शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
2
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
3
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
4
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
5
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
6
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
7
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
8
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली
9
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
10
ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
11
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
12
"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद
13
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video
14
शिवसेनेचा बाप मीच आहे, भाजपा आमदार परिणय फुकेंचं वादग्रस्त विधान; शिंदेसेना संतप्त
15
Shravan 2025: शास्त्रानुसार, संसारी व्यक्तीने रुद्राक्षाची जपमाळ ओढावी, पण गळ्यात घालू नये!
16
रक्षाबंधन नेमके कधी आहे? शुभ मुहूर्त कोणता? पाहा, महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
17
नोकरीसाठी विदेशात जायचंय तर पत्नीला भारतात ठेवा, अटीविरुद्ध ‘तो’ सुप्रीम कोर्टात
18
७१% चं रेकॉर्डब्रेकिंग इनक्रिमेंट! 'हे' आहेत भारतातील IT क्षेत्रातील सर्वाधिक कमाई करणारे CEO; मिळणार १५४ कोटी सॅलरी
19
४४ भूखंड, एक किलो सोने, २ किलो चांदी...! आरटीओ अधिकाऱ्याची संपत्ती एवढी की पाहून अधिकारी थक्क झाले...
20
वय वर्ष ८०, तरीही फिट! दिलीप प्रभावळकरांना स्वत:च्या फिटनेसचं आश्चर्य, म्हणाले- "एकदा ५ कुत्रे माझ्या लागले तेव्हा..."

मोदींना पाठबळ देणारा खासदार कोल्हापुरातून निवडून द्या, शिवराजसिंह चौहान यांचे आवाहन

By समीर देशपांडे | Updated: February 24, 2024 15:24 IST

'नरेंद्र मोदी सत्तेवर आल्यानंतर भ्रष्टाचाऱ्यांवर किमान कारवाई तरी सुरू झाली'

कोल्हापूर : विकसित भारत करण्यासाठी नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांना पंतप्रधान करावे लागेल. त्यासाठी पाठबळ देणारा खासदार कोल्हापुरातून निवडून द्या असे आवाहन मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केले आहे. येथील महासैनिक दरबार हॉलमधील भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी खासदार धनंजय महाडिक, जिल्हाध्यक्ष विजय जाधव, राहूल देसाई, राजवर्धन निंबाळकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. मोदी यांनी राबवलेल्या विविध योजनांचा दाखला देत चौहान यांनी या सर्व योजना आणखी प्रभावीपणे राबवण्यासाठी तिसऱ्यांदा मोदी पंतप्रधान होण्याची गरज आहे. यावेळी त्यांनी मध्यप्रदेशमध्ये राबवलेल्या विविध लोकप्रिय योजनांची माहिती दिली. 

‘ममता’आता क्रूर झाल्यातत्पूर्वी पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले, पश्चिम बंगालमध्ये ज्या पध्दतीने घटना घडत आहेत. त्या पाहता ममता बॅनर्जी यांच्यातील ‘ममता’आता संपली असून त्या क्रूर झाल्या आहेत. मीच व्यापमचा घोटाळा बाहेर काढला आणि देाषींवर कारवाईचे आदेश दिले. याआधी भ्रष्टाचाऱ्यांवर कारवाईच होत नाही असे चित्र होते. परंतू नरेंद्र मोदी सत्तेवर आल्यानंतर किमान कारवाई तरी सुरू झाली. सर्व तपास आणि कारवाई करणाऱ्या यंत्रणा त्यांच्या पध्दतीने काम करत असून यामध्ये सरकारची कोणतीही भूमिका नाही. त्याआधी चौहान यांनी अंबाबाईचे दर्शन घेतले. यानंतर त्यांनी बिंदू चौकात ‘चाय पे चर्चा’ कार्यक्रमात नागरिकांचे प्रश्न समजून घेतले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMamata Banerjeeममता बॅनर्जीshivraj singh chauhanशिवराज सिंह चौहान