निलेश कांबळे, प्रवीण बागडी, विठ्ठल झोरे ,मनोज भुरके, राजेंद्र पाटील ,बबन पाटोळे, रोहित माने, रमेश पोवार, आदी सहभागी झाले.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर राज्य शासनाचा हॉटेल बंद ठेवण्याचा निर्णय अन्यायकारक आहे. यामुळे राज्यातील लाखो हॉटेल कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांवर संकट कोसळणार आहे. गेल्या वर्षी लॉकडाऊनमुळे या कामगारांना दहा महिन्यांचा पगार मिळाला नाही. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा वापर करत हॉटेल चालू ठेवण्याची परवानगी द्यावी. हॉटेल मालकांसमवेत कामगार संघटनेची बैठक घ्यावी. कोरोना काळात प्रत्येक हॉटेल कामगारास मासिक वीस हजार रुपये आर्थिक मदत द्यावी. या मागण्यांबाबत शासनाने सकारात्मक कार्यवाही करावी, अन्यथा आंदोलनाची तीव्रता वाढविण्यात येईल, असा इशारा संघटनेचे राज्य संघटक गिरीश फोंडे यांनी दिला.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याBlood Bankरक्तपेढीkolhapurकोल्हापूर