कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातून शिवसेना-भाजपला चांगले यश मिळाल्याने या दोन पक्षांची युती पूर्ववत झाल्यास भाजपचे आमदार चंद्रकांतदादा पाटील, आमदार सुरेश हाळवणकर व शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांना मंत्रिपदाचा लाल दिवा मिळण्याची शक्यता बळावली आहे.शिवसेनेने या निवडणुकीत दुप्पट यश मिळवले आहे. त्यात सत्यजित पाटील, उल्हास पाटील व प्रकाश आबिटकर हे तुलनेत शिवसेनेत नवखे आहेत. चंद्रदीप नरके हे दुसऱ्यांदा आमदार झाले असले तरी त्यांना निसटता विजय मिळाला आहे. सुजित मिणचेकर हे देखील स्पर्धेत असले तरी क्षीरसागर हे कोल्हापूर शहराचे आमदार व सच्चा शिवसैनिक असल्याने त्यांचा मंत्रिपदासाठी जास्त विचार होऊ शकतो. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशीही त्यांचे सलोख्याचे संबंध आहेत. उद्धव ठाकरे यांचा त्यांच्यावर विश्वास आहे. त्यामुळे त्यांचाच विचार प्राधान्याने होऊ शकतो.अमल महाडिक यांना भाजपमध्ये आणण्याचे श्रेय त्यांचेच आहे. शिवाय त्यामुळे त्यांचे मंत्रिपद नक्की समजले जाते. सुरेश हाळवणकर यांना निवडून दिल्यास मंत्री करतो, अशी घोषणा भाजपचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी इचलकरंजीतील सभेत केली होती. ते देखील भाजपचे हाडाचे कार्यकर्ते असल्याने त्यांनाही संधी मिळण्याची शक्यता जास्त आहे.भाजपच्या यशात आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी केलेल्या जोडण्याही महत्त्वाच्या ठरल्या आहेत. पाटील हे ‘भाजपच्या किचन कॅबिनेट’मधील नेते मानले जातात.
भाजपचे चंद्रकांतदादा, क्षीरसागर यांना ‘लाल दिवा’
By admin | Updated: October 20, 2014 00:39 IST