शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
12
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
13
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
14
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
15
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
16
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
17
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
18
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
19
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
20
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल

फुकटचे श्रेय घेण्यासाठी आदल्या दिवशी उद्घाटने करणारे ते तर घुसखोरच, समरजित घाटगेंचा मुश्रीफांवर पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2023 16:55 IST

मला जे करायचे ते छातीठोकपणे करतो

दत्ता पाटीलम्हाकवे : कागलमधील कामांची उद्घाटने आम्ही  कार्यक्रमाच्या पत्रिका काढून सन्मानपूर्वक करत आहोत. माञ, चोर ते चोर आणि वर शिरजोर बनलेले फुकटचे श्रेय घेण्यासाठी आदल्याच दिवशी घाईघाईने उदघाटन करत आहेत. त्यामुळे त्यांना घुसखोर हीच उपाधी द्यावी लागेल असा पलटवार भाजपाचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांनी मुश्रीफांचे नाव न घेता केला.म्हाकवे ता. कागल येथे जलजीवन मिशन योजनेतून चार कोटी ९४ लाख रुपये खर्चाच्या पाणी योजनेचा शुभारंभ, बांधकाम कामगारांना साहित्य वाटप व गुणवंतांचा सत्कार अशा संयुक्त कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी गोकुळचे माजी चेअरमन रणजितसिंह पाटील होते.मला जे करायचे ते छातीठोकपणे करतो. यापुढेही असे उद्घाटन कार्यक्रम आम्ही तारखा जाहीर करूनच करु. तुम्ही माञ आदल्या दिवशी उद्घाटन करून घुसखोरी करत राहा तुमच्या या घुसखोरीचा जनता करेक्ट बंदोबस्त करेल असा टोलाही घाटगे यांनी लगावला.उपसरपंच धनंजय पाटील यांनी प्रास्ताविक केले. महावीर पाटील,रविंद्र पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. शाहूचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे, पी.डी. चौगुले, ए.डी.पाटील, अजित पाटील, संदीप पाटील, संदीप कांबळे, प्रताप पाटील, दत्तामामा खराडे उपस्थित होते.आता सांगा उद्घाटनचा अधिकार कोणाला?येथील पाणी योजनेच्या दोन वेळा होणाऱ्या उद्घाटनावरुन उलटसुलट चर्चा सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर या योजनेला १२ आक्टोंबर २२ रोजी तांञिक तर १७ नोव्हेंबर २२ रोजी प्रशासकिय मान्यता आणि गत आठवड्यात वर्कऑर्डर  मिळाली आहे. त्यामुळे या योजनेचे उद्घाटनाचा अधिकार कोणाला हे गावकऱ्यांनीच सांगावे असा खुलासा उपसरपंच धनंजय पाटील यांनी केला.बॅनर लागला...  निधीच कायमुश्रीफसाहेबांनी काही महिन्यापूर्वीच म्हाकवे येथील वारकऱ्यांसाठी पंढरपूर मध्ये मठ बांधण्यासाठी 50 लाख रुपयांचा निधी देण्याचे जाहीर केले‌. याचा बॅनरही लागला. तसेच ग्रामपंचायत इमारतीसाठी एक कोटींचा निधी जाहीर केला. मग हा निधी कुठे आहे? जाहीर केल्याप्रमाणे त्यांनी निधी द्यावा. त्यांनी वारकरी व ग्रामस्थांच्या भावनेशी खेळू नये असे आवाहन करत घाटगे यांनी आमदार मुश्रीफ यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरkagal-acकागलPoliticsराजकारणSamarjit Singh Ghatgeसमरजितसिंह घाटगेHasan Mushrifहसन मुश्रीफ