शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

कळे येथे ब्लँक पँथर पक्षातर्फ़े महिलांचा रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2020 16:29 IST

farmar, bachatgat, rasaroko, kolhapurnews, woman शेतकरी व उद्योजकांप्रमाणे महिला बचत गटांची कर्जे माफ करावीत या मागणीसाठी ब्लँक पँथर पक्षाच्या वतीने कळे ( ता. पन्हाळा ) येथील कोल्हापुर - गगनबावडा या महामार्गावर दस्तुरी चौकात सुमारे एक तासभर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्दे कळे येथे ब्लँक पँथर पक्षातर्फ़े महिलांचा रास्ता रोको शेतकरी व उद्योजकांप्रमाणे महिला बचत गटांची कर्जे माफ करा

कळे -कष्टकरी महिलांना गर्तेतुन बाहेर काढण्यासाठी शेतकरी व उद्योजकांप्रमाणे महिला बचत गटांची कर्जे माफ करावीत या मागणीसाठी ब्लँक पँथर पक्षाच्या वतीने कळे ( ता. पन्हाळा ) येथील कोल्हापुर - गगनबावडा या महामार्गावर दस्तुरी चौकात सुमारे एक तासभर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी कोल्हापुर जिल्हयातुन शेकडो महिला उपस्थित होत्या. मागणीचे निवेदन कळे पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक श्रीकांत इंगवले व कळेचे मंडल अधिकारी एस्.जी. ठाकरे यांच्याकडे देण्यात आले.कोरोनामुळे कष्टकरी महिला संसार चालविताना मेटाकुटीस आल्या आहेत. त्यातच बचत गटाच्या माध्यमातुन मायक्रो फायनान्स कंपन्याकडुन घेतलेल्या कर्जाची परतफेड चक्रवाढ पध्दतीने व्याज आकारुन करण्यासाठी कंपन्या तगादा लावत आहेत. यामुळे या महिलांची दैनीय अवस्था झाली आहे.

यावेळी ब्लँक पँथरचे संस्थापक अध्यक्ष सुभाष देसाई , कोल्हापुर जिल्हा युवती उपाध्यक्ष प्रियांका सागर माने , पन्हाळा तालुका महिला अध्यक्षा गिता ज्ञानदेव येरुडकर , जिल्हा अध्यक्ष दयानंद कांबळे , जिल्हा निरीक्षक विश्वास कांबळे , यांनी मनोगत व्यक्त केले.आंदोलनास कामगार आघाडी जिल्हा अध्यक्ष राम भाऊ कांबळे , श्वेता पोवार, सागर माने, धोंडीराम कांबळे , पुंडलीक नाईक ( खाटांगळे ) विष्णु दोनवडेकर , सरदार पाटील, सुवर्णा शेळके , दिनेश माने , दयानंद शिरोलीकर आदिंच्याबरोबरच ब्लँक पँथरचे अनेक कार्यकर्ते व बचत गटांच्या महिला उपस्थित होत्या.

  • शेकडो महिलांनी एकत्र येऊन कळे विभागात रास्ता रोको करण्याची ही पहिलीच वेळ.
  •  महिलांच्याकडुन अगदी शिस्तबध्द आंदोलन 
  •  सुमारे तासभर झालेल्या या आंदोलनामुळे मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगा
  • गोल रिंगण करुन "फायनान्स कंपन्यांची तत्काळ कर्ज वसुली थांबवा " " श्रीमंतांप्रमाणे गरीबांचीही कर्जे माफ करा " अशा घोषणा 

 

टॅग्स :Morchaमोर्चाkolhapurकोल्हापूरWomenमहिलाFarmerशेतकरी