शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
2
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
3
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
4
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
5
नालासोपाऱ्यात मेफेड्रोन ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त, तुळींज पोलिसांची प्रगतीनगर परिसरात कारवाई
6
Virat Kohli: विराट कोहलीची जर्सी खरेदी करण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चाहत्यांची झुंबड, व्हिडीओ होतोय व्हायरल!
7
पाकिस्तानविरुद्धच्या संघर्षादरम्यान या पिल्लांना सरकारने दिली झेड प्लस सुरक्षा, ७०० किमी दूर केली रवानगी
8
कॅन्सरसोबत झुंज ठरली अपयशी! ४४ वर्षीय प्रसिद्ध गायिकेचं निधन, चाहत्यांनी व्यक्त केली हळहळ
9
अरे बापरे! एका छोट्याशा चुकीमुळे होऊ शकतो प्रेशर कुकरचा भीषण स्फोट; सेफ्टीसाठी 'हे' करा
10
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
11
Astro Tips: मुलांची दहावी, बारावी झाली की पालकांनी ग्रहदशा जाणून घेत मुलांचे करिअर ठरवणे उत्तम!
12
आयकर अधिकारी सांगून छगन भुजबळ यांच्याकडे मागितली एक कोटीची खंडणी; युवक अटकेत
13
पंख्याच्या हवेवरून वरातीत पेटला वाद, लाठ्या-काठ्या, दगड धोंडे घेऊन तुंबळ हाणामारी, एकाचा मृत्यू  
14
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप, प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्यासह सहा जण अटकेत
15
वेळीच व्हा सावध! टूथपेस्टमुळे होऊ शकतो कॅन्सर; 'हे' केमिकल बेतेल जीवावर, आताच घ्या काळजी
16
गुन्हेगारांना पकडण्यासाठी कालव्यात मारली उडी; तेव्हाच पडली विजेची तार, कॉन्स्टेबलचा मृत्यू
17
केंद्राच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात शशी थरूर यांचं नाव पाहून काँग्रेस अवाक्, व्यक्त केली अशी प्रतिक्रिया
18
IPL 2025 अंतिम सामन्यावरून मोठा गोंधळ; BCCIच्या 'या' निर्णयावर चाहते संतापले, नेमकं काय घडलं?
19
जबरदस्त! कंपनी असावी तर अशी, नफा होताच बोनस म्हणून दिली ७ महिन्यांची दिली सॅलरी
20
पुणे IED केस: ISIS साठी काम करणाऱ्या दोन जणांना NIA ने विमानतळावरून केली अटक

भाजप-ताराराणीच्या अजेंड्यात ‘श्रीमंत कोल्हापूर’

By admin | Updated: October 20, 2015 00:15 IST

‘अमृत योजनेतून महापालिका सक्षम करणार : जाहीरनाम्यातील प्रत्येक गोेष्ट व्यवहारात आणणार : चंद्रकांतदादा पाटील

