शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसंख्या धोरण लवकरात लवकर लागू करणे आवश्यक, तरच..."; RSS ची सरकारकडे मागणी, होसबळे म्हणाले...
2
अग्नितांडव! मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण आग; लहान मुलांसह २३ जणांचा मृत्यू
3
तिरुपतीच्या धर्तीवर पंढरपुरात होणार दर्शन मंडप; वारकऱ्यांना मिळणार कमी वेळेत विठ्ठलाचे दर्शन
4
King Title Reveal: वाढदिवशी शाहरुखचं चाहत्यांना सरप्राईज! 'किंग'चा पहिला प्रोमो रिलीज, व्हिडीओ बघाच
5
Manoj Tiwari : "शिवीगाळ केली, वाहनांवर हल्ला"; मनोज तिवारींच्या रोड शोमध्ये प्रचंड गोंधळ, RJD वर गंभीर आरोप
6
"ख्रिश्चनांचं हत्याकांड थांबवलं गेलं नाही तर...!"; डोनाल्ड ट्रम्प यांची आता ‘या’ देशाला थेट हल्ल्याची धमकी
7
"लेकाच्या कठीण प्रसंगी देश विरोधात असताना...", शाहरुखबद्दल हिमानी शिवपुरी काय म्हणाल्या?
8
९ वर्षांच्या मुलीने मारली चौथ्या मजल्यावरून उडी, शाळेने पुरावे केले नष्ट; धक्कादायक Video
9
मल्लिकार्जुन खर्गे यांच्या RSS वर बंदी घालण्याच्या मागणीवर अमित शाह यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
10
EMI वर 'श्रीमंती'चा देखावा! ७०% आयफोन, ८०% गाड्या कर्जावर; सीए नितीन कौशिक यांचा गंभीर इशारा
11
सोमवारी प्रदोष व्रत २०२५: केवळ लाभ होईल, नशीब साथ देईल; प्रभावी शिव मंत्रांचा नक्की जप करा!
12
ब्रिटनमध्ये धावत्या ट्रेनमध्ये हल्ला, अनेकांवर चाकूने वार, प्रवाशांमध्ये घबराट, दोन संशयित अटकेत  
13
कार्तिक सोमप्रदोष व्रत २०२५: महादेव प्रसन्न होतील, सर्व मनोकामना पूर्ण करतील; ‘असे’ करा व्रत!
14
शिरोळमध्ये ऊस आंदोलनाचा भडका; ऊस वाहनांचे टायर पेटवले, हवा काढली
15
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभच लाभ, पद-पैसा वाढ; ६ राशींना काहीसा ताप, तुमची रास कोणती?
16
शाहरुख खानचा वाढदिवस, 'मन्नत'बाहेर चाहत्यांची तुफान गर्दी; युके-जपानवरुनही आले फॅन्स
17
"मी अवतारात आले आहे...'; शर्ट परिधान करुन रेड कार्पेटवर आली प्राजक्ता माळी, व्हिडीओ व्हायरल
18
विशेष लेख | फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरण: आफ्टर डेथ पॉलिटिकल स्टोरी !
19
दुलारचंद यादव हत्याकांड: नाट्यमय घडामोडींनंतर अनंत सिंह यांना अटक, रात्री पोहोचले पोलीस, त्यानंतर...
20
इस रात की सुबह नही ! मुंबईतील 'ओलीस नाट्य' म्हणजे आभासी वेडेपणाचे भेसूर प्रतिबिंब

भाजप, ताराराणी आघाडी एकत्रच लढणार : महापालिका निवडणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2020 17:50 IST

 कोल्हापूर महानगरपालिकेची आगामी निवडणूक भारतीय जनता पक्ष आणि ताराराणी आघाडी एकत्रच लढणार आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने वेळोवेळी चर्चा करून प्रत्यक्ष आरक्षण जाहीर झाल्यानंतर जागावाटपाची चर्चा होईल, असे या आघाडीतर्फे सांगण्यात आले. भाजपमध्ये तर निवडणुकीची पूर्वतयारीही सुरू झाली आहे.

