शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

Lok sabha 2024: संजय मंडलिक 'भेटी'साठी आले, भाजप नेत्याने चांगलंच सुनावलं -video

By समीर देशपांडे | Updated: March 29, 2024 13:57 IST

'मतदान करायला आम्ही आणि कामं मात्र कॉंग्रेसवाल्याची होणार असं यापुढं चालणार नाही'

कोल्हापूर : कोल्हापूर लोकसभेसाठी शिवसेना शिंदे गटाकडून संजय मंडलिक यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यानंतर कोल्हापुरात आज, शुक्रवारी भाजपच्यावतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. मात्र यावेळी मंडलिक यांची भाजप नेत्याने चांगलीच कानउघडणी केली.  आम्ही तुम्हांला निवडून आणण्यासाठी रक्ताचं पाणी केलं, रात्रीचा दिवस केला. परंतू तुम्ही निवडून गेल्यानंतर आमची कामे केला नाहीत. मतदान करायला आम्ही आणि काम मात्र कॉंग्रेसवाल्याची होणार असं यापुढं चालणार नाही अशा शब्दात भाजपचे प्रदेश सचिव महेश जाधव यांनी महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्यासमोरच रोखठोक भाषण केले. त्यांच्या या भाषणाला कार्यकर्त्यांनी टाळ्यांच्या गजरात प्रतिसाद दिला.जाधव म्हणाले, कोल्हापूर आणि हातकणंगलेसाठी आम्ही दोन वर्षे राबत आहोत. एक तरी मतदारसंघ आम्हांला मिळावा अशी अपेक्षा होती. यापुढं इतरांची नाही तर आमची कामं झाली पाहिजेत. इथून पुढं एकाही कॉंग्रेसच्या नेत्याचं गुणगान कुणीही गाता कामा नये. धनंजय महाडिक यांना उद्देशून जाधव म्हणाले, पालकमंत्र्यांना पण हे सांगण्याची गरज आहे की जुनी मैत्री आता विसरा. महापालिका, गोकुळ, केडीसीसीमध्ये इकडं सोबत आणि तिकडं विरोध हे चालणार नाही. आम्हांला पण सोन्याचे दिवस यायला पाहिजेत. मंडलिक यांनी गेल्या लोकसभेनंतर उध्दव ठाकरे यांच्यासोबत आम्ही गेलो. त्यामुळे अंतर पडल्याच मान्य करत यापुढे दक्षता घेण्याची ग्वाही यावेळी दिली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४big Battles 2024लोकसभा निवडणुक रणांगण २०२४kolhapur-pcकोल्हापूरsanjay mandlikसंजय मंडलिक