कोल्हापूर : महापालिकेचे केंद्र, राज्य व स्वनिधी या तीन स्तरांवर विकासाचे मॉडेल तयार केले असून, शहराचे प्रलंबित प्रश्न तत्परतेने प्रशासनासमोर मांडून ते निर्गत करणार आहे. आगामी पाच वर्षांत जाहीरनाम्यातील प्रत्येक गोष्ट व्यवहारात आणून ‘श्रीमंत कोल्हापूर’ करणारच; पण त्याबरोबर येथील सामान्य माणूस खऱ्या अर्थाने श्रीमंत करणार असल्याची ग्वाही, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली. महापालिका निवडणुकीसाठी भाजप-ताराराणी आघाडीच्या जाहीरनाम्याचे प्रकाशन मंत्री पाटील यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आले. यावेळी बोलताना मंत्री पाटील म्हणाले, शहरातील सोयी-सुविधांअभावी अंबाबाईच्या दर्शनासाठी येणाऱ्या पर्यटकाला कोल्हापुरात दोन दिवस थांबावे असे वाटत नाही. यासाठी रंकाळा तलाव, पंचगंगा घाट, आदी पर्यटनस्थळे विकसित करावी लागणार आहेत. त्याचा आराखडा आम्ही तयार केला आहे. बचत गटांच्या महिलांनी तयार केलेल्या मालाला चांगले मार्केट उपलब्ध करून देण्यासाठी मोठे मॉल उभे केले जाणार आहेत. तरुणांच्या हाताला काम द्यायचे झाल्यास येथील उद्योगधंदे अधिक सक्षम झाले पाहिजेत. उद्योगधंदे वाढण्यासाठी विमानसेवा हा महत्त्वाचा घटक असून, येत्या दोन महिन्यांत खासगी विमानसेवा कोल्हापुरातून सुरू होणार आहे. आगामी आठ-नऊ महिन्यांत विमानतळाचे विस्तारीकरण करून मोठी विमानेही येथे कशी येतील, त्यादृष्टीने आम्ही नियोजन केले आहे.कचऱ्यापासून वीज निर्मिती प्रकल्प तयार आहे, सत्तेवर आल्यानंतर वीज निर्मितीतील १/४ वीज महापालिकेला मिळणार आहे. त्यातून स्ट्रीट लाईटचे दोन कोटी वाचणार आहेत. सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते शेतीला देता येईल, सौरऊर्जाचा वापर महापालिका इमारती, कार्यालयात केला जाणार आहे. कोणत्याही परिस्थितीत महापालिकेच्या उत्पन्नात वाढ झाल्यास ‘कोल्हापूर श्रीमंत’ होण्यास वेळ लागणार नाही. केंद्र व राज्यात सरकार आहे, त्याच्या माध्यमातून अनेक योजना राबविल्या जाणार आहेत. वाय-फाय शहराबाबत एका कंपनीशी चर्चाही झाली आहे. आम्ही कोल्हापूरच्या जनतेला दिलेली आश्वासने ही कागदावर राहणार नाहीत. ती पूर्णत्वास नेण्यासाठी वचनबद्ध आहे. उपनगरांत दोनशे कॉटच्या हॉस्पिटलचा प्लॅन तयार आहे. आम्ही केवळ हवेतील बोलत नाही, त्याच्यासाठी कोणत्या ट्रस्टला जबाबदारी द्यायची यासह प्रक्रिया पूर्ण झाली आहे. केवळ आचारसंहिता असल्याने काही घोषणा करता येत नसल्याचे मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले. हद्दवाढीबाबत संबंधित गावांना विश्वासात घेऊन प्रबोधनातून विचार केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी आमदार अमल महाडिक, ताराराणी आघाडीचे प्रमुख स्वरूप महाडिक, भाजपचे महानगर अध्यक्ष महेश जाधव, सुनील कदम, सत्यजित कदम, भगवान काटे, उत्तम कांबळे, सुहास लटोरे, सुनील मोदी उपस्थित होते. विरोधकांच्याबुद्धीची कीवपालकमंत्री प्रचारात उतरणार नाहीत, अशी टूमही उठविली आहे; पण दिवसाला तीस कॉलनीमध्ये आपण प्रचार फेऱ्या पूर्ण करीत आहे. ‘स्मार्ट सिटी’ची निवड पारदर्शक झाली आहे. वास्तविक काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असताना त्यांनी निकषांत बसण्यासाठी ज्या गोष्टी करणे अपेक्षित होते ते केले नाही. त्याचे खापर दुसऱ्यांवर फोडले जात आहे. ‘स्मार्ट सिटी’बाबत विरोधकांच्या बुद्धीची कीव येत असल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले.हे करणार‘स्मार्ट सिटी’त सहभागासाठी प्रयत्नकेंद्राच्या ‘अमृत’ योजनेतून मूलभूत सुविधांसाठी प्रत्येक वर्षी एक हजार कोटीरंकाळा, पंचगंगा घाटासह पर्यटन विकसित करणेमेडिकल टुरिझम विकसित करणे‘झोपडपट्टी मुक्त शहर’ व ‘गार्डन शहर’ म्हणून ओळख करणारस्वच्छ व मुबलक पाणीविविध जागांचा गरजेनुसार ‘बीओटी’वर विकसित करणार शाळांचा दर्जा उंचाविण्यासाठी ‘मास्टर प्लॅन’ तयार कचऱ्यापासून वीज निर्मितीसांडपाण्याचा पुनर्वापर