शहरं
Join us  
Trending Stories
1
निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
2
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
3
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
4
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
5
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
6
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
7
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
8
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
9
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांना आझाद मैदानावर आंदोलनासाठी परवानगी, अटीशर्तीही घातल्या
10
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
11
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
12
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
13
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
14
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?
15
Solapur Crime: 'तुला आणि तुझ्या आईला खल्लास करीन'; बापाकडूनच अल्पवयीन मुलीवर अनेकवेळा अत्याचार
16
'डोनाल्ड ट्रम्प यांचा कॉल अन् PM मोदींनी ५ तासात युद्ध थांबवले', राहुल गांधींची बोचरी टीका
17
नागपूर: 'चॅट जीपीटी'च्या मदतीने पोलिसांनी पकडला मास्टरमाईंड; पुण्यातील व्यक्तीच्या घरावर घेतलं कर्ज, ५ कोटींचा गंडा
18
Ganesh Chaturthi 2025: मराठी कलाकारांच्या घरी झाले बाप्पाचे आगमन, पाहा फोटो
19
जैशला पुनरुज्जीवित करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न; मसूदच्या दहशतवाद्यांसाठी काय करतंय पाक सरकार?
20
अभिनेतापासून राजकारणी बनलेल्या थलापती विजय वादात! TVK रॅलीत बाउन्सरने कार्यकर्त्यांना व्यासपीठावरुन खाली फेकले, गुन्हा दाखल, व्हिडीओ व्हायरल

ब्राह्मण समाजाला फसविल्यानेच भाजपचा पराभव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 18:55 IST

brahman mahasangh, VidhanParishadElecation, kolhapur ब्राह्मण समाजाच्या मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत आम्हाला गृहीत धरू नये असे सांगूनही भाजपच्या नेत्यांनी समाजाच्या तोंडाला पाने पुसली. त्यामुळे नाराज झालेल्या ब्राह्मण समाजातील मतदारांनी एकमुखी विचार केल्यामुळे नुकत्याच झालेल्या विधानपरिषद निवडणुकीत भाजपच्या परंपरागत मतदारसंघात त्यांना दारुण पराभव पत्करावा लागला, असा दावा ब्रम्ह महाशिखर परिषदेचे मकरंद कुलकर्णी यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केला.

ठळक मुद्देब्रम्ह महाशिखर परिषदेचा दावा मनपा निवडणुकीतही बसणार फटका

कोल्हापूर : ब्राह्मण समाजाच्या मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत आम्हाला गृहीत धरू नये असे सांगूनही भाजपच्या नेत्यांनी समाजाच्या तोंडाला पाने पुसली. त्यामुळे नाराज झालेल्या ब्राह्मण समाजातील मतदारांनी एकमुखी विचार केल्यामुळे नुकत्याच झालेल्या विधानपरिषद निवडणुकीत भाजपच्या परंपरागत मतदारसंघात त्यांना दारुण पराभव पत्करावा लागला, असा दावा ब्रम्ह महाशिखर परिषदेचे मकरंद कुलकर्णी यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केला.ब्राह्मण समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे यासह अन्य मागण्या आम्ही करत आहोत; पण मागच्या पाच वर्षांत सत्तेत असताना भाजप सरकारने समाजासाठी काहीच केले नाही. शिक्षक व पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच राज्यातील ब्राह्मण संघटनांच्या ब्रम्ह महाशिखर परिषदेने आपली भूमिका स्पष्टपणे मांडली होती.

कोल्हापुरातील गोलमेज परिषदेतही जे कोणी ब्राह्मण समाजाच्या विविध मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेऊन विचार करतील, त्यांना मदत केली जाईल याचा पुनुरुच्चार केला होता. भाजपच्या नेत्यांनी आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले. एवढेच नाही तर मेधाताई कुलकर्णी यांची आमदारकी हिरावून घेतली.

मिलिंद संपगावकर, शेखर चरेगांवकर यांना केवळ ब्राह्मण म्हणून उमेदवारी नाकारली. त्याचाच फटका भाजपच्या उमेदवारांना बसला, असे कुलकर्णी यांनी म्हटले आहे. यावेळी विजय जमदग्नी, प्रदीप अष्टेकर, दिलीप धर्माधिकारी, कमलाकर देशपांडे, प्रसाद कुलकर्णी, मकरंद कुलकर्णी, सूरज कुलकर्णी उपस्थित होते.फडणवीस कार्यशून्य नेतृत्व..ज्या शेटजी, भटजींचा पक्ष म्हणून हिणवले गेले, त्याच पक्षाच्या जिवावर नेते मोठे झाले; पण त्यांनी समाजाकडे दुर्लक्ष केले. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना या कार्यशून्य माणसाने मागण्या जाणून घेण्याचेही सौजन्य दाखविले नाही. त्यांनी समाजाची फसवणूक केली. यापुढेही कोल्हापूरसह पुणे, औरंगाबाद महानगरपालिकेत समाजाला दुखावल्याचे परिणाम पाहायला मिळतील, असा इशाराही त्यांनी दिला.नेत्यांची मग्रुरी उतरवलीभाजपच्या नेत्यांना प्रचंड मग्रुरी आली होती. जर पराभव झाला तर हिमालयात जातो असे नेते बोटांच्या चिटक्या वाजवून म्हणत होते. कसली ही मग्रुरीची भाषा. राजकारणात इतकी मग्रुरी चालत नाही हेच आम्ही दाखवून दिले, असे कुलकर्णी यांनी सांगितले.

टॅग्स :Vidhan Parishad Electionविधान परिषद निवडणूकbrahman mahasanghब्राह्मण महासंघkolhapurकोल्हापूर