शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

इचलकरंजी नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपचे 'स्वबळ' नाही तर 'मैत्रीपूर्ण बळ'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2021 14:29 IST

इचलकरंजी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिले संकेत.

इचलकरंजी : येथील नगरपालिकेची निवडणूक स्वबळावर लढण्यासंदर्भात चाचपणी सुरू असली तरी आमदार प्रकाश आवाडे यांच्याबरोबर चर्चा करून एकत्रित निवडणुकीला सामोरे जावू. तसे न जुळल्यास गरज असेल, अशा काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढतीचे संकेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिले. याबाबत शहरातील भाजपच्या प्रमुख पदाधिकारी व नगरसेवकांची त्यांनी भेट घेऊन मते आजमावली.प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी गुरूवारी नगराध्यक्षा अलका स्वामी व अशोक स्वामी यांच्या निवासस्थानी खासगी स्वरूपाची भेट दिली. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. शहरातील एकूण राजकीय परिस्थिती, विधानपरिषदेच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या घडामोडी, त्याचे आगामी नगरपालिका निवडणुकीवर होणारे परिणाम याबाबत माहिती जाणून घेण्यासाठी त्यांनी शहरातील काही प्रमुखांच्या भेटी घेतल्या. निवडणुकीबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी स्वबळासंदर्भात सध्या फक्त चाचपणी सुरू आहे. परंतु आवाडेंसोबत याबाबत चर्चा करणार असल्याचे सांगितले.एकत्रित चांगली ताकद लागत असल्यास त्यादृष्टीनेही पाऊले उचलली जातील, असे स्पष्ट संकेतही त्यांनी दिले. त्यावर आवाडे स्वबळावर लढण्याची घोषणा केल्याचे पत्रकारांनी सांगितले. त्यावरही त्यांनी ते त्यांचे यापूर्वीचे मत होते. आता आमच्याकडून तसेच त्यांच्याकडून जनतेचा कौल घेण्याचे काम सुरू आहे. त्यातून जनता व स्थानिक नेते यांच्यातील सूर बघुन पुढे निर्णय घेतला जाईल, असे सांगितले.किमान चहा तरी पिऊपत्रकारांनी निवडणुकीसंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला त्यांनी आवाडेंसोबत चर्चा करून निर्णय घेऊ, असे उत्तर देत असताना शहरातील भाजपच्या एका प्रमुख पदाधिकाºयाने त्यांना स्वबळावर लढणार, असे स्पष्ट सांगा म्हणून कानात सांगितले. तरीही पाटील यांनी किमान त्यांच्याशी चर्चा करत चहा तरी पिऊ असे खोचक उत्तर दिले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरichalkaranji-acइचलकरंजीBJPभाजपाchandrakant patilचंद्रकांत पाटील