शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
4
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
5
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
6
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
7
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
8
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
9
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
10
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
11
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
12
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
13
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
14
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
15
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
16
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
17
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
18
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
19
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

गडमुडशिंगीत कॉँग्रेससमोर भाजपचे तगडे आव्हान; इच्छुकांची मांदियाळी

By admin | Updated: January 21, 2017 00:09 IST

सर्वसाधारण प्रवर्गातील महिलेसाठी आरक्षण : उमेदवारी देण्यावरून सर्वच पक्षातील नेत्यांचा लागणार कस

बाबासाहेब नेर्ले --गांधीनगर --गडमुडशिंगी जिल्हा परिषद मतदारसंघ सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झाल्याने कॉँग्रेस, भाजप, स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्ये इच्छुकांची मांदियाळी झाली आहे. उमेदवारी निवडीत राजकीय पक्षांच्या नेत्यांची कसरत होणार आहे. गेल्या निवडणुकीत आमदार सतेज पाटील गटाचे बाबासाहेब माळी विजयी झाले होते. राष्ट्रवादीचे तानाजी पाटील यांना पराभवास सामोरे जावे लागले होते. मात्र, यावेळी परिस्थिती वेगळी आहे. भाजपचा वाढलेला प्रभाव, त्यांचा मित्रपक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटनेची या मतदारसंघातील ताकद यांचा विचार करता कॉँग्रेसला भाजपचे तगडे आव्हान राहणार आहे. विद्यमान उपसरपंच तानाजी पाटील पत्नी रूपाली पाटील यांना भाजपकडून उमेदवारी मिळवून पराभवाचे उट्टे काढण्यासाठी सज्ज आहेत. गडमुडशिंगी हे मतदारसंघातील प्रमुख व मोठे गाव आहे आणि सर्वसाधारण पुरुष यासाठी आरक्षित झाल्याने कॉँग्रेस पक्षाकडून इच्छुकांची भाऊगर्दी पाहावयास मिळत आहे. त्यामुळे आमदार सतेज पाटील यांचा उमेदवार निवडीत कस लागणार आहे. पंचायत समितीचे सदस्य सचिन पाटील यांनी पत्नी प्रियांका पाटील यांना उमेदवारी मिळावी म्हणून प्रयत्न सुरू केला आहे. सतेज पाटील गटाचे कट्टर कार्यकर्ते रावसाहेब पाटील यांनीही पत्नी तेजस्विनी पाटील यांना उमेदवारी मिळावी म्हणून साकडे घातले आहे. सांगवडेतून वंदना विजय पाटील, अश्विनी उत्तम शिंदे व कॉँग्रेस-राष्ट्रवादीकडून वैशाली आप्पासाहेब धनवडे इच्छुक आहेत, तर मतदारसंघातील काही नागरिकांच्या आग्रहामुळे ग्रा.पं. सदस्य विनोद सोनुले यांनीही पत्नी सुरेखा सोनुले यांना उमेदवारी मिळविण्यासाठी देव पाण्यात घातले आहेत. या सर्व मातब्बरांतून, समर्थकांतून एक उमेदवार निवडणे आ. सतेज पाटील यांची डोकेदुखी ठरणार आहे. बेरजेचे राजकारण पाहता ऐनवेळी जि. प.चे विद्यमान सदस्य बाबासाहेब माळी यांच्या पत्नीसही मैदानात उतरविले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. भाजपच्या उमेदवारीवर येथील निवडणुकीचे समीकरण ठरणार आहे. भाजपकडून गडमुडशिंगीचे उपसरपंच तानाजी पाटील यांच्या पत्नी रूपाली पाटील यांनाही उमेदवारी मिळू शकते. तसेच भाजपच्या करवीर तालुका महिला अध्यक्षा सुलोचना नार्वेकर (वळीवडे) यांनीही उमेदवारीसाठी आग्रह धरला आहे. तसेच खासदार धनंजय महाडिक यांचे समर्थक राजगोंडा वळीवडे यांनी पत्नी अश्विनी वळीवडे यांच्या उमेदवारीसाठी स्वाभिमानी व भाजपकडे प्रयत्न सुरू केले आहेत. स्वाभिमानी संघटनेकडून कै. बापूसाहेब चौगुले यांच्या स्नुषा वैशाली संजय चौगुले यांनीही उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत.गडमुडशिंगी जि. प.साठी इच्छुक उमेदवारअश्विनी राजगोंडा वळीवडे, वैशाली संजय चौगुले (स्वाभिमानी शेतकरी संघटना), तेजस्वीनी रावसाहेब पाटील, प्रियांका सचिन पाटील, सुरेखा विनोद सोनुले, अश्विनी उत्तम शिंदे, वंदना विजय पाटील - कॉँग्रेस, वैशाली आप्पासाहेब धनवडे (कॉँग्रेस व राष्ट्रवादी युतीकडून), सुलोचना नार्वेकर - भाजप, रूपाली तानाजी पाटील (अद्याप माहिती नाही)गडमुडशिंगी पंचायत समितीसाठी इच्छुक उमेदवार आप्पासाहेब धनवडे - कॉँग्रेस-राष्ट्रवादी युती, प्रदीप प्रतापराव शिंदे, उत्तम बाबूराव पाटील, नितीन बाबूराव पाटील, हरिभाऊ साळोखे (कॉँग्रेस), पोपट पांडुरंग दांगट (शिवसेना), संजय येडेकर, सुदर्शन सर्जेराव पाटील (भाजप)वसगडे पंचायत समितीसाठी इच्छुक उमेदवार (ओबीसी महिला)शोभा राजमाने (कॉँग्रेस) वसगडे, वीणा विष्णुपंत चौगुले (कॉँग्रेस) सांगवडे, योगिता तेजस बागडी (भाजप) वसगडे.सन २०१२ ची निवडणूकगडमुडशिंगी जिल्हा परिषदबाबासाहेब माळी, कॉँग्रेस (८७४८) विजयीतानाजी कृष्णात पाटील, राष्ट्रवादी (५३०५) धनपाल शिंदे, स्वाभिमानी शेतकरी संघटना (४४८९)गडमुडशिंगी पंचायत समिती सचिन बाळासो पाटील, कॉँग्रेस (३५८८) विजयीपोपट दांगट, शिवसेना (३४४६)गोपाळ कांबळे, स्वाभिमानी (१५२१)वसगडे पंचायत समिती भुजगोंडा धुळगोंडा पाटील, कॉँग्रेस (५९८५) विजयीरावसाहेब झोरे, स्वाभिमानी (४२६५)