शहरं
Join us  
Trending Stories
1
Apple Awe Dropping Event : Apple नं लाँच केला सर्वात स्लीम iPhone 17 Air! जाणून घ्या, किंमत अन् संपूर्ण स्पेसिफिकेशंस
2
iPhone 17, iPhone 17 Air, Pro आणि Pro Max ची किंमत किती? जाणून घ्या सविस्तर
3
अफगाणिस्तानची विजयी सलामी; हाँगकाँगची पाटी पुन्हा कोरीच! Asia Cup स्पर्धेतील सलग १२ वा पराभव
4
Apple Event 2025 : iPhone 17 Pro आणि 17 Pro Max लाँच, नवीन डिझाइन, अपग्रेड कॅमेरा अन्...; जाणून घ्या किंमत
5
Apple Event 2025 : iPhone 17 सीरीज लाँच, Pro Motion डिस्प्ले, 20 मिनिटांत चार्ज, आणखी काय-काय आहे खास? जाणून घ्या
6
ठाण्यात सत्ता आणायची असेल तर रावणाच्या...; गणेश नाईकांनी फुंकलं ठाणे महापालिका निवडणुकीचं रणशिंग
7
Apple Awe Dropping Event : Apple Watch 11 लाँच, '5G'सह मिळणार 'हे' ढासू फीचर्स; आतापर्यंतची 'बेस्ट स्मार्ट वॉच', कंपनीचा दावा
8
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
9
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
10
Asia Cup T20 Fastest Fifty : वादळी खेळीसह ओमरझाईचं विक्रमी अर्धशतक; सूर्यकुमार यादवचा विक्रम मोडला
11
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
12
इस्रायलनं संपूर्ण मध्यपूर्वेलाच बनवलं युद्धभूमी, आता 'या' देशावर केली बॉम्बिंग...! कारण काय?
13
मद्य धुंद ट्रकचालकाने मेंढ्यांसह मोटरसायकल चालकाला चिरडले, एक ठार, एक जखमी; आष्टा-इस्लामपूर मार्गावरील घटना
14
Sediqullah Atal First Fifty of Asia Cup 2025 : पहिल्या नबंरला येऊन ठोकली पहिली फिफ्टी!
15
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
16
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
17
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
18
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
19
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
20
१० वर्षांपासून गर्लफ्रेंडला फसवत होता बॉयफ्रेंड; पाळीव कुत्र्याने 'अशी' केली पोलखोल!

Kolhapur Politics: ‘झेडपी’साठी शक्ती सारी, भाजपची विधानसभेची तयारी 

By विश्वास पाटील | Updated: July 19, 2025 17:02 IST

निवडणुका लांब असल्या तरी मोर्चेबांधणी सुरू : हाताला लागेल तो कार्यकर्ता घ्या पक्षात

विश्वास पाटीलकोल्हापूर : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी म्हणून भाजप हाताला लागेल त्या नेत्याला पक्षात सढळ हाताने प्रवेश देत असले तरी त्यामागे २०२९ च्या विधानसभेची पेरणी सुरू आहे. या निवडणुकीला अजून चार वर्षांचा अवधी असला तरी भाजप हा बारा महिने, चोवीस तास सर्वच निवडणुकांची तयारी करत असतो. पक्षाचे केंद्रीय नेते व गृहमंत्री अमित शहा यांनी आगामी विधानसभा भाजप स्वबळावर लढवणार असल्याचे यापूर्वीच जाहीर केले आहे. त्यामुळे त्याची मोर्चेबांधणी आतापासूनच सुरु आहे. 

