शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठ्यांची ‘सरसकट ओबीसीची मागणी स्वीकारलेली नाही’; CM देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
2
आजचे राशीभविष्य, ५ सप्टेंबर २०२५: प्रवासाचे बेत, प्रियव्यक्तीचा सहवास पण वाणीवर संयम ठेवा !
3
जीएसटीतील बदलामुळे सामान्यांचा मोठा फायदा; अर्थव्यवस्थेलाही मिळेल बूस्टर, PM मोदींना विश्वास
4
शिक्षणाच्या दर्जात आयआयटी मद्रास अव्वलच...; क्रमवारीत आयआयटी बॉम्बे तिसऱ्या स्थानावर
5
यू टर्न की मास्टरस्ट्रोक? जनतेच्या खिशातून अधिकचेच पैसे काढले; ८ वर्षांनी सरकारच्या लक्षात आले
6
मराठा, ओबीसी आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमित्यांचे कार्य समांतर - चंद्रशेखर बावनकुळे
7
कुजबुज! राज ठाकरेंचं एवढेच वाक्य वादळ ठरले; शिंदेसेनेच्या आमदाराने लगावला टोला, "आधी लोकांमधून.."
8
प्रवाशांनी लावला रेल्वेला चुना, त्यामुळे आता स्थानकात क्यूआर तिकीट बंद; प्रशासनाचा निर्णय
9
"मराठी माणूस एकटवला, म्हणून..."; निदर्शनांवर निर्बंधांच्या मागणीवरून मिलिंद देवरांवर टीकेची झोड 
10
जीआरवर उगाच संभ्रम निर्माण केला जातोय; दगाफटका केला तर सुपडा साफ होईल, मनोज जरांगेंचा इशारा
11
ओ देवाभाऊ, तुही जात कंची? फडणवीसांवर विषारी टीका करणाऱ्यांपेक्षा त्यांच्या नेतृत्वावर...
12
घटनात्मक गुंतागुंत! एखाद्या विधिमंडळ सदस्याने चुकीचे वर्तन केले तर त्याला शिक्षा कोण देणार?
13
२३ वर्षीय प्रियकर, ८३ वर्षीय प्रेयसी! अनोखी प्रेमकहाणी आली चर्चेत; मैत्रिणीच्या घरी गेला अन्...
14
पक्ष्यांसह विमानांच्या सुरक्षेवर आता ‘बर्डगार्ड’ ठेवणार वॉच; नवी मुंबई विमानतळ कंपनीची माहिती
15
३ वेळा १० थर, तरी विश्वविक्रम नाही; कुठेतरी पाणी मुरतंय, जय जवान गोविंदा पथकाचा आरोप
16
पत्नीने प्रेयसीसोबत लॉजवर पकडलं; घाबरलेल्या पतीने खाडीत मारली उडी, त्यानंतर 'असं' काही घडलं...
17
जगभ्रमंतीसाठी निघालेल्या नवी मुंबईच्या ट्रॅव्हल ब्लॉगरची दुचाकी इंग्लंडमध्ये चोरीला
18
Delhi Flood: खवळलेल्या यमुनेचं भयावह रुप, पुराचं पाणी मंत्रालयाच्या उंबरठ्यावर, फोटो पहा
19
“हैदराबाद गॅझेटला सरकार अनुकूल, तेलंगणाप्रमाणे ४२ टक्के आरक्षण देणार का?”: हर्षवर्धन सपकाळ
20
GST च्या उत्साहानंतर बाजारात नफावसुली! सेन्सेक्स-निफ्टी उच्च पातळीवरून खाली, सर्वाधिक घसरण कुठे?

