शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

जटिल, अवघड प्रश्न भाजपने सोडविले  : विनय सहस्रबुद्धे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2019 18:17 IST

देशासमोर जे जटिल आणि अवघड प्रश्न होते, ते व्यापक राष्ट्रहिताचा विचार करून सोडविण्यावर भाजपचा भर असल्याचा दावा खासदार विनय सहस्रबुद्धे यांनी केला आहे. केवळ घोषणा न करता अंमलबजावणी सुरू केल्यानेच मतदार पाठीशी असल्याचाही दावा त्यांनी यावेळी केला.

ठळक मुद्देजटिल, अवघड प्रश्न भाजपने सोडविले : विनय सहस्रबुद्धे‘करून दाखवल्या’ने मतदार पाठीशी

कोल्हापूर : देशासमोर जे जटिल आणि अवघड प्रश्न होते, ते व्यापक राष्ट्रहिताचा विचार करून सोडविण्यावर भाजपचा भर असल्याचा दावा खासदार विनय सहस्रबुद्धे यांनी केला आहे. केवळ घोषणा न करता अंमलबजावणी सुरू केल्यानेच मतदार पाठीशी असल्याचाही दावा त्यांनी यावेळी केला.विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सहस्रबुद्धे यांनी शुक्रवारी सकाळी येथे पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी भाजपचे प्रदेश चिटणीस मकरंद देशपांडे उपस्थित होते.सहस्रबुद्धे म्हणाले, दुसऱ्यांदा भारतीय जनतेने अभूतपूर्व असा जनादेश दिल्याने गेल्या १०० दिवसांमध्ये मोदी सरकारने एकापेक्षा एक गुुंतागुंतीचे प्रश्न सोडविण्याला प्राधान्य दिले आहे. तिहेरी तलाक, ४७0 कलम रद्द यांसारख्या राज्यघटनेत नमूद केलेल्या विषयांवर निर्णय घेतलो. लोकप्रिय निर्णय न घेता लोकहिताचे, राष्ट्रहिताचे निर्णय घेतले. नावात राष्ट्रवादी असणाऱ्या पक्षालाही ३७० कलमावर ठोस भूमिका घेता आली नाही.पेट्रोलियम पदार्र्थाांंचे दर आंतरराष्ट्रीय स्तरावर ठरविले जातात. स्वच्छ भारत, गॅस अनुदान सोडण्याचे आवाहन, प्लास्टिकबंदी असे अनेक विषय या सरकारने पुढे आणले. ज्या विषयावर कोणीही फारशी उघड भूमिका घेत नाहीत, त्या लोकसंख्येच्या प्रश्नालाही नरेंद्र मोदी यांनी हात घातला.

आर्थिक मंदीमुळे गडबडून न जाता त्यासाठी आवश्यक उपाययोजना सुरू केल्या. अमेरिकेच्या इतिहासात भारतीय पंतप्रधानांचा एवढा भव्य-दिव्य कार्यक्रम होणे हे आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये भारताचा दबदबा वाढत असल्याचे द्योतक आहे. हे सर्व काम जनता बघत आहे. कामावर आधारित असा जनादेश आम्ही महाराष्ट्रातही मागत आहोत. जनता स्पष्टपणे तो भाजपला देईल , असा विश्वास सहस्रबुद्धे यांनी यावेळी व्यक्त केला.एन. डी. पाटील यांची घेतली भेटखासदार सहस्रबुद्धे यांनी ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांची रुग्णालयात जाऊन सदिच्छा भेट घेतली व त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. सुभाष वोरा हेदेखील दवाखान्यात असून त्यांच्याही प्रकृतीची चौकशी सहस्रबुद्धे यांनी केली. 

 

टॅग्स :BJPभाजपाkolhapurकोल्हापूर