  • जिल्ह्यातील विधानसभेच्या दहापैकी तीन आमदार पक्षाचे आहेत. उर्वरित सात जागांपैकी करवीर व राधानगरी मतदारसंघात पक्षाची ताकद कमी आहे. राज्यात व केंद्रातही पक्षाची सत्ता आली, राजकीय ताकद वाढली तरी भाजपने मागच्या दहा वर्षांत दुसऱ्या पक्षातील तयार नेते घेऊन पक्ष बळकट करण्यावरच भर दिला आहे. या दोन्ही तालुक्यांत तसे तयार नेतेही कुणी हाताशी न लागल्याने पक्ष तिथे कमकुवत आहे.
  • करवीरमध्ये मध्यंतरी काँग्रेसचे उमेदवार राहुल पाटील यांच्यावर फासे टाकून बघितले; परंतु त्यांनी आपण काँग्रेसशीच एकनिष्ठ राहणार असल्याचे जाहीर केल्याने आता अभिषेक बोंद्रे आणि जनसुराज्य पक्षाचे संताजी घोरपडे यांना पक्षात घेतले आहे.
  • राधानगरीत आजच्या घडीला तरी या पक्षाकडे ताकदीचा उमेदवार नाही. आगामी काळात तिथे ए. वाय. पाटील यांच्यासारखा एखादा तयार नेता पक्षात घेतला जाऊ शकतो. जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील हे तिथे पक्षासाठी धडपड करत आहेत.
  • कोल्हापूर उत्तरमध्ये गेल्या विधानसभा निवडणुकीपासूनच कृष्णराज महाडिक हाकारे घालू लागले आहेत. त्यामुळे ते दावेदार असतील. भाजपच्या मुशीतला कार्यकर्ता म्हणून महेश जाधव अजून स्पर्धेत आहेत. लोकसभेला महाडिक कुटुंबातील उमेदवार रिंगणात राहिल्यास विधानसभेची गणिते बदलू शकतात.
  • कागलमध्ये संजय घाटगे यांना पक्षात घेतले आहे; परंतु त्यांनी आगामी उमेदवार म्हणून अंबरीश घाटगे यांच्यावर लक्ष केंद्रित केले आहे. समरजित घाटगे यांचेही मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी जवळचे संबंध असल्याने तो एक सक्षम पर्याय भाजपपुढे आहे.
  • शिरोळमधून गुरुदत्त कारखान्याचे संस्थापक माधवराव घाटगे यांचे नाव गेल्या निवडणुकीतही पुढे आले होते; परंतु त्यांनी त्यावेळी नकार दिला. आताही सावकर मादनाईक यांना भाजपमध्ये आणण्यास तेच सूत्रधार आहेत. मंत्री चंद्रकांत पाटील त्यांचा शब्द कधीच मोडत नाहीत. त्यामुळे पक्षाने आग्रह केल्यास घाटगे हा एक पर्याय असू शकतो. त्याशिवाय पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजवर्धन निंबाळकर, सावकर मादनाईक यांचाही विचार होऊ शकतो.
  • आमदार विनय कोरे यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी निकटचे संबंध आहेत. शिवाय त्यांच्यासारखा सहयोगी पक्ष सोबत हवा असल्याने शाहूवाडीतूनही भाजप पक्षीय पातळीवर फारशी ताकद लावताना दिसत नाही.
  • हातकणंगलेतही आमदार अशोकराव माने हेच भाजपचे सहयोगी उमेदवार असू शकतात किंवा त्यांना थेट पक्षात प्रवेश दिला जाऊ शकतो. 

मतदार संघनिहाय संभाव्य उमेदवार असे :

  • कोल्हापूर उत्तर : कृष्णराज महाडिक, महेश जाधव
  • कोल्हापूर दक्षिण : आमदार अमल महाडिक
  • इचलकरंजी : आमदार राहुल आवाडे
  • चंदगड : आमदार शिवाजी पाटील
  • कागल : समरजित घाटगे, अंबरीश घाटगे
  • हातकणंगले : डॉ. सुजित मिणचेकर, राजू किसन आवळे
  • शिरोळ : माधवराव घाटगे, राजवर्धन निंबाळकर, सावकर मादनाईक
  • शाहूवाडी : आमदार विनय कोरे (सहयोगी)
  • करवीर : ताकदीचा उमेदवार नाही
  • राधानगरी : ताकदीचा उमेदवार नाही

आगामी विधानसभा निवडणुकीपर्यंत मतदारसंघांची पुनर्रचना होणार आहे. त्यामुळे मतदारसंघ वाढतील; परंतु स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी भाजप विधानसभा डोळ्यासमोर ठेवूनच करीत आहे. - नाथाजी पाटील, जिल्हाध्यक्ष, भाजप, कोल्हापूर