सत्तेसाठी भाजप आशावादी; शिवसेना सावध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2017 00:03 IST

जिल्हा परिषद : दुधवडकर घेणार शिवसेना आमदार-पदाधिकाऱ्यांची बैठक

कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या सत्तेसाठी एकीकडे भाजप आशावादी असताना शिवसेनेने मात्र सावध भूमिका घेतली आहे. पंचायत समित्यांच्या सभापती निवडी चार दिवसांवर आल्याने उद्या, शनिवारी आणि परवा (रविवारी) याबाबतच्या हालचाली वेगावणार आहेत. शिवसेनेचे संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर हे शनिवारी रात्री किंवा रविवारी सकाळी शिवसेनेचे आमदार व जिल्हाप्रमुखांची महत्त्वाची बैठक घेणार आहेत. बुधवारी (दि. ८) मुंबईत शिवसेनेचा महापौर झाला. त्यासाठी भाजपने विनाअट मतदान केले. त्यामुळे आता जिल्ह्यातही शिवसेना भाजपच्या पाठीशी राहील, असा आत्मविश्वास महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केला आहे; तर दुसरीकडे शिवसेनेमध्ये येणाऱ्या दोन दिवसांत घडामोडी घडण्याची शक्यता आहे. एकीकडे कॉँग्रेसच्या जिल्हा परिषद सदस्यांच्या सत्कारावेळी बहुमतासाठी केवळ एक सदस्य कमी असल्याचे सांगून कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांनी बॉम्ब टाकला असताना, आता शिवसेना नेमके काय करणार याकडे सर्व राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. कॉँग्रेसच्या प्रयत्नांना पाठिंबा देणे अशी सध्या राष्ट्रवादीची भूमिका असून, स्थानिक आघाड्यांच्या भूमिकाही महत्त्वाच्या ठरणार आहेत. कुठली स्थानिक आघाडी कुणाबरोबर राहणार याचे आडाखे बांधायचे काम सुरू असले तरी याबाबतही गुप्तता पाळली जात आहे. सगळ्यांत महत्त्वाचे म्हणजे शिवसेना एकसंधपणे कुणा एका पक्षाच्या पाठीशी राहणार, की तिथेही फूट पडणार, हा विषय महत्त्वाचा आहे. एकसंध शिवसेनेचा पाठिंबा भाजपच्या फायद्याचाजर मुंबईतील भाजपच्या एक पाऊल मागे घेण्याने उद्धव ठाकरे यांनी नरमाईचे धोरण स्वीकारले आणि कोल्हापूर जिल्हा परिषदेत ठामपणे सर्व १० सदस्यांनी भाजपसोबत राहिलेच पाहिजे; पुढचे पुढे बघू, अशी भूमिका घेतली तरच भाजप-शिवसेना सत्तेवर येण्याची शक्यता बळावते. मात्र त्यांनी ‘तुमच्या सोयीने निर्णय घ्या,’ असे सांगितल्यास शिवसेनेतही फूट पडण्याची शक्यता आहे. शनिवारी-रविवारी होणार घडामोडीसर्वपक्षीय सर्व नेते हे शनिवारी-रविवारी कोल्हापुरात असणार आहेत. मंगळवारी (दि. १४) बाराही तालुक्यांच्या सभापती निवडी आहेत. त्यामुळेच या दोन दिवसांत राजकीय हालचाली वेगाने घडण्याची शक्यता आहे.शिवसेनेचे संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर हे उद्या, शनिवारी कोल्हापुरात येत आहेत. याच दिवशी संध्याकाळी जर सर्व आमदार आणि आम्ही तीन जिल्हाप्रमुख एकत्र आलो तर किंवा रविवारी (दि. १२) ते बैठक घेतील. त्यामध्ये यावर चर्चा अपेक्षित आहे. - संजय पवार, जिल्हाप्रमुख शिवसेनाशिवसेना सोबत येणार आहे. याबाबतच्या वेगवेगळ्या पातळ्यांवरील चर्चा सुरू आहेत. काही गोष्टी ठरल्याही आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेत भाजप-शिवसेना व मित्रपक्ष आघाड्यांची सत्ता येणार, यात तीळमात्र शंका नाही. - आमदार सुरेश हाळवणकर, भाजप नेते