शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
3
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
4
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
5
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
6
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
7
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
8
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
9
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
10
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
11
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
12
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
13
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
14
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
16
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
17
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
18
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
19
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
20
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!

पराभवाचा वचपा काढण्यास भाजप सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 16:29 IST

bjp, kolhapur, muncipaltycarporotion, कोल्हापूर महानगरपालिकेच्या गत निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने स्थानिक छत्रपती ताराराणी आघाडीशी युती करून महापालिकेवर आपला झेंडा फडकविण्याचा केलेला प्रयत्न थोडक्यात फसला. त्यामुळे यावेळच्या निवडणुकीत तोच फॉर्म्युला घेऊन नव्या ताकदीने निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी भाजपने केली आहे.

ठळक मुद्देआघाडीतर्फे ५० पेक्षा अधिक जागा जिंकण्याचे उद्दिष्ट रणनीती तयार करण्याचे काम सुरू

कोल्हापूर : महानगरपालिकेच्या गत निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने स्थानिक छत्रपती ताराराणी आघाडीशी युती करून महापालिकेवर आपला झेंडा फडकविण्याचा केलेला प्रयत्न थोडक्यात फसला. त्यामुळे यावेळच्या निवडणुकीत तोच फॉर्म्युला घेऊन नव्या ताकदीने निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी भाजपने केली आहे. ५० हून अधिक जागा जिंकण्याचे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून भाजपकडून आडाखे बांधले जात आहेत. पक्षाची स्थानिक यंत्रणा सध्या महापालिका निवडणुकीतील रणनीती ठरविण्याचे काम करीत आहे.गत निवडणुकीत देशात आणि राज्यात भारतीय जनता पक्षाचे सरकार होते; त्यामुळे महानगरपालिकेच्या २०१५ मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपचा सर्वाधिक बोलबाला होता; परंतु पक्षाचे स्थानिक नेते आपली कोल्हापूर शहरातील राजकीय ताकद ओळखून होते.

भाजपला एकट्याने निवडणुकीत उतरणे अशक्य होते; त्यामुळे त्यांनी स्थानिक ताराराणी आघाडीशी हातमिळवणी केली. आघाडीने एकत्रित निवडणूक लढवून कॉग्रेस-राष्ट्रवादीला चांगलेच जेरीस आणले. पहिल्याच प्रयत्नात भाजप-ताराराणी आघाडीने ३३ जागा जिंकल्या. त्यात भाजपचा १४ जागांचा वाटा होता. नंतर एका अपक्षाने भाजपला पाठिंबा दिल्याने संख्याबळ १५ वर पोहोचले.निवडणुकीच्या काळात चंद्रकांत पाटील पालकमंत्री होते. मंत्रिमंडळातील चार प्रमुख खाती त्यांच्याकडे होती. त्यामुळे त्यांचा निवडणुकीवर मोठा प्रभाव राहिला. एकीकडे चंद्रकांत पाटील, तर दुसरीकडे महादेवराव महाडिक व अमल महाडिक असा राजकीय करिष्मा असलेले नेते असल्याने भाजपची शहरात भलतीच हवा निर्माण झाली.

कॉग्रेस-राष्ट्रवादीसमोर मोठे आव्हान तयार करण्यात भाजप यशस्वी ठरला; पण महापालिकेवर झेंडा फडकविण्यात ते अयशस्वी ठरले. आणखी पाच ते सहा जागा मिळविता आल्या असत्या तर भाजपने आपले महापौर केले असते; पण गणित चुकले. सत्ता आणण्याचे स्वप्न थोडक्यात भंगले.गतवेळच्या निवडणुकीत थोडक्यात संधी हुकल्यामुळे चंद्रकांत पाटील खूप अस्वस्थ होते. त्यांनी पुढे एक वर्षभर तरी चमत्कार होईल, महापौर भाजपचा होईल अशी भविष्यवाणी सांगण्यात घालविले. शेवटी काही जमत नाही म्हटल्यावर त्यांनी नाद सोडून दिला; परंतु त्यांच्या मनातील सल ही गेल्या पाच वर्षांपासून त्यांना स्वस्थ बसू देत नाही.

आता राज्यात त्यांची सत्ता नसली तरी भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांचे पक्षात मानाचे स्थान आहेच; शिवाय वरिष्ठ नेत्यांचीही त्यांच्यावर विशेष मर्जी आहे. त्यामुळे विरोधी पक्षात असले तरी निवडणुका लढविण्याचे तंत्र, कौशल्ये, आयुधे त्यांच्याकडे आहेत.महादेवराव महाडिक यांच्यासह माजी खासदार धनंजय महाडिक व त्यांची युवाशक्ती त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. भाजपची ही सर्वांत मोठी जमेची बाजू आहे. ५० पेक्षा अधिक जागा जिंकून महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकाविण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी केला आहे.केलेले काम हाच अजेंडाकेंद्रातील व राज्यातील भाजप सरकारच्या काळात केलेली विकासकामे, टोलपासून केलेली कोल्हापूरकरांची मुक्ती, मुद्रा योजना, मोफत गॅस कनेक्शन, गोल्डन कार्ड यांसारख्या सरकारच्या विविध योजनांचा लाभार्थ्यांना मिळवून दिलेला लाभ, शहरात अमृत योजनेतून ड्रेनेज लाईन व पाणीपुरवठा करणाऱ्या नलिका टाकण्यासाठी आणलेला निधी हाच अजेंडा घेऊन भाजप निवडणुकीत उतरणार आहे. निवडणूक व्यूहरचनेत मतदारांसमोर जाताना कसे जायचे, याचा आराखडाही तयार केला जात आहे.नेत्यांच्या जोर-बैठका सुरूचंद्रकांत पाटील, धनंजय महाडिक, अमल महाडिक, देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, भाजप महानगर अध्यक्ष राहुल चिकोडे असे नेते महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीच्या निमित्ताने बैठका, गाठीभेटी, प्रभागांतील उमेदवारांची चाचपणी करीत आहेत. ठरवून नसले तरी ज्या ज्या वेळी चंद्रकांत पाटील कोल्हापुरात असतील, त्या त्या वेळी महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने चर्चा होत आहेत. माजी खासदार अमर साबळे हे पक्षाचे निरीक्षक म्हणून काम पाहणार आहेत.गत निवडणुकीतील पक्षाची कामगिरी

  • भारतीय जनता पक्षाने लढविलेल्या जागा - ३७
  • जिंकलेल्या जागा - १४ १ (अपक्ष)
  • महापालिकेत चौथ्या स्थानावर
  • पक्षाच्या उमेदवारांना मिळालेली मते - ४६ हजार ०७७
  • एकूण मतांची टक्केवारी - १६.१३
टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूरBJPभाजपा