लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची भूमिका शेतकरीविरोधी असून, हिंमत असेल तर भाजपच्या मंडळींनी बांधावर जावे, शेतकरी पायातील हातात घेतल्याशिवाय राहणार नाहीत, अशी टीका पालकमंत्री सतेज पाटील यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली.
मंत्री पाटील म्हणाले, केंद्रातील भाजप सरकार शेतकऱ्यांचे हित करणार नाही, कायद्याच्या आडून वेठीस धरण्याचे काम सुरू आहे. हिंमत असेल तर भाजपच्या नेत्यांनी बांधावर जाऊन दाखवावे, शेतकरी पायातील हातात घेतल्याशिवाय राहणार नाहीत.
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, गेले १२ दिवस दिल्ली, हरियाणातील शेतकरी थंडीत कुडकुडत आहेत. याबद्दल भाजपच्या नेत्यांना काहीच वाटत नाही. उलट कायदे रद्द होणार नसल्याचे चंद्रकांत पाटील सांगत आहेत. कायदे रद्द होणार नाही, हे सांगणारे चंद्रकांत पाटील पंतप्रधान, केंद्रीय कृषिमंत्री आहेत का? त्यांनी आगीत तेल ओतू नयेत.
- राजाराम लोंढे