ठळक मुद्देभाजप, ताराराणी आघाडी एकत्रच लढणार महापालिका निवडणूक

भारत चव्हाण

 कोल्हापूर : महानगरपालिकेची आगामी निवडणूक भारतीय जनता पक्ष आणि ताराराणी आघाडी एकत्रच लढणार आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने वेळोवेळी चर्चा करून प्रत्यक्ष आरक्षण जाहीर झाल्यानंतर जागावाटपाची चर्चा होईल, असे या आघाडीतर्फे सांगण्यात आले. भाजपमध्ये तर निवडणुकीची पूर्वतयारीही सुरू झाली आहे.महानगरपालिका निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून, इच्छुक कार्यकर्त्यांमध्ये जशी तयारी सुरू आहे, तशी तयारी राजकीय पक्षांकडूनही सुरू आहे. निवडणूक केव्हाही होवो; आपण तयार असले पाहिजे, या भावनेतून ही सगळी तयारी मागच्या सहा महिन्यांपासूनच सुरू आहे. त्यातच राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकीची पूर्वतयारी सुरू करा म्हणून सूचना केल्यामुळे तयारीला गती आली आहे.माजी खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या नेतृत्वाखालील ताराराणी आघाडीचे अस्तित्व या निवडणुकीत स्वतंत्र असेल यावर सर्वांचेच एकमत झाले आहे. मात्र भाजपबरोबर युती करून निवडणूक एकत्र लढविली जाणार आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील व महाडिक कुटुंबीय यांचे सख्य आजही आहे. तसेच दोघांचा राजकीय शत्रू एकच आहे. त्यामुळे पाटील व महाडिक ठरवतील तीच रणनीती कार्यकर्ते राबविणार आहेत. कांग्रेस व राष्ट्रवादीसारखे कार्यकर्ते भाजप-ताराराराणीत बहुसंख्येने नसल्याने जे आहेत त्यांना घेऊन आगामी निवडणूक लढविली जाणार आहे. आरक्षण जाहीर झाल्यानंतर जागावाटपावर चर्चा होईल.मागच्या वेळी सत्ता थोडक्यात गेलीमागच्या निवडणुकीत ६० जागा ताराराणीने, तर २१ जागा भाजपने लढवाव्यात असा प्रस्ताव पुढे आला होता. परंतु तेव्हा भाजप राज्यात सत्तेत होता. त्यामुळे तत्कालीन पालकमंत्री असलेल्या चंद्रकांत पाटील यांनी समान जागा वाटून घेतल्या होत्या. तरीही त्यावेळी ४० पैकी प्रत्यक्ष ३७ जागाच भाजपने लढविल्या होत्या.

ताराराणीच्या कार्यकर्त्यांकरिता महाडिक यांनी जादा सात-आठ जागांसाठी आग्रह धरला होता; पण पाटील यांनी ऐकले नाही. त्यामुळे ह्यताराराणीह्णचे काही उमेदवार ऐनवेळी राष्ट्रवादीत गेले आणि निवडूनही आले. त्यामुळे भाजप-ताराराणीची सत्ता थोडक्यात गेली.भाजपकडून विश्लेषण सुरूभाजपकडून आतापासूनच निवडणुकीच्या अनुषंगाने विश्लेषण सुरू झाले आहे. संभाव्य उमेदवारांच्या नावांची यादी तयार करणे, प्रभागनिहाय कार्यकर्त्यांच्या याद्या बनविणे, विद्यमान नगरसेवकांच्या कामाचा लेखाजोखा तयार करणे या कामांना सुरुवात झाली असल्याचे भाजपकडून गटनेते अजित ठाणेकर यांनी सांगितले.दादा - अप्पा सांगतील तेच होईलभाजप-ताराराणीचे नेते चंद्रकांत पाटील, महादेवराव महाडिक हेच असून ते जो आदेश देतील, रणनीती ठरवतील त्याच पद्धतीने होईल. धनंजय महाडिक हे पाटील यांच्या संपर्कात आहेत. त्यांचीही बोलणी होत आहेत, असे ताराराणीचे गटनेते सत्यजित कदम यांनी सांगितले.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाElectionनिवडणूकkolhapurकोल्हापूर